Thursday, 15 November 2012

नेट-प्रेम भाग-१९


श्री मंग्यासोबत फ्रेश होण्याकरता निघून गेला, जायचं त्याच्या मनात नव्हतच मुळी पण श्रेयाच्या पुढे त्याच काही चाललं नाही. श्री आल्यापासून बाईसाहेबांचा नूरच पालटला होता. आई आणि वाहिनी श्रेयाला टोमणे ऐकवत बसल्या होत्या. डॉक्टर आल्यावर दोघी गप्प झाल्या. डॉक्टर श्रेयाशी बोलत होते, श्रेयाचा चेहरापण हसमुख झाला होता. तितक्यात दादा आला, आणि डॉक्टरांनी त्याला विचारून टाकलं, " काय ठरलं आहे, लवकरात लवकर आपल्याला ऑपरेशन करायचं आहे." दादा नुसताच हु केला, तोच वहिनींनी सारवा सारव केली. श्रेयाला एकंदरीत सर्वांच वागण खटकल.

तितक्यात बाबा आले, श्रेयाने आधीच प्रश्नांचा भडीमार सुरु केला होता. कोणाचीही हिम्मत होईना श्रेयाला कसं सांगायचं? बाबांनी सगळा धीर एकवटून श्रेयाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले," श्रेयू! बाळा तुला सगळी उत्तरं मिळतील, असं बोलत बाबांची जीभ अडखडली.. 

श्रेया- बाबा!! काय झालं आहे सांगाल का? 
बाबा शांतच राहिले, तशी ती कावरीबावरी झाली," दादा तू तरी बोल काय झालं आहे?"
दादा- श्रेयू, तू शांत हो आधी..
श्रेया- घाबरू नका मी नाही घाबरणार, काही सीरियस आहे का?
आईच्या पांढऱ्याफट पडलेल्या चेहऱ्याकडे पाहून श्रेयाला जाणवलं कि गडबड आहे.
शेवटी तिने बाबांचा हात डोक्यावर ठेवत म्हणाली," माझी शप्पथ आहे तुम्हाला बाबा!!"
बाबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, श्रेया बाबांचा हात धरूनच होती तसा दादा ओरडला आणि पुढे आला, " श्रे ! युटेरियन कॅन्सर आहे तुला."
क्षणार्धात श्रेयाच्या डोळ्यासमोर अंधारी आली....दादाने पुढे होऊन तिला आपल्या कुशीत घेतलं, आणि तो तिला समजावत होता,....

आयुष्यात काळा रंग खूप महत्वाची भुमिका बजावतो, अश्या क्षणांना तो याच भयाण शेडमध्ये न्याय देतो...पण कशासाठी दुखाची तीव्रता दाखवण्यासाठी? हसतं खेळत असणारी ही कळी, नुकतीच उमलली होती, चहुबाजूंनी ती आसमंतात सुगंध दरवळत होती....आणि एका क्षणांत ती खुडून पडली होती.

श्रीला यायला थोडा उशीर झाला होता, मंग्या त्याला पोटभरून खाल्याशिवाय हलूच देत नव्हता. अमोलला फोन करून त्याने ऑफिसमध्ये रजा टाकायला लावली, श्रे साठी द्राक्षे घेऊन तो हॉस्पिटलमध्ये पोहचला. वातावरणातला तणाव त्याला स्पष्ट जाणवला. श्रेया निपचित पडून होती, श्रीने येऊन तिला हसवण्याचा प्रयत्न केला पण, ती प्रतिसाद देत नव्हती, कोणीच काही बोलत नव्हत. आई आणि बाबा डॉक्टरांकडे गेले होते. दादा आणि वाहिनी पण एकदम शांत वाटत होते. द्राक्ष धुऊन घेत सगळ्यांना वाटताना, तोच श्रेया हलक्या आवाजात म्हणाली, "मला श्री सोबत महत्वाचं बोलायचं आहे."

श्रीला काही समजत नव्हत, तो विचारणार इतक्यात दादा श्रीच्या खांद्यावर हात ठेऊन बाहेर उठून गेला. तशी वाहिनीपण इच्छा नसून पण, दादाच्या मागे बाहेर गेल्या.
श्री- हे घ्या बाईसाहेब, तुमच्यासाठी आणली आहेत हि द्राक्ष..
श्रेया - हम्म..
श्री- दादा वाहिनीला बाहेर का जा म्हणाली तू? भांडण केलं कि काय दादाशी?
श्रेया- नाही...तुझ्याशी महत्वाच बोलायचं आहे 
श्रीला समजत होत कि श्रेला सार कळाल आहे. तरीही तो शांतच राहिला.
श्रेया- श्री..
श्री- बोल ना! श्रे !!
मान खाली घालून, डोळे बंद करत श्रेया म्हणाली, " मला माफ कर श्री."
श्री- ऐ, वेडाबाई, मान खाली का घातली आहेस तू?? आणि माफी का मागत आहेस? चुपचाप हे द्राक्षे संपव आता.
श्रेया-(मान वरती करत, हुंदका आवरत) मला कळलंय श्री कि मला....मला माफ कर मी डाव अर्ध्यातच मोडतेय...माझ्यामुळे तू आयुष्यात पुन्हा दुःख सोसू नयेस असचं मला वाटत...रोज रोज मला मरताना पाहून तू जगण विसरून जाशील. ज्या श्रीला मी हसायला लावलं त्याला रडताना नाही पाहवणार मला श्री....प्लीज निघून जा...आणि मला वचन दे ( श्रीचा हात हातात पकडून) कि तू मागे वळून नाही पाहशील. 
इतकं सार बोलून देखील श्रेयाच्या डोळ्यातलं पाणी तिने खूप मुश्किलीने रोखून ठेवलं होत.
श्रेयाचा हात आणखीन घट्ट पकडत, श्री तिच्या डोळ्यात पाहत होता.
श्री- मी वचन देतो श्रे, तुझ्याशिवाय या आयुष्यात दुसर कोणी येणार नाही, मी वचन देतो तुला, मागे कधीच वळून नाही पाहणार, तुझ्यासोबत मला माझं सार आयुष्य घालवायचं आहे. तू शिकवलस मला हसायला, जगायला, आणि एक अडथळा आला म्हणून मी तुला सोडून जाईन अस तुला वाटलच कस श्रे? 
मन पिळवटून टाकणारे श्रीचे शब्द ऐकून सुद्धा श्रेया कठोरपणे बोलू लागली," श्री! कमी माझ्यात येणार, तुझ्यात नाही, माझं स्त्रीत्वच नष्ट होऊन जाईल श्री (मगासपासून तटस्थपणे ती श्रीच्या प्रेमाला सामोरी जात होती पण आता तिचा बंध तुटला होता, हुंदके देत ती बोलतच राहिली) किती स्वप्ने सजवली आपण, एकमेकासोबत सुंदर आयुष्य घालवण्याच स्वप्न, आठवतय तुला आपण आपल्या मुलीच नाव काय ठेवायचं यावर किती मोठी चर्चा केली होती? पण, ती कधीच असणार नाही श्री, मी कधीच आई होऊ शकणार नाही श्री,..
श्रीच्या मस्तकात श्रेचे शब्द भिडत होते...
श्री- कोण म्हणत आहे कि तुझ स्त्रीत्व नष्ट होणार? गर्भाशय काढला जाणार म्हणजे तू स्त्री नाहीस असं कोण म्हणालं तुला? तू एक अप्रतिम मुलगी, बहिण, मैत्रीण, नणंद , सखी आहेस....आणि पुढे तूला माझी बायको पण बनायचं आहे, आपण दत्तक घेऊ मुलं, आणि तूला आई बनण्यापासून हा कॅन्सर रोखू शकत नाही. माझी श्रे एक फायटर आहे, कधीही हार ना मानणारी,....
श्रेयाचे अश्रू पुसत श्री तिला समजावत होता. श्रेयाच्या मनावरच्या नकारात्मक विचारांना श्री प्रेमाने दूर सारून आपल्या श्रेला पुन्हा जगायला शिकवत होता.

श्रेया आणखी काही बोलण्याआधीच, श्रेयाच्या कपाळावर ओठ टेकवत श्री म्हणाला," श्रे ! तूच माझा भूत, तूच माझा वर्तमान आणि तूच माझं भविष्य!!" 

प्रिया 


Thursday, 1 November 2012

नेट-प्रेम भाग-१८श्रीला समोर पाहून श्रेयाचं सार दुखन छुमंतर झालं होत, अर्थात तिला थोड छान वाटत होत, औषधांना तिचं शरीर साथ देऊ लागलं होत. बाबांच्या चेहऱ्यावरच सावट गडद होत चाललं होत, तशीच काही अवस्था आईची होती. श्री आणि मंग्याने सगळ्यांना नॉर्मल ठेवलं होत. श्रेयाला झोपलेलं पाहून श्री डॉक्टरांच्या केबिन कडे पळाला, पण डॉक्टर राउंडला गेले होते, दुसऱ्या नर्स कडून कळलं कि रिपोर्ट्स आले आहेत. डॉक्टरांच्या केबिन बाहेरच उभा राहिला. डोळ्यासमोर पुन्हा डॉक्टरांच्या केबिनला पाहून सारा भूतकाळ काळ्या भयानक अजगरासारखा त्याला गिळंकृत करू लागला. आईचा चेहरा त्याला दिसू लागला होता...आणि सोबत श्रे...."नाही नाही...श्रे...तू अस मला अर्ध्यात सोडून नाही जाऊ शकत...आईला मी वाचवू नाही शकलो पण आता तुला काही झालं तर मी कसा जगू? आईनंतर तूच सावरलस मला, जगायला शिकवलस, हसायला शिकवलस, स्वप्न पाहायला आणि त्यांना सत्यात उतरताना मला पहायचं आहे तुझ्यासोबत. मी नाही होऊ देणार काही तुला..या देवावर विश्वास ठेवायला तूच शिकवलं मला, नाही तर मी पक्का नास्तिक होतो श्रे, तू बरी हो, तुला लग्नानंतर घरी गणपती बसवायचा आहे ना, तेही करू देईन मी तुला, बाप्पाची मनोभावे पूजा पण करेन.......बाबांचा हात खांद्यावर पडताच श्री दचकला, "बाबा, श्रे उठली का? काय झालं? त्याला हडबडलेल पाहून बाबांनी त्याला घट्ट मिठ्ठी मारली.
क्षणांत त्याच्या मनातल्या सगळ्या भावना त्या मिठ्ठीने शांत झाल्या. 
बाबा- तू आहेस म्हणून श्रेयुच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. 
यावर काहीच उत्तर न देता दोघेही डॉक्टरांची वाट पाहू लागले.
डॉ. मुजुमदार...पाटी एकदम चकाकत होती, आणि याच पाटीच्या दरवाज्यामागे आता श्रेयाचं भविष्य ठरणार होत.

अर्ध्या तासानंतर डॉ. मुजुमदार आले, त्यांच्यासोबत जुनिअर डॉक्टर्स पण होते. थोड्या वेळातच बाबा आणि श्री आत गेले. श्रीला तो दरवाजा ओलांडताना खूप हिम्मत करावी लागली.
डॉ. मुजुमदार- बसा.
बाबा- श्रेयाचे रिपोर्ट्स ?
डॉ. मुजुमदार- हो आलेत, जसं आधीच कळलं आहे कि युटेरियन कॅन्सर आहे, मला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाहीय, कॅन्सरने नांगी पसरवली आहेत आणि याचे दूरगामी परिणाम असू शकतात श्रेयावर.
बाबा- आपण काय करू शकतो? 
डॉ. मुजुमदार- गर्भाशय लवकरात लवकर काढावा लागेल, आणि किमोथेरेपी पण करावी लागणार आहे. 
बाबांचा आता धीर सुटत चालला होता. 
डॉ. मुजुमदार- आपल्याला जितक्या लवकर गर्भाशय काढता येईल त्यावर पुढची ट्रीटमेंट अवलंबून आहे.
श्री जो आता पर्यंत फक्त ऐकत होता, " श्रेया ठीक होईल ना ?
डॉ. मुजुमदार- हे आता सांगण कठीण आहे, तिचं शरीर जर औषधांना योग्य प्रतिसाद देईल तर चान्सेस जास्ती आहेत.
श्री- गर्भाशय सोडून कॅन्सर किती फेलावला आहे?
डॉ. मुजुमदार- small intestine
श्री- म्हणजे तुम्ही तिला वाचवू शकता हो ना? ( श्री थोडा आक्रमक झाला होता)
डॉ. मुजुमदार- यंग मॅन, नक्कीच आम्ही आमचे सारे प्रयत्न करू पण काही गोष्टी देवाच्या हातात असतात. फक्त पेशंटला खूप सहनशीलता दाखवावी लागेल, आणि तुम्हांसर्वांनी  श्रेयाला प्रोह्साहन दिलं पाहिजे.
बाकीच्या साऱ्या गोष्टी बोलून, दोघे बाहेर आले. एकमेकाशी काहीच ना बोलता ते रूम मध्ये आले, श्रेयाला झोपलेली पाहून बाबांनी आईला बोलावून बाहेर घेऊन गेले. मंग्या एकटक श्री कडे पाहत होता. श्रीच्या मनात वेगळाच गोंधळ सुरु होता. काहीच ना बोलता तो थेट बाहेर पडला, टॅकसीकडे हात करत तो ओरडला. त्याच्या तोंडातून फक्त सिद्धीविनायक इतकच निघालं.

श्रेयाचा गाढ विश्वास होता बाप्पांवर, पण श्री नेहमीच तिची चेष्टा करायचा, "काही नसतं हे देव बिवं, मनाचे खेळ माणसाचे"....श्रेया रुसून फक्त एकचं उत्तर द्यायची, "माझी श्रद्धा आहे, तुझा पण बसेलच विश्वास, स्वतःच जाशील एकदा बाप्पांकडे." श्रेयाचे शब्द आठवून त्याच्या डोळ्यात पाणी साठलं. तो बोलून गेला, "असं नव्हत जायचं श्रे ".
मंदिर आलं, या आधीपण तो येऊन गेला होता इथे श्रेयासोबत, श्रेया त्याला ओढून ओढून घेऊन गेली होती. 
आपसूकच त्याची पाऊले पडतं होती, दुपारचे बारा वाजून गेले होते, मंदिराच्या दर्शनाच्या ओळीत उभा राहुन त्याच्या मनात एक वादळ सुरु होत. "मी इथे का आलो आहे, तिथे श्रे उठली आणि मी नाही दिसलो तर पुन्हा,... पण आता मी दर्शन घेऊनच जाईन, प्रसादावर श्रेचा खूप विश्वास आहे, तिच्यासाठी प्रसाद घेऊन जाईन, मग जशी ती म्हणते ना कि बाप्पा सगळ ठिक करतात, मग ती पण ठिक होईल.....मंदिराचा दरवाजा जवळ आला, तसा श्रीचा बांध सुटत चालला होता,...हृदयाची स्पंदने वाढत चालली होती. त्याच्या ओठांवर होत फक्त श्रे, श्रे, श्रे,.....
दरवाजाच्या आत प्रवेश करून श्री सिद्धीविनायकाच्या पुढ्यात येऊन तो उभा ठाकला, इतक्या गर्दीत, पोलिसांच्या शिट्यात त्याला काहीच एकू येत नव्हत, गर्दीने पाठीमागे ढकलला जाऊन तो खांबाला जाऊन थडकला, तिथूनही बाप्पांची मूर्ती त्याला स्पष्ट दिसत होती. मटकन खाली बसून तो नतमस्तक झाला, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या, लहान मुलासारखा तो एकटा बाप्पा समोर त्याच्या श्रेयाला मागत होता. " बाप्पा श्रे खूप विश्वास ठेवते तुझ्यावर, मी नाही करत मी मानतो मी नाही करत, पण ती किती श्रद्धेने तुझं सार करते, तिला नेऊ नकोस, मला घेऊन जा, माझ सार आयुष्य तिला दे, पण तिला नको....आई गेली तेव्हा मी रडलो नाही तुझ्यासमोर कारण मला खूप राग आला होता तुझा, सर्वांचाच, मी काहीच करू नाही शकलो आईसाठी...श्रेला नेऊ नकोस......श्रे ला तुझी स्थापना करायची आहे, मी पण श्रद्धेने सार काही करेन फक्त तू श्रेला..........
दुरून एक आजी श्रीला रडताना पाहून त्याच्या शेजारी येऊन सार काही ऐकत होती, मायेने पाठीवर हात ठेऊन त्यांनी श्रीला सावरलं.
आजी- बाळा! असं धीर सोडून कसं चालेल, देव आपली परीक्षा घेतो, जे काही देतो त्याची आपण किती कदर करतो हे तो पाहतो, बाप्पा सार ठीक करेल बघ, आता ऊठ पाहू, आणि ती कोण श्रे का?? वाट पाहत असेल ना तुझी? जा लवकर घरी...सांभाळ, बाप्पा सार ठिक करेल.
श्री उठून उभा राहिला, डोळे पुसत असताना त्याला जाणवलं कि खूप लोक त्यालाच पाहत आहेत, आणि दरवाजे बंद झाले आहेत, आरती सुरु झाली होती....
बाप्पांनी श्रीला आरतीसाठी थांबवून ठेवलं. 
प्रसाद घेऊन श्री पुन्हा हॉस्पिटल कडे निघाला, त्याच्या मनावरच दडपण दूर झालं होत, मनाच्या दारावर उभ असलेलं मृत्युचं सावट आता त्याला धूसर दिसू लागलं होत.

श्रेया कावरी बावरी झाली होती, एकसारखे तिचे प्रश्न सुरु होते, असं कसं गेला तो न सांगता? त्याचा फोन पण इथेच आहे? कोणी काही बोललं का त्याला? 
तितक्यात श्रीने दारावर नॉक केलं, सगळ्यांना प्रसाद देत तो श्रे कडे गेला, " हे घे प्रसाद आहे."
श्रेया एकटक श्री कडे पाहत राहिली. परत श्रीने तिला उजवा हात पुढे करण्यास सांगितलं. श्रेयाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होत. 

-प्रिया