Friday, 23 October 2015

चारोळी

रात्र सरली
विचारांच्या वादळात
अन पापण्यांची तगमग
ओशाळली आसवांच्या तलावात...

प्रिया सातपुते

Sunday, 11 October 2015

प्रियांश...६९

थैंक यू पाखरांनो...

उद्या पितृ अमावस्या, आपल्या पूर्वजांसाठी उद्या सकाळ पासून बायका माजघरात विविध पंचपक्वाने करतील, मग सार झाल्यावर घरातला कर्ता नैवेद्य ठेवेल, कधी कावळा चोच मारेल अन कधी मी ऑफिसला पळेन ! हेच सुरु असत सर्वांच्या डोक्यात!!

कधी कधी वाटत काय अर्थ आहे या साऱ्याला?
या पेक्षा जिवंत माणसाच्या तोंडात घास भरवा, काही महाभाग जिवंत असताना आई बापाच्या मुखात घास देत नाहीत, अन मेल्यावर असल थोतांड मांडून दाखवतात तरी काय? प्रेम की स्वतःच्या कर्माची भीती? पापातून मुक्त होण्यासाठी चालवलेली अशी थोतांड पाहून या लोकांची कीव वाटते.

अरे पूर्वजांच्या नावावर किती पटीने अन्न वाया घालवतात लोक, द्या तुम्ही कावळयाला पण जे तो खातो ते ठेवा... किती ती नासधुस, शेवटी उरलेले तसंच पडून राहत, ना पक्षी खातात ना किडे मुंग्या, माणसाच्या पायाखालून ते कचऱ्यात पडत...गरीब भुकेल्या मुलांना कचऱ्यात अन्न शोधताना पाहिलय कधी? कोणी थांबवल त्यांना खाऊ नको म्हणून? काय फरक पडतो कावळा खातोय ना पापमुक्त करायला, गंगा काशी आहेच सोबतीला!

थांबवा त्या लहानग्यांना, मी मुंबईत पाहिले होते चिमुकले, त्यांचे मळकट चेहरे, रडवलेले डोळे, भुकेने तरमळत होते...हटकल्यावर म्हणाले होते, "क्या करे दीदी भूक लगी है, आज माल नहीं बिका",...आईवडिल कुठे आहेत वर, "नहीं है दीदी",...क्या खाओगे वर किती मानीपणाने म्हंटले, "भीक नहीं चाहिये दीदी!"
काळजात कट्यार खुपसली अन मन भळाळून वाहु लागल होत. "मैं लेती हूँ क्लिप्स, भीक मत समझो, चलो पहले खालो," तरीही ते पुढे आले नाहीत, शेवटी मी क्लिप्स, कल्चर्स घेतले, "थैंक यूँ दीदी" म्हणत वडापावच्या गाडीकडे पळाले, काय भावना होत्या त्या शब्दात मांडता न येणाऱ्या, त्यांना पुन्हा एकदा हाक देत माझा उजवा हात आपसुकच त्या चिमुकल्यांना सल्यूट करून गेला..त्यांचा आनंदाने ओरडलेला आवाज आजही माझ्या कानात घुमतो आहे..

आयुष्याच्या खूप मोठा धडा शिकवून गेलीत ही पाखरे!
थैंक यू पाखरांनो...

प्रिया सातपुते

Monday, 28 September 2015

कधी एके काळी मलाही मोरपीस हवा होता...

कधी एके काळी
मलाही मोरपीस
हवा होता…

वहीच्या पानात
जपून मलाही
तो पहायचा होता…

कधी एके काळी
मलाही मोरपीस
हवा होता…

स्वतःच्याच गालावरून
मलाही तो
फिरवायचा होता

कधी एके काळी
मलाही मोरपीस
हवा होता…

गुलाबी रंगांच्या स्वप्नांत
त्यान मलाही
गोजारायला हवं होत… 

कधी एके काळी
मलाही मोरपीस
हवा होता…

प्रिया सातपुते

Friday, 25 September 2015

प्रियांश. . . ६८

आयुष्यात गोंधळून गेलेल्या माझ्या मित्र अन मैत्रिणींसाठी, बरेच प्रश्न पडतात, काही सोप्पे अन काही अवघड, त्या प्रश्नांची उत्तरे विचारा, मदत घ्या, कुढत बसू नका! मन मोकळ करा, आयुष्य फक्त एकदाचं मिळत ते योग्य मार्गाने जगा, आता म्हणाल योग्य कसं ठरवणार, जिथे तुमचं अंतर्मन तुम्हांला सांगेलच…

आयुष्याला नवा अर्थ मिळावा 
अन सारा भूत-सुख-दुखः 
क्षणार्धात अंतर्धान व्हाव्या;
अशी काही जादू आहे???
दारू सोडून,
अन हो  सेक्स देखील सोडून!!!
आता यावर उत्तर देऊ नकोस 
आत्महत्या म्हणून!!!
अरे राजा प्रत्येक क्षणात
आनंदाची किक मिळावी विदाऊट ड्रग्स 
अन आता तू म्हणशील,
हे शक्यच नाही,
पण, राजा एकदा मरणाच्या 
दारातून परत ये, 
मग प्रत्येक क्षण,
प्रत्येक श्वास,
नवा नवासा वाटेल,
हवा हवासा वाटेल… 

प्रिया सातपुते 

Sunday, 13 September 2015

शायरी

तेरे ईश्क में यह कैसा जादू है कि
तेरी रूह में सिमट जाऊँ कि
तेरी बाहोंमें खो जाँऊ कि
तेरे दिल में घुल जाऊँ...

प्रिया सातपुते

प्रियांश...६७

माणसाचा चेहरा त्याच्या आयुष्याच प्रतिबिंब असत, त्याने जे काही कमावल-गमावल याच प्रतिरुपच तुमच्या चेहऱ्यावर झळकत. तुम्ही कस आयुष्य जगला, हे तुमचा चेहराच सांगतो! सुखासमाधानाने जगला असाल तर, तुमचा चेहरा आनंद, प्रेमाने ओंथबून वाहतो. अन जर हेव्या-दाव्यात, कलहात, आयुष्य वाया घालवलत तर तेही तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत, मग ते लपवण्यात तुम्ही कितीही दानधर्म करा अथवा पैश्याची मदत! चेहऱ्यावर कितीही रंगरंगोटी करा, मनातला काळा रंग चेहऱ्यालाही काळवंडून टाकतो...

प्रिया सातपुते

Monday, 7 September 2015

चारोळी

रोज आपली नजरा-नजर होते
पण शब्द बोलत नाहीत
ते झुरत राहतात
कधी तू बोलशील या कोडयात?

प्रिया सातपुते

चारोळी

कधी अचानक काय लिहावस
वाटेल सांगता येत नाही
म्हणून मी हल्ली
लिहनच टाळते...

प्रिया सातपुते

Tuesday, 25 August 2015

शायरी


पता है मुझे तेरी नजरे
ढूंढती है मुझे
तरसती है
बाहोमें भरने मुझे...

प्रिया सातपुते

Thursday, 20 August 2015

कविता...

अरे शब्दांनो
आता तरी मला
निजू दया!
तुमच्या अंगाईच्या
पाळण्यात
स्वप्नांच्या गावी
जाऊ दया!
मनाच्या पल्याड
लपलेल्या
माझ्या प्रियकरास
भेटू दया!
चार प्रेमाचे
शब्द
मलाही ऐकू
दया!
अरे शब्दांनो
आता तरी मला
निजू दया!!!

प्रिया सातपुते

Wednesday, 19 August 2015

शायरी

हार गयी हूँ तुझसे जिंदगी
न जाने कब वह मुक्कमल
हासिल होगा?
जहाँ तू मेरे हर गमोंको
फन्नाह कर देगा....

प्रिया सातपुते

शायरी

मियाँ यह हिमाकत तो
हरकोई करता हैं
जिसमें दिन नहीं देखते
सिर्फ इस जालिम दिल
दिखता है।

प्रिया सातपुते

शायरी


कितनी भी दूर भागूँ  तुझसे
पता नहीं क्यूँ तेरे पास ही
आके मंजिले थम जाती हैं
तेरी एक मुस्कुराहट पे
जिंदगी हसीन हो जाती है...

प्रिया सातपुते
https://www.facebook.com/KahiManatale

Tuesday, 18 August 2015

चारोळी

या जगाची रितच न्यारी
काम करणारे
डोळ्यात खुपतात
अन उडपे
डोळ्यात सुखवतात...

प्रिया सातपुते

Monday, 17 August 2015

चारोळी

शब्दांचा पाऊस रोजच पडतो
पण मनातला क्लेश
चिखलासारखा साठून राहतो
ते शरीर मातीत गेल्यावरच जातो...

प्रिया सातपुते

Thursday, 13 August 2015

शायरी

महैक जाने दे मेरी
रुह को इसकदर
की सिमट जाऊ में
तेरी बाहोंमें,
ना किसी आशियाने
की आस हो
ना हिरोजवाहरों की,
बस लिपटी रहू
तेरे लफ़्जोमे,
तेरे आने के
इंतजार में...

प्रिया सातपुते

Monday, 3 August 2015

चारोळी

आज अचानक
खूप काही सुचतय
माझंच मला
अप्रूप वाटतंय

प्रिया सातपुते  

चुटपूट...

ठरवले एक 
हे होऊ द्यायचे नाही 
पण प्रत्येक गोष्टीच्या चाव्या 
आपल्या हाती नाहीत… 

प्रिया सातपुते 


Saturday, 1 August 2015

क्षण...

एक क्षण तो रुसलेला
तुझ्या विरहात रडलेला
आसवांच्या नभाखाली
ओलाचिंब होऊन बागडलेला...

प्रिया सातपुते
https://www.facebook.com/KahiManatale

Saturday, 25 July 2015

प्रियांश...६६

या जगात काय खर अन काय खोट? याची प्रचिती प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पद्धतीने घ्यायची. या जगात खरेपणाला न्याय नाही, हे जरी खर असलं तरीही आत्म्यात मुरल्याप्रमाणे हा प्रामाणिकपणा कुठे निघून देखील जात नाही. खरेपणाने काम करत, मुंडी खाली घालून, वाटेल ते सोसनारयांची कमी नाही…रोज स्वतःचा अपमान पोटात घालून ते मन मारून काम करतात तेही या पोटासाठीच!! पण, एकदाचं मनातली भीती सोडून, वाणीत प्रामाणिकपणाचे आवाहन कराच…मग, जे व्हायचं ते होऊ देत…स्वतःच्या आत्मसन्मानापुढे कोणालाही जुमानू नका…एकदा स्वतःला मान द्या, प्रेम द्या अन दयेच्या फाटक्या कपड्यांना फेकून आत्मसन्मानाने बहरणारे रंगबिरंगी कपडे घाला, त्यांचा श्वास तुमच्या फुफ्फुसात असा साठवा की बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत गुलामी नष्ट होईल…अन तुम्हाला तुमच्यातला खरा स्वः जाणवेल… 

प्रिया सातपुते 

Friday, 17 July 2015

प्रियांश...६५

दोस्तीत अन प्रेमातली गद्दारी एकंच ना? साला ही दुनियाच न्यारी, ज्याच करावं भल, तो म्हणतो आपलच खर! मागच्या जन्माची कर्म की पाप म्हणू, पाठीत सूरा मारणारीच जास्ती भेटलीत या छोटयाश्या आयुष्यात! प्रेम करणारी हातातून क्षण निसटून जातात तशी निसटून गेलीत…

आज पाऊस, मनाला सोलवटून गेला, सर्रकण काळजात कोणी सूरा खुपसला असचं वाटलं. मैत्रीत माणूस काही पाहत नाही,… जोरदार मुंबईचा पाऊस, गुडघाभर पाण्यातून वाट काढत, हॉस्पिटलमध्ये अडमिट केलेल्या मैत्रिणीला, औषध देण्याआधी खाण्यासाठी काहीच नाही याचीच चिंता मनात होती…पूर्ण रात्र तिच्यापाशी काढली, मनात कुठेच परकेपणा नव्हता, होत ते फक्त मैत्रीसाठीच निरपेक्ष प्रेम! पण, काळ बदलतो पण, हा पाऊस आठवणीही तश्याच बरसवतो.…मनाला थंडावा न देता मैत्रीत स्वतःचा वापर करून देल्याचे दाखले द्यायला, तू किती मूर्ख आहेस हे सांगायला पाऊस बरसतो…आठवणींची, विश्वासघाताची झळ द्यायला बरसतो… 

प्रिया सातपुते 

Wednesday, 15 July 2015

शायरी...

काश कोई समझ पाता
हम पत्थर नहीं इंसान है
तो इस जिंदगीके
नूर ही कुछ और होते!

प्रिया सातपुते

Friday, 10 July 2015

सल...

कधी कधी वाटत
माझा प्रामाणिकपणा
प्रेमातही नडला
अन आयुष्यातही...

प्रिया सातपुते

Monday, 15 June 2015

चारोळी

रोज गाते अंगाई
माझी माय
रोज झोपी जातो
चंद्रोबा माझ्या कुशीत...

प्रिया सातपुते

Monday, 8 June 2015

शायरी

हर फलसफे पे तेरा नाम है लिखा
मेरे दिल में है, तेरा ही जसबा
बस यूही चलती रहू, तेरे निशानोपे
तो मिल जाये मुझे जन्नत का रस्ता…

प्रिया सातपुते  

Thursday, 4 June 2015

पावसाला मला काही सांगायचय...

पावसाला आज मला
काही सांगायचय
आभाळभर बरसून
माझ मनही रीत कर
इतकंच त्याला विनवायचय...

प्रिया सातपुते
https://www.facebook.com/KahiManatale

Monday, 1 June 2015

काही मनातल...

रोज दंगामस्ती करणाऱ्या माझ्या मुलांना पाहून मला कधीच वाटल नव्हतं की आताच्या जनरेशनच्या या मुलांमध्ये खोल कुठे तरी भावनांनी भरलेले एक मुल जगत आहे! त्यांच्याशी फक्त त्याचं होऊन बोलल, त्यांच्यातल एक बनून जगल की हळुहळू ते आपलेशे होऊन जातात!

मला जाणवलही नाही अन आपसुकच मी विद्यार्थ्यांना माझी मुल म्हणून मोकळी झाले! माझ्या आयुष्यात ते रोज एक नवी पहाट देऊन जातात!

माझ्या आयुष्य नावाच्या आकाशातली ही पाखरे जणू रोज एक इंद्रधनुष्य बनून, प्रत्येक क्षणाला रंगीबेरंगी करून टाकतात!

Thank you guys touchwood!

प्रिया सातपुते

Saturday, 23 May 2015

चारोळी

आख्खं आयुष्य जात
माणसांची जात विचारण्यात
अन उरलेले क्षण
जळून जातात सरणात…

प्रिया सातपुते


Thursday, 14 May 2015

आई नावाच आकाश...

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित झालेला माझा लेख...

प्रिया सातपुते

Tuesday, 21 April 2015

चारोळी

आज काल माझं मन
आधी सारखं चालत नाही
पायाला चाके लागल्यासारखं
ते सतत धावत राहत…

प्रिया सातपुते 

Monday, 16 March 2015

शायरी

हम लबोसे कह ना पाये
वह नज़र से पढ़ ना पाये
इसी कश्मकश में चल पढ़े तो
रास्ते हमराही हो गए।

प्रिया सातपुते

Saturday, 14 March 2015

प्रियांश…६४

लग्न म्हणजे काय? याची वेगवेगळी उत्तरे आपणास मिळतील…लग्न म्हणजे आईवडीलांखातर घोड्यावर चढणे नव्हे…वय वाढतंय म्हणून नात्यातली माणसे काय बोलतायत म्हणून लग्न करणे नव्हे! लग्न ही माझ्यासाठी तरी व्यवहार करता येणारी गोष्ट नाही, कारण व्यवहार करायचे तर मग लग्न नावाच्या बंधनात अडकायच का? स्वतःला जेव्हा वाटेल हा/हीच तो/ती जिच्यासोबत मी संपूर्ण आयुष्य न कंटाळता जगू शकेन, तिथे नक्कीच सप्तपदी घेऊन संसार थाटावा! आपल्या बाजूचे काय म्हणत आहेत, पाठीमागचे काय म्हणत आहेत, हे पाहण्यापेक्षा आपला मार्ग चालत रहायचा. कुठल्या तरी पायवाटेत अथवा हायवेला भेटेलच प्रत्येकाला त्याचा सोलमेट! म्हणून फक्त पुढे जात रहायचं… 

प्रिया सातपुते 


Friday, 13 March 2015

प्रियांश...६३

सहसा मी कधी क्राईम पेजेस वाचण्याच्या भानगडित पडत नाही! पण, आज पप्पा जोर देऊन वाच म्हणाले, त्यात मम्माने पण जोर दिला! मग, मी ती बातमी वाचली, काही क्षण तशीच बसून राहीले.

मग बायोलॉजी आठवली, डिस्कवरीपण! विंचूची आई आपल्या पिल्लांना पाठीवर पोसते अन तिच पिल्ली मोठी झाल्यावर, खाऊन, नांगे मारून आईला यमसदनास धाडतात! हे सांगण्याच तात्पर्य हेच की आजचा मनुष्य या विचवांच्या पोरांसारखच स्वतःच्या आईवडिलांना पुरेपूर खाऊन टाकतो अन त्यांच्या देहाची, मनाची लत्करे लत्करे करून टाकतो!

कोल्हापुरमध्ये काही दिवसांपूर्वी एका श्रीमंत वृद्ध स्त्रिचा मृतदेह रंकाळा तलावात आढळून आला. पोलिसांच्या चौकशी अंतर्गत आढळून आले होते, त्या तीन दिवसांपासून गायब होत्या! मृतदेहाची ओळख पटवायला त्यांची दोन मुले, सूना, एकुलती एक मुलगी, नातवंड अशी सारी हजर होती, निर्विकार चेहरयाने! एका मुलाने आईच्या अंगावर असणाऱ्या तीस तोळे सोन्याची चौकशी करून, स्वतःच आईच्या अंगावरचे दागिने काढून घेऊन, आईच्या देहाला तीन चार वेळा आलटुन पालटुन खात्री केली की दागिने राहीले तर नाहीत ना? ना आई गेल्याच दुःख, ना आवेग! आईच्या देहासमोरच दोघा भावांचा वाद सुरु झाला, दागिने कोण घेणार? त्यात बहिण सुद्धा आपला हिस्सा मागु लागली! हे सार त्या माऊलीच्या देहासमोर! मेल्यावर एका श्रीमंत घराण्यातील वृद्ध स्त्रिला ही वागणूक मिळत होती मग साधारण कुटुंबात तर बोलयलाच नको! जिवंत असताना काय होत असेल कोण जाने? म्हणून त्यांनी आत्महत्या पत्करली? की त्यांना कोणी मारून टाकल? अशे नाना विचार डोक्यात भुंगा घालत आहेत!

राहून राहून एकच प्रश्न पडतोय, "म्हातारपण कोणाला चुकलय का? सांगा ना ? मग का हा विकृतपणा?
स्वतः च्या आईवडिलांना एखाद्या कस्पाटासमान फेकून द्यायच? वृद्धाश्रमात तर कधी भर रस्त्यात, तर कधी मारून टाकायच...तुम्हीही म्हातारे व्हाल, आयुष्याच बुमरँग पुन्हा फिरेल मग त्याच माऊलीचे हात आठवतील, पाठीवर फिरनारा उबदार वडिलांचा हात आठवेल अन स्वतः चीच कीव येईल अन शेवटी तुम्ही सुद्धा अशेच तरंगाल,...लक्षात ठेवा, कॄतघ्ननांनो, लक्षात ठेवा.....

प्रिया सातपुते

त्रिशा'ज डे आउट

आज हिरमुसलेल्या माझ्या परीला घेऊन मी न्यू पैलेस गाठला…तिच्या डोळ्यातली निरागसता, प्रत्येक शस्त्रामागील तिची चौकशी, मेलेल्या प्राण्यांना पाहून हळहळणारी तिची नजर बरंच काही सांगून जात होती! सेल्फिज काढून आमचा मोर्चा आम्ही तिथे ठेवलेल्या जिवंत प्राण्यांकडे वळवला, त्यांना खाऊ घालण्यासाठी आम्ही दोन मोठे बिस्कीट्चे पुडे विकत घेतले…कस काय कळत या मूक जनावरांना कोण जाणे? आसुसलेल्या नजरेने ते धावतच  आमच्याकडे आले…त्यांना भरवण्यात सुखं मिळत नव्हत, उल्टा जीव झरझरत होता…काय वाटत असेल त्यांना त्या बंदिस्त चौकडीत? आपल्याला आवडेल का असं जगण? अर्थात नाहीच… पुढे आमचा मोर्चा चिंचेच्या झाडाकडे वळला, लहानपणी ऐकलेलं चिंचेच्या झाडावर भुते राहतात, आपसूकच स्वतःलाच टपली देऊन मी दगडाने चिंचा पाडायला सुरुवात केली, माझ्या परीच्या आनंदाला तर पारावारच उरला नव्हता, पटापट चिंचा गोळा करण्यात ती मग्न झाली होती…तिच्याकडे पाहून मी पुन्हा ते सोनेरी बालपण अनुभवत होते…

प्रिया सातपुते


Thursday, 12 March 2015

सावर रे सख्या सावर...

सावर रे सख्या सावर
माथ्याच कुकू
रक्तात माखु
देऊ नगस...

सावर रे सख्या सावर
भरल्या घराला
उघड्या हातांनी
विस्तू लाऊ नगस...

सावर रे सख्या सावर
मयताच्या आगी पाई
जिवंत पोरीला
पोटातच सपवु नगस...

सावर रे सख्या सावर
डोळ मिटताना
दुसऱ्या जीवाच
शिव्याश्राप घेऊन जाऊ नगस...

प्रिया सातपुते

Thursday, 5 March 2015

प्रियांश…६२

आजही प्रतीक्षेत आहोत कधी शिक्षा मिळेल या हैवांनाना? आपण म्हणतो माणसावर परिस्थिती ओढवते, म्हणून माणूस परिस्थितीच्या पुढे हतबल होऊन गुन्हेगार बनतो. दारू पिऊन, फन-आनंद उपभोगताना, यांना आपले गरीब आईवडील आठवत नाहीत, बाहेरख्यालीपणा करताना यांना त्यांची बायको दिसत नाही, पण, वासना शमवायला कोणीही मग ती तरुणी असो बालिका अथवा वृद्ध स्त्री. या हरामखोरांना स्वतःच अल्पवयीनत्व पुढे करून कायद्याचे काळे कोट घातलेले वकील सोडवतात! वकीली म्हणजे एखाद्या नराधमाला वाचवण??? निष्पाप मुलींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून, स्त्रिया पुरुषांपेक्षा कशा कमी आहेत, अन त्यांनी काय कराव? कोणते कपडे घालावे? घर सांभाळाव, फुल बनून फ्लॉवर पॉट मध्ये सजाव, गटर मध्ये जाऊ नये? स्त्री म्हणजे काय फक्त शोभेची वस्तू वाटली आहे का ? स्त्री-पुरुष कधी मित्रमैत्रीण असू शकत नाहीत…. अशे अक्कलेचे तारे तोडून स्वतःच त्या नराधमांना साथ देऊन, त्यांनी दाखवून दिलं की या निर्लज्ज माणसांना संस्कारच नाहीत.

कायदा पळवाटा देतोय अन अशे काळे कोट वाले कावळे निष्पाप स्त्रियांना टोचायला मोकळे. बलात्कार करणारा मात्र मोकाट सुटतो जामिनावर, लग्न करून संसार थाटतो आणि तोंड मारायला मोकळा होतो. यांच्या नजरेत ना असते शरम ना पश्चाताप. म्हणून जनेतेने का शांत बसायचं? कितीतरी लाखो कळ्या चिरडल्या जात आहेत, आता तरी  जागे व्हा, एकत्र लढा अश्या हरामखोरांच्या विरोधात. काहीही झालं तरी स्त्रीवर बोटे दाखवायला सारे मोकाट सुटतात, पण ज्या माणसाने हे कृत्य केलंय त्यांना का कोणी चिरडत नाही?? समाजाच्या भल्यासाठी बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार केलं जात, अन अश्या नराधमांना मोकाट सोडलं जात का????

प्रिया सातपुते

प्रियांश…६१

लहानपणापासून ऐकत आलेय… आज होळी, उद्या पोळी, बामन मेला संध्याकाळी…पण, आजवर यामागचा अर्थ काही उमगला नव्हता. लहानपणी बामन असतो काय हेचं माहित नव्हत! ते कळायला लागल्यावर, "फक्त बामनच का मरतो? दुसऱ्या जातींची नावे का घेत नाहीत?" पण, कोणीच उत्तर द्यायचं नाही, सगळे होळीच्या व्यापात असायचे. कालांतराने होळीचं रूपही बदलत गेलं, बऱ्याच वर्षांनी पुन्हा हेच वाक्य कानी पडलं अन कोड सुटलं…कधी काळापासून हे जातीयवादी यमक रूढ होत, कोण जाणे? पण, काळ बदलतोय तसा माणूसही या होळीच्या आगीत स्वार्थाने बरबटलेले, जातीयवाद जाळून टाकू दे, माणूस फक्त माणूस म्हणून जगू दे दुसंर काहीच मागण नाही माझं! प्रेमाच्या रंगात माणूस न्हाऊन निघू दे, ते फक्त माणुसकी जपण्यासाठी. 

होळीच्या तुम्हां सर्वांना रंगीबेरंगी शुभेच्छ्या!!!!

प्रिया सातपुते 


Tuesday, 27 January 2015

शायरी


राहों में हम कभी मिले या ना मिले
हमें जरूर याद रखना
कोई पागल तुमपे मर मिटी थी
ये याद रखना
दुवा करेंगे खुदा से
तुझे हमसे ज्यादा प्यार करनेवाला नसीब हो
ताकी तू कभी न कह सके
काश, मैंने वह दिल ना तोड़ा होता...

प्रिया सातपुते