Friday 27 May 2011

काही मनातले



आज पुन्हा काही लिहावस वाटत आहे, पुन्हा मनाची पाने पिंजून काढावशी वाटत आहेत, रोज रोज तेच आयुष्य जगून आता असा वाटत आहे की कुठेतरी दूर निघून जाव एकटच….
लहानपणी एकालेले परीच राज्य, चॉक्लेटची नगरी; जिथे फक्त सुख भेटेल ; अश्रूचा एक कवडसा पण तिथे नको पडायला.

निरागस पणे आईच्या मिठ्ठीत खूप घट्ट बिलगून रहाव, प्रियकरच्या चुंबनात न्हाहून निघाव.
कितीतरी गोष्टी घडाव्या आणि काही चक्क अजाणत्यापणी घडल्या असतील तर; एखाद्या टाइम मशीन मध्ये  जाऊन सार दुरुस्त करून याव.
पक्ष्यासारख उंच भरारी घ्यावी आकाशात, निळ्याशार सागरात डुबकी मारुन पंख फडफडून दूर आसमंतात निघून जाव.

ध्रुव तारयाला हातात पकडून त्याला विचाराव, कसं वाटत रे एकटच आकाशात रात्रीच्या अंधारात चमकायला?
एखादी रात्र मला चमक देशील का?
एक रात्री करता तरी ध्रुवतारा बनाव आणि चमकत रहाव……….

प्रिया सातपुते 



1 comment:

https://kahimanatale-priyashree.blogspot.com/ said...

ohh...thts strange n funny coinsidence :P

Post a Comment