Thursday 27 September 2012

ती आणि तो

"तुला जे समजायचं ते समंज, मला आता हि रिलेशनशिप पुढे न्यायची नाही"....असं बोलून तो, माघारी फिरला....
वाळूत त्याच्या पायाचे ठसे उमटले होते, ती त्याच्या पाठमोऱ्या प्रतिकृतीकडे पहातच राहिली. समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा तिला स्पर्शून जाग्या करत होत्या कि बोलावत होत्या? हेच तिला उमगत नव्हते, ज्याच्यासोबततिने जगण्या मरणाच्या शपथा घेतल्या होत्या, तो तिला सोडून गेला होता. मटकन ती खाली बसली, आसवांचा बांध आता तुटला होता, तीच सर्वस्व लुटून तो निघून गेला होता.
तिला कळत नव्हत, कि हसायचं कि रडायचं.
रोज ती जिथे तो शेवटचा भेटला होता, तिथे येऊन त्याच वेळी, त्याच जागेवर, त्याची वाट पहायची.
तिने ठरवलं होत, जोपर्यंत तो लग्न नाही करत, तिही नाही करणार.
कालांतराने तिच्या हातात पत्रिका पण आली, ती त्याच्या लग्नाला आवर्जून गेली, त्याला सुखात पाहून ती, चुपचाप तिथून निघाली. शेवटच पत्र गुलाबी पाकिटात ठेऊन तिने, ती जागा गाठली जिथे ती नेहमी जायची, त्याची वाट पहायची. ते परत कधीच न परतण्याकरता.
तिने ना त्याला जबाबदार धरले ना श्राप दिले. तिच्या शेवटच्या शब्दात पण तोच होता.
दिवस लोटले, नियतीची चाके फिरली, तो लग्न करून फसला होता, लग्नाच्या काही महिन्यातच त्याची धर्मपत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. त्याला माहित होत, त्याच्याकडे अजूनहि तिचा पर्याय आहे. शेवटी जिथे तो तिला सोडून गेला होता, तिथे जाऊन त्याने तिची वाट पाहिली, पण ती कुठेच नव्हती. तिच्या मैत्रिणीकडे गेल्यावर, त्याला घडला प्रकार कळला.
ते गुलाबी पाकीट घेऊन तो तिथेच आला. पाकीट उघडणार तोच तिचा आवाज त्याच्या कानी पडला, त्याने घाबरून पाहिलं, गुलाबी पाकीट हातातून गळून पडल.
ती समोर उभी होती, "मला माहित होत, तू येशील, एकदा तरी पाठीमागे वळून पाहशील, पण, आता माझ्या पाठी नको येऊस , परत फिर, आयुष्य सुंदर आहे....
तो तिथेच कोलमडून पडला, गुलाबी पाकीटाजवळ.
ती त्याला जगायला शिकवून गेली होती.....

प्रिया सातपुते









Wednesday 26 September 2012

आयुष्य खूप सुंदर आहे...

कधी कधी वाटत आयुष्य जगायचंच राहून गेल आणि कधी वाटत बसं, खूप झालं, थकून गेले मन, शरीर आणि आत्मा...पण, खरच, अस आहे? अस घडत?

ज्या शरीरावर मी अतोनात प्रेम करते, ज्या चेहऱ्याला मी रोज आरश्यात निहारते...त्याच्यावर मी थकेन ?
आणि उत्तर अर्थात "हो" असेल. रोज मी या मनासोबत नवे नवे खेळ खेळत असते...कधी प्रेमाचा? कधी भावनांचा? तर कधी स्वतःसोबत चालू असलेल्या दंद्वाचा.

रोज सकाळ होते आणि नवा दिवस नवा डाव मांडतो, मग त्यात मीच प्याद असते...आणि मीच राणी!!
मीच ठरवते कि कोण जगणार आणि कोण....!!
आयुष्य इतक सोप्प का नाही? मर म्हंटल कि मरता याव अन अनंतात विलीन होऊन जाव.

खरेच का आत्मा असेल? मग या करता पण मरूनच पहाव लागेल ना ? तस पण, एकदा मरण ज्याला चुकले त्याला ते परत हे येतच..मग पटकन का येत नाही?

देवाने इतके का क्रूर बनावे? यातना देताना तो एक पत्र का देत नाही? खुपजण बोलतात कि पुनर्जन्माचे कर्म या आयुष्यात पण भोगाव लागत. मग, तो जन्मालादेखील न आलेल्या पाखरांना पण का घेऊन जातो? पापी लोकांना खूप श्रीमंत आणि आनंदात ठेवतो, आणि प्रेमळ लोकांना झटक्यात घेऊन जातो.
त्रास न होता मरण येन ह्यातच सुख आहे, तर तो प्रत्येक क्षणाला का मरण दाखवतो? एकदाचा घेऊन का जात नाही?

आयुष्य खूप सुंदर आहे...पण त्यात हा पण नसता तर ते खूपच रटाळ झाल असत..सगळ्याच जर ऐश्वर्या सारख्या सुंदर असत्या तर मग हेली बेरी पण नसती ना!! म्हणून बोलल जात, मनाला जिंका,...
म्हणजे कधीच नाही वाटणार कि आयुष्य जगायचं राहून गेल....
Keep fighting,
Keep loving,
Keep praying
       &
Keep believing
प्रिया सातपुते

प्रतिबिंब


आज आरश्यातल प्रतिबिंब;
माझावरच हसतंय,
कोण तू? 
म्हणून मलाच प्रतिसवाल करतंय,
आज माझ प्रतिबिंब मलाच हसतंय....
का? कोणास ठाऊक? 
ते एकटच का हसतंय!
खुदकन हसून ते मलाच चिडवतंय,
आज माझ प्रतिबिंब माझ्याशीच गेम करतंय!!

प्रिया

Sunday 16 September 2012

पाऊस पडून गेल्यावर.........


 पाऊस पडून गेल्यावर.........
तुझी चाहूल लागते,
झाडाखाली रुसून बसलेल
माझ मन मग,
आणखीनच फुगून बसत,
तुझ्या चेहऱ्यावर पडलेल्या,
टपोऱ्या थेंबाना त्याला,
स्पर्शायचं असत,
पण, गालावरच्या माझ्या 
लाल रागाकड पाहून ते तिथेच थांबत.

पाऊस पडून गेल्यावर.........
एक नवा गारवा फुललेला असतो,
पक्षी पंखावरचे चिंब पाणी फडफडतात,
माझ मन ही मग एक कटाक्ष तुझ्यावर टाकते,
पण, माझ्या चिंब शरीराकड पाहून,
माझ मन हसत मात्र नाही.

पाऊस पडून गेल्यावर.........
इंद्रधनू आकशात सजत,
आकाश पण खुश होऊन,
त्याचे रंग फुलवत,
हळुवार पाऊले टाकत,
तू माझ्यासमोर कान पकडून हसतोस,
मी आणि माझ मन मात्र एकदम तटस्थ असत.

पाऊस पडून गेल्यावर.........
सूर्य पण हात पसरवतो,
फुले पण मग ओलीचिंब असूनही,
फुलापाखरांना साद देतात,
तुझ्या हसऱ्या ओलसर,
चेहऱ्याकडे पाहून मग,
माझा ही राग वितळून जातो.

पाऊस पडून गेल्यावर.........
रुसलेल माझ मन,
पावसानंतरच्या गारव्यात,
विलीन होऊन जात.

-प्रिया सातपुते

Saturday 15 September 2012

पाऊलवाट




मनाच्या पाऊलवाटे वर
उभे आहे कोणीतरी, 
कटाक्ष प्रेमाचा 
करतो आहे प्रवास कमी,
प्रवासाच्या या रगाड्यात 
उभे आहोत आपण दोघेही एकाच पाऊलवाटे वर 
पण,
पाऊलवाटे वर चालू शकतो 
फक्त एकच व्यक्ती, 
पाऊलवाटेच्या या प्रवासात 
कोणी प्रथम चालायचं?
हाच होत आहे एक गम्य प्रश्न,
आणि प्रश्नच उत्तर देतोय आपण दोघेही एकच....


प्रिया 

चारोळी


क्षितिजाच्या पुलावरून चालताना 
हे जग एकटच असत,
वास्तवाच्या पूलावरून चालताना मात्र
आपणच या जगात एकटे असतो.

-प्रिया 

चारोळी



आज मरणाला मला सांगायचय
प्रत्येक क्षण मला फुलवायचाय
फुललेल्या क्षणांत रंग उधळून
मला पुन्हा एकदा जगायचाय


प्रिया 

प्रश्न

प्रेम आणि अपेक्षा 
ह्या एकमेकांना पूरक असतील तर 
नाती अबाधित राहतात...
पण जेव्हा अपेक्षा उपेक्षा बनते 
तेव्हा नक्की घडत तरी काय ?

प्रिया 

अशीच सुचलेली कविता



तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या
अश्रुंना मला थोडस चाटून पहायचय
का?
तर ते खारटच आहेत कि तिखट
हे मला तपासून पहायचय.

तुझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या
रेषांना मला स्पर्शुन पहायचय
का?
तर त्या चिंतातूर आहेत कि रागावलेल्या
हे मला पहायचंय

तुझ्या आसुसलेल्या हातांना
मला घट्ट पकडायचंय
का?
तर त्यांना हातात घेऊ कि गालांवर हेच मला उमगायचंय.


प्रिया


Thursday 13 September 2012

शायरी



ये तनहायीया  सिसक रही है
मेरे अरमानो की मौत पर
उम्मीद है मुझे
तुम उनपर फूल रखने तो जरूर आओगे!!

चारोळी


तुझ्या अर्धवट
पाणी भरलेल्या डोळ्यात
बघण्याच माझ साहस नव्हत
कारण माझच चुकल होत.

-प्रिया

चारोळी



वाहतो आहे वारा 
शुभ्र  वाळवंटात 
पडतो आहे मी 
निस्सीम प्रेमात.

-प्रिया  



Monday 3 September 2012

Dedicated to Friend



काही अनोळखी माणसे
हळूच आपल्या आयुष्यात येतात 
मांजर पावलांनी हळूच
आपल्याला एका नवीन दुनियेत घेऊन जातात
चेहऱ्यावरच हसू कधी थांबतच नाही
जणू आपण रडण विसरून जातो...
सिगारेटच्या धुरात आयुष्य कस सुंदर दिसत जणू हेच ते शिकवतात
वेगासच्या क्लब मध्ये मज्जा करायला शिकवतात
छोट्या छोट्या गोष्टीत टोमणे मारून हसायचं कस हे शिकवतात
काही माणसे स्वतःचा बर्थडेची आठवण करून देतात
ROFL करत शुभेच्यांची वाट पाहत असतात
काही माणसे अशीच असतात जुन्या वाईन सारखी
जितकी कुजलेली तितकीच गोड आणि महाग असतात...



प्रिया