Sunday 27 March 2016

प्रियांश… ७२

देवाने काहीना खूप चांगली स्मरणशक्ती वरदान म्हणून दिलेली असते. पण, अश्या वेळी मग फारच गोची होते जेव्हा तुम्हाला आवर्जून काही गोष्टी विसरायच्या असतात त्या तुम्ही कधीच अगदी मरेपर्यंत विसरू शकत नाही. चार पाच वर्षांची असेन तेव्हा काय कळतय, तरीही थोड का होईना कळायचच. कुठल्याश्या बाहुलीवरून बोलन सुरु होत, तेव्हा त्या बार्बी खूप महाग असायच्या, मलाही एक तरी बार्बी तेव्हा हवी होती, त्यावर माझ्या अगदी जवळच्या नात्यातील एका स्त्रिने  मला टोला लगावला होता, "त्यासाठी लायकी लागते". काही कळल नाही, हसत हसत मम्माला जाऊन विचारलं, मम्मा लायकी म्हणजे काय? तेव्हा मम्माने विचारलं, अन त्यावर तिला खूप राग आलेला मी पाहिलं होत, भांडण नको म्हणून तिने शांतपणे घेतलं पण, त्यावेळी मनाशी चंग बांधला माझी लायकी काय आहे हे यांना दाखवून देईनच! प्रत्येक परीक्षेत चांगले मार्कस मिळवून, आयुष्यात पुढे जात, न बोलता मी त्यांना माझी लायकी दाखवून दिली, स्वतःच्या हिमतीवर मुंबईत एकटी राहिले, कोणाचाही वशिला न घेता नोकरी केली, एम.बी. ए देखील स्वतःच्या पैश्याने केल, पहिल्या पगारातून महागडी बार्बी भाचीसाठी घेतली, त्या बार्बीकडे पाहून सुद्धा लायकी हा शब्द आपसूकच माझ्या ओठांवर हसू उमटवून गेला होता.

At last thank you lady, I'm glad you said that word to me, because of you, I'm better human being than you. And one day, I'll tell you with a smile on my face that you said this to me.

प्रिया सातपुते