Saturday 25 July 2015

प्रियांश...६६

या जगात काय खर अन काय खोट? याची प्रचिती प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पद्धतीने घ्यायची. या जगात खरेपणाला न्याय नाही, हे जरी खर असलं तरीही आत्म्यात मुरल्याप्रमाणे हा प्रामाणिकपणा कुठे निघून देखील जात नाही. खरेपणाने काम करत, मुंडी खाली घालून, वाटेल ते सोसनारयांची कमी नाही…रोज स्वतःचा अपमान पोटात घालून ते मन मारून काम करतात तेही या पोटासाठीच!! पण, एकदाचं मनातली भीती सोडून, वाणीत प्रामाणिकपणाचे आवाहन कराच…मग, जे व्हायचं ते होऊ देत…स्वतःच्या आत्मसन्मानापुढे कोणालाही जुमानू नका…एकदा स्वतःला मान द्या, प्रेम द्या अन दयेच्या फाटक्या कपड्यांना फेकून आत्मसन्मानाने बहरणारे रंगबिरंगी कपडे घाला, त्यांचा श्वास तुमच्या फुफ्फुसात असा साठवा की बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत गुलामी नष्ट होईल…अन तुम्हाला तुमच्यातला खरा स्वः जाणवेल… 

प्रिया सातपुते 

Friday 17 July 2015

प्रियांश...६५

दोस्तीत अन प्रेमातली गद्दारी एकंच ना? साला ही दुनियाच न्यारी, ज्याच करावं भल, तो म्हणतो आपलच खर! मागच्या जन्माची कर्म की पाप म्हणू, पाठीत सूरा मारणारीच जास्ती भेटलीत या छोटयाश्या आयुष्यात! प्रेम करणारी हातातून क्षण निसटून जातात तशी निसटून गेलीत…

आज पाऊस, मनाला सोलवटून गेला, सर्रकण काळजात कोणी सूरा खुपसला असचं वाटलं. मैत्रीत माणूस काही पाहत नाही,… जोरदार मुंबईचा पाऊस, गुडघाभर पाण्यातून वाट काढत, हॉस्पिटलमध्ये अडमिट केलेल्या मैत्रिणीला, औषध देण्याआधी खाण्यासाठी काहीच नाही याचीच चिंता मनात होती…पूर्ण रात्र तिच्यापाशी काढली, मनात कुठेच परकेपणा नव्हता, होत ते फक्त मैत्रीसाठीच निरपेक्ष प्रेम! पण, काळ बदलतो पण, हा पाऊस आठवणीही तश्याच बरसवतो.…मनाला थंडावा न देता मैत्रीत स्वतःचा वापर करून देल्याचे दाखले द्यायला, तू किती मूर्ख आहेस हे सांगायला पाऊस बरसतो…आठवणींची, विश्वासघाताची झळ द्यायला बरसतो… 

प्रिया सातपुते 

Wednesday 15 July 2015

शायरी...

काश कोई समझ पाता
हम पत्थर नहीं इंसान है
तो इस जिंदगीके
नूर ही कुछ और होते!

प्रिया सातपुते

Friday 10 July 2015

सल...

कधी कधी वाटत
माझा प्रामाणिकपणा
प्रेमातही नडला
अन आयुष्यातही...

प्रिया सातपुते