Friday, 25 May 2012

नेट-प्रेम भाग- १०


श्री आणि श्रेया हे एक समीकरणच बनून गेल होत. कित्येक महिने लोटून गेले होते, रोज सकाळी गुड मॉर्निंग कॉल किंवा मैसेज शिवाय दोघांचा दिवस सुरू होत नसे, लंच टाइम ला आवर्जून श्रेया त्याला कॉल करून जेवलास का विचारायची, कारण तिला श्री नावच हे पात्र खूप छान पैकी समजल होत..तो कधी उठतो? कधी चहा बनवतो? ऑफीस ला कधी निघतो? ऑफीस मध्ये किती कलिगस आहेत? बेस्ट फ्रेंड्स? आणि बरचं काही. 

प्रेम हे कधीच एक तरफा असूच शकत नाही, समोरच्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा हक्काने आपले मानता तेव्हाच सुरू होतो दोन जीवांच्या नात्याचा प्रवास.

श्री पण तितकाच काळजी करणारा, रागवाणारा, समजवणारा होता, ती जिथे पडती वाटते तिथे तो खंबीरपणे तिला सपोर्ट द्यायचा. श्रेयाचे प्रिलिम एगझाम होणार होते, पण मॅडम ना स्टडी करायचा काही मूड होत नव्हता, बघेल तेव्हा मूवीस, शॉपिंग, क्लास बंक करून लॉंग ड्राइव्स, अशी नाटक सुरू होती. श्रीला सार कळत होत पण तो काही बोलत नव्हता, श्री ला श्रेया ने ऑफीस मधून निघताना कॉल केला पण का कोणास ठाऊक त्याने कॉल रिसीव न करता कट केला, श्रेया ने पुन्हा केला श्री ने पुन्हा तेच केल, मग मात्र श्रेया ला खूप राग आला होता, पण तिला माहीत होत की तो कॉल करणार म्हणून ती टेरेस  वर त्याच्या कॉल ची वाट पाहत बसली....रात्रीचे 7.30 वाजून गेले होते, आईच्या हाका ऐकू येत होत्या तस तिने आईला संगितल की स्टडी करून झालाय थोडा वेळ रिलॅक्स करून येते खाली...एक्झाट ७.४५ ला तिचा सेल ब्लिंक होऊ लागला, तस तिने झटकन कॉल उचलला...
श्री- हाय 
श्रेया- काय हे, कधीची वाट पाहतेय मी तुझी, आहेस कुठे तू?
श्री- काम होत
श्रेया- अजूनपण ऑफीस मध्येचं होतास? 
श्री- हो..थोडा वेळ झाला येऊन
श्रेया- ह्म्म्म...काही झालय का?
श्री- नाही
श्रेया- एनी प्रॉब इन ऑफीस? 
श्री- नो, एवेरितिंग इज फाइन
श्रेया- मग तू आज असा का बोलतोयस? मूड ऑफ आहे का?
श्री- नाही ग. काम जास्ती होत ना म्हणून थोडा थकलो आहे
श्रेया- पक्का?
श्री- हो,  एगझाम प्रिपरेशन कसे सुरू आहेत तुझे?
श्रेया- अअअं...छान सुरु आहेत 
श्री- खर बोलतेयस तू?
श्रेया- ऑबविओउसली करतेय मी, तू अस का विचारतोयस पण
श्री- हल्ली मी पाहतोय तुझ आउटिंग जास्ती आणि अभ्यास कमी झालाय
श्रेया- नाही रे
श्री- हे बघ श्रेया आउटिंग कर पण...
तितक्यात श्रेया ने त्याला टोकल आणि म्हणाली,
श्रेया- माझा अभ्यास आहे, मला पण आहे काळजी
तसा श्री भडकला...
श्री- माझ बोलन पूर्ण होई पर्यन्त एक शब्द बोलायचा नाही तू, गेले ३ आठवडे पाहतोय मी तुझ, इकडे जा, तिकडे शॉपिंग कर, मूवीस ना जा, कॉलेज बंक, घरी खोट बोला, १५ दिवसानी प्रिलिम आहे तुझी तुला काही वाटत आहे कि नाही, ऑल द टाइम नेट, चॅट, आज पूर्ण दिवस तू बाहेर फिरत होती, लाइफ एन्जॉय कर पण अशी?? खोट बोलून? आई बाबांना फसवून? एक सब्जेक्ट तरी पूर्ण रेडी आहे का तुझा?
श्री ची कपाळाची नस दिसत होती...श्रेया जरी ते पाहु शकत नव्हती पण तिला समजून चुकल होत की तो खूप चिडला आहे.
श्रेया- तू इतका का चिडतो आहेस, अरे मी करतेय स्टडी
श्री- (आवाज आणखी कठोर होत) हे बघ श्रेया तुला माहीत आहे मला खोट बोलन आणि ऐकन अजिबात आवडत नाही
श्रेया- अरे पण थोडा चेंज हवाच ..
श्री ने तिचं वाक्य पूर्णच होऊ दिल नाही,
श्री- चेंज ह्म्म्म, दिवसाचे 24तास, त्यात तू झोपतेस ८ तास, नेट वर असतेस ५ तास, टी.वी. पाहतेस २ तास, कॉलेज ला बंक मारण्यापासून ते मूवीस साठी तू देतेस ८ तास...आता त्यात उरला १ तास त्यात तू माझाशी बोलतेस आणि तुझा अभ्यासाचा वेळ वाया जातो...म्हणून मी ठरवल आहे की आज पासून तुझे एगझाम होईपर्यन्त मीच तुझाशी बोलत नाही. 
श्रेया- तू वेडा आहेस का...अस थोडीच असत… 
श्री- हो असच असत..आता मी फोन ठेवतोय आणि मी आशा करतो की तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ ना काढता नीट अभ्यास करशील, चल मला बाहेर जायचय, खूप कामे आहेत, बाय; गुड नाईट, स्विट ड्रीम्स!!
श्रेया- श्री...अरे ऐकून तर घे..
आणि कॉल कट झाला..तसा श्रेया चा चेहरा काळा निळा पडला...तिला खूप राग आला होता..मूर्ख...समजतो काय स्वतःला .पाय आपटात ती खाली टी.वी. पाहायला निघून गेली.

टी.वी. पाहाताना पण तिला श्रीच शेवटच वाक्याच ऐकू येत होत..नेहमी प्रमाणे मॅडम याहू ला गेल्या, श्री ऑन लाईन होता. तिने त्याला पिंग केल तसा त्याच स्टेटस बिज़ी झाला. तरीपण ती त्याला मैसेज करत होती..शेवटी श्री ऑफलाइन गेला..तशी श्रेया खूप हिरमुसली...पीसी बंद करून ती बाल्कनी मध्ये जाऊन बसून गेली, हळूच पुन्हा एकदा तिने श्री ला कॉल केला पण त्याने उचलला नाही..ती डोळे मिटून शांत विचार करत होती आणि तशीच झोपी गेली.

सकाळी ना श्री चा मैसेज आला ना कॉल पण श्रेयाने त्याला विश केल, दुपारी कॉल केला, ना ती फ्रेंड्स सोबत फिरायला गेली ना बंक मारला..श्रेयाने इवनिंगला पुन्हा श्री ला कॉल केला पण तो उचलतच नव्हता, तिचा धीर आता सुटत चालला होता, डोळे पाण्याने डबडबले होते, तिचा गळा कोरडा पडला होता. तोच श्री चा कॉल आला..
श्री- आय एम सॉरी
श्रेया ओक्साबोक्शी रडायला लागली...तिला धड नीट बोलता पण येत नव्हत,
श्री- श्रेया प्लीज रडू नकोस
श्रेया- तू असा कसा करू शकतोस, जीव घेणार होतास का तू माझा?
श्री- माझी शप्पाथ आहे तुला पुन्हा अस बोलशील तर!
श्री चा आवाज पण रडवेला झाला होता,
श्रेया- मग का अस?
श्री- तुझा भल्या साठी श्रेया, तुझ लक्ष नाहीय हे मी खूप दिवसापासून पाहतोय, तुझी काळजी आहे मला... 
श्रेया- म्हणून तू माझ्याशी बोलला नाहीस, तुला माहितेय एक एक क्षण कसा गेला आहे, इतके कॉल मैसेज केले मी तुला! तुला थोडी तरी काळजी असती तर तू एक कॉल आन्सर केला असता (रडत रडत) तुला माहितेय..
श्री तीच माहितेय ना ऐकताच बोलू लागला, "माहितेय मला सार मी खूप वाईट आहे ते, पण तरी सुद्धा खूप प्रेम करतो मी तुझ्यावर आणि म्हणूनच हक्काने तुला सांगाव तर कस या कोड्यात अडकून पडलो होतो
श्रेया- काय म्हंटलास तू??
श्री- अडकून पडलो. 
श्रेया- त्याच्या आधी?
श्री- वाईट आहे. 
श्रेया- ते नाही मध्ये ??
श्री- हो ग बाई मी प्रेमात पडलो आहे तुझा!!
श्रेया स्वतःलाच जोरात चिमटी काढते आणि ओरडते आउच!
श्री- काय झाल? 
श्रेया- काही नाही, मी स्वप्न पाहत नाहीय ना ते पाहण्याकरता चिमटी घेतली. 
श्री- बावळट आहेस का तू? 
श्रेया- हो बावळट तर आहे मी तुझा प्रेमात!!
श्री- काय म्हणाली तू?
श्रेया- जे तू ऐकल!
श्री- ह्म्म्म
श्रेया- मी पण खूप प्रेम करते श्री तुझ्यावर!
दोघे पण मन मोकळ करून बोलले...श्रेया ने पण कबूल केल की ती अभ्यासाकडे लक्ष देईल...तसा श्री निर्धास्त झाला.

श्रेया आणि श्री हे आता खरचं समीकरण बनून गेलेत...
श्रेया+श्री=श्रीया...


प्रिया सातपुते