Sunday, 3 July 2011

नेट-प्रेम भाग-१रोजच्या प्रमाणेच पहाटेचे चार वाजले होते...डोळे कंप्यूटर स्क्रीन कडे पाहून थकून गेले होते...तरी पण तिच्या हातांची बोटे काही थांबत नव्हती... फायनली याहू चा स्टेटस अवे करून मॅडम श्रेया उठल्या...चोर पाऊलांनी किचन मध्ये जाऊन, एखाद्या मांजरी प्रमाणे दूध शोधून कॉफी बनवू लागल्या...कॉफी बनवून तिचा सुगंध नाकात साठवून एक एक घोट घेत ती पुन्हा रूम कडे गेली...डायरेक्ट गॅलरीच दार उघडून आकाशात एक टक पाहत राहिली.

कॉफी संपल्यावर पुन्हा कंप्यूटर जवळ येऊन ती साइन आउट मरणार तेवढ्यात एक विंडो पॉप अप झाली...ती विंडो क्लोज़ करणार इतक्यात तीच लक्ष आयडीकडे गेल..मग का कोण जाणे तिने मेसेजला रिप्लाइ केला...पहाटेचे सहा वाजून गेले होते, घरी सगळ्यांच्या उठण्याची वेळ झाली होती, पटापट पीसी बंद करून मॅडम पांघरुन घेऊन झोपी गेल्या.

नेहमी प्रमाणे आई ने पीसी वर हात ठेऊन पाहिले, काही ना बोलता आई रूम मधून निघून गेली....सुटकेचा श्वास टाकून मॅडम श्रेया झॉपी गेल्या. डोळे उघडले तेव्हा जाणवल की बारा वाजले आहेत...थोडीशी वैतागुनच उठली आणि पटापट जाऊन कॉलेज ला जाण्याकरता तयार झाली... डायनिंग टेबल वर येऊन गोंधळ घालन तर तिचा जन्म सिद्ध हककच होता; जो ती रोज न चुकता करायची. आई आज थोडी गरम होती तापलेल्या पीसी सारखी...आई ने श्रेया ला सुनवल " हे बघ श्रेया टेबल वर सगळ काही आहे, जे बनल आहे, जर तुला आवडत नसेल तर लवकर उठून स्वतः बनवून खात जा", आई चा चढलेला पारा पाहून श्रेया ने निमुटपणेआहे ते खाऊन कॉलेज मध्ये पळ काढला.

घरी आल्यानंतर थोडा वेळ आई सोबत गप्पा टप्पा करून श्रेया अभ्यासाला निघून गेली.....रात्री फ्री नेट अवर्स सुरू झाले की सेल वर मिस्डकॉल्स यायला सुरू व्हायचे...त्यात तिचे मित्र मैत्रीण सहभागी असायचे...नेहमी प्रमाणे पीसी वर टीपी करता करता तिने पहिले काल ती ज्याच्याशी चॅट करत होती ती सो कॉल्ड "पटापट_बोला" व्यक्ती पण ऑनलाइन होती... कालचे पटापट बोला सोबतच चॅट अठवून ती हसली आणि तिने पटापट ला पिंग केल आणि गप्पांचा ओघ सुरू झाला,...
हाऊ आर यू ? हाऊ वॉज यूवर डे ? ते लाइक्स, डिसलाइक्स.....बरीच चर्चा सुरू होती.... तिच बाकीच्या कॉलेज फ्रेंड्स सोबत पण चॅट सुरु होत....अचानक काय झाले कोणास ठाऊक पटापट सॉब्त बोलताना कॅस्ट विषयावर बोलताना ती आक्रमक बनली......कॅस्ट,आरक्षण,विरोध प्रदर्शन ते डाइरेक्ट आरक्षण असं कस बरोबर आहे ते ही त्या पटापट ला सांगत होती....बिचारा पटापट काही न बोलता फक्त हम्म ह्म्म्म ...बरोबर आहे तुझ...या पलीकडे काही बोलण्याची हिंमत करत नव्हता.......फाइनली त्याने तिला म्हंटल मॅडम तुम्ही वकीलीमध्ये का जात नाही...मी एल.एल.बी.च करत आहे पटापट, यावर दोघांनीपण स्माइली पाठवून हसून घेतल.....श्रेया ने पटापट ला विचारलं तुझ खर नाव काय आहे, इतके वेळपासून बोलत होते पण दोघांनी एकमेकांची नावे पण विचारली नव्हती ....पटापट ने नाव संगितल...मी श्रीकांत उर्फ श्री...सगळे मला श्रीच म्हणतात ...मी इंजिनियर आहे आणि सध्या इन्फोसिस मध्ये काम करत आहे....मी श्रेया उर्फ श्रेयाच, मी एल.एल.बी.लास्ट एअर करत आहे..........

गप्पांच्या ओघात २ वाजून गेले होते...आईचा ओरडा खायची इच्छा नव्हती म्हणून श्रेया ने श्रीला टा टा करून विंडो क्लोज़ केली.....ती साइन आउट करणार इतक्यात पुन्हा श्रीचा मेसेज पॉप अप झाला, श्री विचारत होता, उद्या भेटशील का चॅट वर...तिने हो करून गुड नाईट, स्वीट ड्रीम्स ..टाकून साइन आउट केल...पीसी बंद करून....मॅडम आज लवकर झोपी गेल्या.

प्रिया सातपुते