Tuesday, 30 July 2013

हल्ली मला प्रेमात पडावस वाटतंय…हल्ली मला प्रेमात पडावस वाटतंय 
पावसाला सोबत घेऊन नाचावस वाटतंय 
प्रत्येक सरीवर पिसारा फुलवून 
मोरासंगे peacock डान्स करावसा वाटतोय 
हल्ली मला प्रेमात पडावस वाटतंय… 
तळ्याकाठी बसून 
टिक टिक वाजते गावस वाटतंय
पाण्याच्या शहरयांवर 
धड धड वाजते आहे का ते ऐकावस वाटतंय 
हल्ली काय आहे ना…. 
मला प्रेमात पडावस वाटतंय… 

प्रिया सातपुते

Wednesday, 24 July 2013

नेट-प्रेम भाग-२१


मंग्याची सगळीकडे धावपळ सुरु होती. घरात एकंदरीत सगळेच घाईत दिसत होते. मंग्या एकसारखा सगळ्यांना सूचना देत होता," पटकन आवरा यार तुम्ही सगळे, मला तिकडे जाऊन श्रीच्या बाजूने पण, उभं राहायचं आहे." शेवटी वैतागून तो श्रेयाच्या खोलीत जाऊ लागला, तितक्यात श्रेयाची आई डोळे पुसत बाहेर आल्या, त्यांच्या पाठी वाहिनी पण, मग चांडाळ्या . तसा तो टोमणा मारत म्हणाला," बर झालं, दादा आणि काका पुढे गेलेत नाही तर आताच रडारड करून तुम्ही गोंधळ घातला असता, (तश्या सगळ्या बायकांचा रागीट चेहरा वरती उठला) अरे! म्हणजे आताच मेकअप केलाय ना तुम्ही सगळ्यांनी, खराब होईल ना तो, आणि मग श्रेयाला रडवू नका म्हणजे झालं!!" तितक्यात काकू बोलल्या,"मुलगी होऊ दे तुला मग कळेल तुला, काळजाचा तुकडा लग्न करून जाताना कसं होत ते." कान पकडत मंग्या म्हणाला,"सॉरी काकू!! पण आता निघायला हव, मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे, आपल्याला निघायला हवं, श्रेयाचं झालं आहे कि नाही?" तितक्यात श्रेया बाहेर आली, "चला, लवकर श्री माझी वाट पाहत असेल." हे ऐकताच सगळ्यांना हसू फुटलं. होणाऱ्या वधूला घेऊन सगळे गाडीत बसले, ते "शुभमंगल" कार्यालयाकडे जाण्याकरता. 

श्रेया खूपच सुंदर दिसत होती, अगदी नववधू बाहुली सारखी. गेल्या तीन वर्षापासून ती ज्या क्षणाची वाट पाहत होती, तो क्षण आज घडणार होता. आज ती श्रीची होणार होती, दोघे मनाने कधीच एकं झाले होते, पण आज ते दोघे "विवाह" नावाच्या बंधनात बांधले जाणार होते. श्रेयाला प्रत्येक सेकंद तासासारखा भासत होता. आयुष्यातलं भयानक स्वप्न कायमच विसरून, तिने एल.एल.बी. पूर्ण केलं. प्रत्येक पावलावर श्री तिची सावली बनून वावरत होता. त्याचं प्रेम, त्यांची पहिली भेट, श्रीची तगमग, श्रीने लग्नासाठी विचारलेला तो बेधुंद क्षण, तिच्या होकारात, तिला उचलून वेडा झालेला श्री आठवून ती गालातल्या गालात लाजली. हे पाहताच, वहिनीनी विचारलं, "आज कोणीतरी गालातल्या गालात हळूच लाजतंय, काय श्रेया! बरोबर ना ? यावर लाजून चूर होऊन श्रेया म्हणाली, "काय ग! वहिनी गप्प न आता, किती छळशील मला आता?" यावर टोला मारत वहिनी म्हणाल्या,"आम्ही थोडीच छळणार आता, तो हक्क तर श्रीचा!" यावर सगळ्यांचा हशा पिकला. लाजेने चूर होऊन श्रेया गप्पं झाली, ते पुन्हा श्रीच्या विचारांत रमण्याकरता. 

प्रत्येक विचारागनिक तिच्या हृदयाचे ठोके वाढत होते. श्री कसा दिसत असेल? त्याला आवडेल ना माझा मेकअप, आधीच त्याला मेकअप आवडतं नाही, आधी ट्रायल मध्ये तर तो नाक मुरडत होता, कोण जाणे आता त्याला आवडेल कि नाही? आवडेलच? अहं!! प्लिज प्लिज देवा मला पाहताच तो ती वाली स्माईल देऊ दे, म्हणजे मला कळेल कि मी छान दिसतेय! श्री तर आहेच सुंदर, त्याच्या समोर सुंदर दिसायला थोडा मेकअप करावाच लागणार ना! त्याच्या सुंदर मनासमोर तर मी काहीच नाही, तो आहेच असा! टचवूड!!! माझे तर हात थंड पडलेत, आता काय होणार! श्री कधी पाहणार मी तुला? अहं!! एक दिवस नाही पहिलय तर अशी अवस्था आहे माझी, तुझीपण काही वेगळी नसणार माहितेय मला. कधी एकदा अंतरपाठ होईल असं झालंय मला!! विचारांचा अतिरेक सहन करत तिने आईची कुशी गाठली, आईला मिठ्ठी मारून जणू सगळे विचार शांत होत गेले. अर्थात थोड्या वेळासाठी. शेवटी वैतागून तिने विचारलं, "अजून किती वेळ लागणार पोहचायला मंग्या?" तिला झालेला उतावळेपणा पाहून पुन्हा सर्वाना हसू फुटलं. दुरून "शुभमंगल" कार्यालयाचा फलक पाहून तिच्या चेहऱ्यावरची खळी फुलली. 

श्रीची हालत इकडे काही वेगळी नव्हती, आईचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर एकसारखा दिसत होता. पाकिटातून आईचा फोटो काढून तो एकटक पाहत राहिला. त्याच्या मनाची घालमेल त्याच्या तंग चेहऱ्यावर जाणवत होती. जणू तो आईशी बोलत होता, आणि ते बोलन थांबवण्याकरता तो एकसारखा मंग्याला फोन करून पिडत होता. तसा त्याचा धीर सुटत चालला होता. आईचा फोटो छातीशी लाऊन त्याने घट्ट डोळे मिटून घेतले,"आई, आज तू हवी होतीस, तुझ्या सुनेचे लाड कौतुक तूच केल असतस, माझ्या माथ्यावर टिळा पण तूच लावला असतास, तुझ्या सुनेचा गृहप्रवेश पण तूच केला असतास, आई… आई." बंद असलेल्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं, पुसण्याकरता तो हात पुढे करणार तोच बाबांनी श्रीचे डोळे पुसले, तसा श्री बाबांच्या मिठ्ठीत बिलगला. दादा दुरून पाहत होता, त्याचे डोळे सुद्धा पाणावले होते. तितक्यात मंग्या जोरात ओरडत आला, "तुझ्या उतावळ्या बायकोला घेऊन आलो बघ रे." हे ऐकून श्रीच्या ओठांवर हसू फुललं. 

मंग्या कट्यार घेऊन श्रीचा भाऊ बनून उभा राहिला, दोघांनी एकमेकांना मिठ्ठी मारली, अमू अर्थात अमृता करवलीच ताट घेऊन लगोलग आली, "श्रीदा एकदम झकास दिसतोयस!" म्हणत तिने काजळाची टिकी श्रीच्या कानामागे लावली. "आज श्रेया वाहिनी फिक्या पडणार वाटते". तसा, श्री म्हणाला," असं!तिच्या समोर नको म्हणू म्हणजे झाल!" तिघेही हसतं स्टेज कडे जातात, तोच अमोल मामा बनून श्रीचा हात घेत त्याला स्टेज कडे घेऊन जातो. प्रत्येक पावलागणिक श्रीच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात. श्रे, बस, आता अजून थोड्या क्षणांनी तू कायमची माझी होऊन जाशील. स्टेजवर उभा राहून तो श्रेची वाट पाहू लागतो, भटजी अंतरपाट घेऊन तयारच होते,तशी त्याची तगमग वाढली, "ये ना आता पटकन, किती छळशील? हा भटजी तर अंतरपाट लाऊन उभा होईल आता, एकदा तरी पाहू दे मला तुला." तोच भटजी बुवांनी अंतरपाट लावला, श्रीचा चेहरा हिरमुसला. श्रेया तिच्या मामासोबत येउन पोहचली. श्री इतका अधीर झाला होता कि तो अंतरपाट ओढून काढावा अशी इच्छा त्याला होत होती. श्रेया स्वतःच्या पायांकडे पाहत उभी होती, श्री अंतरपाट कधी निघतो हेच पाहत होता… भटजी बुवा एकदम खणखणीत आवाजात सुरु झाले,

स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धीदम 

बल्लाळो मुरुडम विनायक मढम चिंतामणी : थेउरम 

लेण्याद्री गिरिजात्म्जम सुवरदम विघ्नेश्वरम ओझरम 

ग्रामे रांजण संस्थितो विजयताम कुर्यात सदा मंगलम 
.................................................................................
.................................................................................
.................................................................................
शुभमंगल सावधान !

अंतरपाट निघताच श्रीने श्रे कडे पाहिलं, तिच्या कपाळावरची चंद्रकोर शोभून दिसत होती, अजूनही ती मान खाली घालूनच उभी होती, नखशिखांत नटलेली श्रे पाहून श्रीच्या चेहरा फुलून गेला, त्याच्या गालावर आपसूकच हसू उमटलं. ते हसू पाहून श्रेया समजून गेली आणि देवाला, थंक क्यू गॉड! म्हणून श्री कडे पाहून डोळ्यांनी इशारा करून गेली. भटजींनी ओरडून श्रीला जाग केलं, गळ्यात हार घालून पुढचे काम उरकून भटजी बुवांना आणखीन एका लग्नाला जायचं होत ना! श्री, श्रेया पुढे वाकणार तोच अमुने त्याला अडवलं, "नाही वाकायचं श्रीदा!" तसा मंग्यापण ओरडला,"नको वाकूस, नाही तर आयुष्यभर वाकशील बायकोच्या पुढ्यात!" तसा श्री ताठ उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरच खट्याळ हसू पाहून श्रेयाला चेव आला, ती हात उंच करत हार घालण्याचा प्रयत्न करत होती, पण श्रीच्या उंचीपुढे काही चालत नव्हत, दादा श्रेयाला उचलायला पुढे येताच, त्याने दादाला नको म्हणत हात केला आणि तो श्रेयाच्या पुढ्यात वाकला, आणि म्हणाला,"तुझ्यासाठी काहीपण!" श्रेयाने हार पटकन घातला, सगळे हसून टाळ्या वाजवत होते. श्रीने पण श्रेला हार घातला आणि वरमालेचा विधी संपन्न झाला.

सप्तपदीच्या विधीला जाताना श्री श्रेयाच्या कानात बोलला, "खूप सुंदर दिसते आहेस, आय लव यु! " श्रेया काही बोलणार इतक्यात भटजी बुवा पुन्हा ओरडले. सप्तपदीचा विधी सुरु झाला, श्रीने आधीच भटजी बुवांना विनंती केली होती कि सारे मंत्र म्हणताना त्यांचा मराठीतही अर्थ सांगावा. खाली बसताना हळूच श्रेया म्हणाली,"आय लव यु टू!" 

प्रत्येक मंत्राला समजून घेत, दोघांनी सप्तपदीची सुरुवात केली, श्री आणि श्रेयाचा सप्तपदीचा सगळ्यात आवडता क्षण एकच होता, अमोलच्या लग्नात सप्तपदी पाहताना दोघांनी एकदमच म्हंटल होत, जेव्हा फेरा पूर्ण होतो आणि नवरा बायको कलशाला डोक लावतात तेव्हा खूप सुंदर दिसतात, दोघांना तो क्षण आठवून ओठांवर हसू उमटलं. श्रेच्या गळ्यात मंगळसुत्र घालताना आपसूकच श्रेयाचे डोळे पाणावले, श्रेच्या कपाळी आपल्या नावच कुंकू लावताना, त्याचा चेहरा समाधानी दिसत होता, का? आता श्रे त्याची झाली होती. 

कन्यादान करताना काका काकूंच्या चेहऱ्यावर फक्त सुख आणि समाधान होत, कारण, श्री सारखा प्रेमळ आणि मनमिळावू जावई त्यांना मिळाला होता जो मुलग्यापेक्षा कमी नव्हता. कानपिळी करताना दादाला समजत नव्हत कोणाचा कान ओढू? म्हणून त्याने दोघांचे कान ओढले, दोघांना जवळ घेत तो म्हणाला," श्रेया आता तुझी झाली श्री, काळजी तर तू घेतोसच, श्रेया तू निट काळजी घे याची." हे ऐकून सगळ्यांनाच हसू फुटलं, भटजी बुवा पण हसू लागले होते. सगळ्या विधी पार पडल्या, पाहुण्यांसोबत गाठी भेटी झाल्या. जेवणाच्या पंगती उठल्या. नववधू-वरांसाठी पंगत लागली, एकमेकांना घास भरवत श्री आणि श्रेयाने आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. 

अशी सुरु झाली श्री-श्रेयाची "नेट-प्रेम", "रियल-प्रेम" मध्ये. 

Wish you all to have an unconditional love and beautiful life partner!!

Love,
Priya Satpute 


अपेक्षाअपेक्षांचं ओझं 

असतं तरी कसं ?

मीठाच्या पोत्यासारख 

विरघळून जाणार,

कि कापसाच्या पोत्यासारख

भिजून आणखीनच जड होणार ?

प्रिया सातपुते

Tuesday, 23 July 2013

ऋण गुरुचे


आपण जन्माला जरी एकटे येतो तरी आपल्या जीवनाच्या प्रवासात आपण वेगवेगळी नाती गुंफतो. मग त्या नात्यात आपले आई बाबा, बहिण, भाऊ, काका, काकी, मामा, मामी, शेजारी, मित्र अशी अनेक नाती येतात. या प्रवासात आपण कधीतरी ठेच खातो, पडतो, धडपडतो, या वेळी आपल्याला उचलायला येणारे हात, कधी आपल्याला जगायला शिकवून जातात तर कधी कसं जगायचं? त्यांचे आपण कायमचे ऋणी होऊन जातो. त्यांनाच आपण "गुरु" म्हणतो.

लहान मुलं मातीचा गोळा असतं, त्याला हवा तो आकार द्या ते तसं रूप घेत, त्याला पहिला आकार देते ती त्याची "आई", प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला गुरु ही त्याची आईचं असते. आई, आपल्याला बोलायला, चालायला, बागडायला शिकवते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आपल्याला प्रेम करायला शिकवते, "निरपेक्ष प्रेम". संस्कारांचं बाळकडू तिच देते. चिमुकल्या पंखात उडण्याच बळ देते. कालांतराने क्रम लागतो बाबांचा, त्यांच्यातला कणखरपणा आणि तत्वं देण्याचा ते आतोनात प्रयत्न करतात. अशा माझ्या आई-बाबांना एकचं सांगावस वाटतंय, "Love you Mumma-Papa".

मग, येते ती शाळा, माझी शाळा!!

काळ्या फळ्यावर जसा खडू अक्षरे उमटवायचा तशीच काही गत आमची पण असायची, काही गोष्टी मनाच्या फळ्यावर छाप सोडून जायच्या तर काही एका कानातून आत आणि दुसरया कानातून बाहेर.
आयुष्याचा पहिला अध्याय, इथेच लिहला गेला. आईच्या मायेनी डोक्यावर हात ठेऊन, वेळ पडली तर कान ओढणाऱ्या बाईंच्या आसपास घुटमळतो आजही जीव!! या शाळेत मिळाले अगणित "गुरु", ज्यांनी आमच्या भविष्यासाठी अतोनात जीव ओतला. "गुरुपौर्णिमा" अजूनही आठवते, दिक्षीत गुरुजी आणि तोफखाने गुरुजींच्या फोटोंना गुलाब ठेवताना तेव्हा जास्ती काही जाणवत होत कि नाही हे माहित नाही, पण आज ते दिवस आठवून डोळे मात्र पाणवतात हे नक्की.

पंखाना बळ घेऊन आपण उंच भराऱ्या मारू लागतो, कळत नकळत कुठे तरी ठेच लागून पडतो, तेव्हा मात्र जितकं काही आपण शिकलो आहे, ते सगळ विसरून जातो आणि एका अंधारात गुरफटून जातो. आपणास, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याकरता जी व्यक्ती पुढे येते, आपल्या निरपेक्ष प्रेमाच्या चादरीत आधार देऊन, आपणास पुन्हा उडण्याच बळ देते, त्यांच्या प्रत्येक शब्दांत जादू असते, आपण पुन्हा उंच भराऱ्या घेऊन उडू जरी लागलो तरी आपणास जपण्यास ते नेहमीच तत्पर असतात. अश्या माझ्या "जादूगार गुरुंना " माझा शत शत प्रणाम!! अशे गुरु तुम्हा सर्वाना लाभोत हीच गुरुंपुढे प्रार्थना!!

मी माझ्या सर्व प्रिय गुरुंना, धन्यवाद देऊ इच्छिते कि त्यांनी मला इतक सुंदर घडवलं आहे कि मी स्वतःला आरशात पाहते तेव्हा आपसूकच मला माझ्या डोळ्यात मी त्यांनाच पाहते, माझातल्या प्रत्येक गोष्टीत कुठेतरी माझी आई, बाबा, माझे जादुगार अर्थात गुरुजी आणि निखील भैय्या, भागवत मैडम, घोरपडे मैडम, संध्या मैडम, कुंभार सर, जाधव सर,…. यांची छवि मला जाणवते.

Love you all, thank you so much for inspiring me and creating me!!

प्रिया सातपुते
चारोळीपहिल्याच पानावरच

माझं पहिलं नाव,

वाच ना ?

प्रिया बरोबर ना?


प्रिया सातपुते

चारोळी

वहीतून हे पान फाडताना,
झाला मला खूप त्रास,
माफ कर प्रिय वही,
कान पकडते थांब. 

प्रिया सातपुते 

Sunday, 7 July 2013

खरचं, तुला आई व्हायचय का?हल्ली आई होण्याच फॅड आलं आहे, म्हणजे कशी आई, सुटसुटीत आई, गरोदरपणाचे नऊ महिन्याचे त्रास न घेता डायरेक्ट बाळ हातात. कल्पना सुंदर आहे, हे म्हणजे कसं झालं, अभ्यास ना करता पहिला येण, काहीही न करता करोडो रुपयांचा मालक होण. एकंदरीत झाडाला मुले लटकली आहेत आणि आपण जाऊन फक्त आपल्याला जे फळ अर्थात मुलं आवडेल ते तोडून घेऊन जायचं. 

वाचूनच किती सुंदर वाटत असेल ना? नाही? का नाही पण? 

आपल्या समाजानेच तर हा नियम सुरु केला आहे. एखाद्या जोडप्याला मुल होत नसेल तर त्याने दुसर लग्न कराव, मग तिथेही काम झाल नाही तर, पुन्हा तिसर,… आता सध्या हे प्रमाण कमी झालं असेल पण, अजूनही अश्या गोष्टी घडतच असतात. स्त्रीच्या मनावर बिंबवलं जात कि "एक स्त्री आई बनल्याशिवाय पूर्णत्व अनुभवत नाही", असं बोलून संपूर्ण स्त्री जातीचा अपमानच करत आहेत हे लोक. ज्या निसर्गाने आपल्याला घडवलं, ज्या आईने आपल्या जन्माला घातलं, आणि ज्या देहाच्या जोरावर आपण या जगात वावरतो तो अपूर्ण असेलचं कसा? प्रत्येकाच्या कर्माने, त्याच्या लेख्या जोख्याने, जे आहे ते मान्य करून आपण आपल्या आणि दुसऱ्यांच्या शरीरांचा मान ठेवला पाहिजे. निसर्गाचा मान ठेवला पाहिजे. 

पण, दुर्दैवाने असं होताना दिसत नाही, मुलं न होण हे सर्वस्वी स्त्रिच्या माथी मरकटल जात. ज्या भारत देशात स्त्रिला पूजनीय समजल जात, तिथेच तिला वांझोटी म्हणून हिणवलं जात. मानसिक आणि शारीरिक त्रासातून तिची सुटका फक्त एकतर मृत्यू किंवा मुलंच करू शकते. 

सायन्स कितीही पुढे गेलं असेल तरी सुद्धा ते मनाचे घाव भरण्याच औषध शोधू शकत नाही. मुलं होण्यासाठी बरेच नवीन उपचार उपलब्ध झाले जरी असले तरी त्यातले दुष्परिणाम मात्र नजरेआडच जातात. यात मग, गर्भाशय भाड्याने देण, शुक्राणू विकत घेण, मानसिक ताण, कायद्याच्या बाबीही आल्याच. हे सार आपण कशासाठी करतो, एका तान्हुल्या बाळासाठी. मग, इतक्या साऱ्या अनाथ आश्रमात आई बाबांची वाट पाहणाऱ्या या चिमुकल्यांना का नाही जवळ केल जात? का ? तर ते आमच रक्त नाही, कुठल्या जाती धर्माचं आहे कोण जाणे? लोक काय म्हणतील? अशे एक नाही हजारो प्रश्न शिकलेल्या या मंदबुद्धी माणसांना पडतात आणि ते पुन्हा त्याच चक्रव्युहात अडकतात…"मला आई व्हायचंय?"

जराशे डोळे उघडून पहा तर आजूबाजूला असणारया "सिंधुताई सपकाळ" अर्थात "माई" तुम्हाला दिसतील, आणि तेव्हा अश्या या माणसांना फक्त एकच प्रश्न विचारण्याची सुप्त इच्छा होते, "खरचं, तुला आई व्हायचय का?"

प्रिया सातपुते Friday, 5 July 2013

आत्महत्या!!


का कोणास ठाऊक आज मला या विषयावर थोडंस लिहावसं वाटलं. काही दिवसांपूर्वी जिया खानच्या आत्महत्येमुळे बराच गोंधळ झाला, जिवंत असताना कोणालाही तिची इतकी क्रेझ नव्हती पण तिच्या अश्या मृत्यूमुळे सर्वानीच हळहळ व्यक्त केली. मृत्यू इतका सोप्पा झाला आहे कि त्याची भीती कोणालाच उरली नाही कि काय? हा प्रश्न मनात उमटतो हे मात्र नक्की. 

हिंदू धर्माप्रमाणे जे कोणी आत्महत्या करतो किंवा करते त्यांना कधीच मोक्षं मिळत नाही, ते हजारो वर्ष अडकून पडतात. आत्मा ही एक चिरंतन चेतना अर्थात एनर्जी आहे, जी कधीच मरत नाही ती फक्त आपले रूप अर्थात कपडे बदलते, म्हणजेच आपला देह हा एक प्रकारचा आउटफिटच आहे. आपल्या चेतनेला संपवणे हा एक अक्षम्य गुन्हा आहे आणि त्याला प्रत्येक धर्मात पापच मानलं जात. 

आजकाल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर यंगस्टर्स आपल्या जीवच बर वाईट करायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त चालू असते ती स्पर्धा जिंकण्यासाठी आणि जर त्यात हार मिळाली तर ती त्यांना पचत नाही मग ती प्रेमात असो वा अभ्यासात वा घरातल्या हलक्या फुलक्या भांडणात. 

माझी लहानपणीची मैत्रीण, नेहमी पहिला नंबर असणारी, पण पाचवीत तिला बोर्डिंगला घालण्यात आलं, पण पुन्हा तिला गमेना म्हणून दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळाला कारण आमच्या शाळेत प्रवेश बंद झाले होते. कालांतराने आमचे मार्ग वेगळे झाले आणि एके दिवशी वर्तमानपत्रात तिचा फोटो आला होता, तिने आत्महत्या केली होती. दहावीत बोर्डात, बारावीला पण बोर्डात आणि तिची आत्महत्याची बातमी वाचून माझं डोक चक्रावूनच गेलं होत. आम्हाला कारण समजलं नाही. फक्त एवढचं कळाल कि ती जेवून, तिच्या लहान भावासोबत बोलून, आपल्या रुममध्ये गेली, थोड्या वेळात तिचे बाबा रूम मध्ये पाहतात तर तिने पंख्याला दोर लाऊन आत्महत्या केली होती. असं काय घडलं कि तिने जीव दिला हे अजूनही गूढच आहे पण, आपला जीव इतका स्वस्त झाला का? कि तो इतक्या सहजासहजी संपवून टाकायचा? 

आयुष्यात अडचणी कोणाला चुकल्या आहेत? त्या तर सर्वांच्याच पाचवीला पुजलेल्या असतात पण, म्हणून आत्महत्या हा उपाय असूच शकत नाही. त्रासाला कंटाळून लग्न झालेल्या बायका जीव देतात, पाठीमागे आपल्या मुलाबाळांच काय होईल? याची जर सुद्धा चिंता नसावी? कि मदत मागायला लाज वाटते म्हणून जीव देण हा मार्ग नक्कीच असू शकत नाही. कारणे काहीही असोत आत्महत्या हा उपाय नाही. आपल्या जवळच्या मित्र-परिवारात जर कोणी सुसायडल सिम्पटमस दाखवत असेल तर त्यांना मदत करा, आयुष्य खूप सुंदर आहे हे पटवून द्या. 

माझ्या जादुगाराने म्हंटले आहे कि, आयुष्यं हे हायवे सारखं असतं, जिथे आपणास एक्झिट दिसतात, हे आपल्या हातात असत कि कोणती एक्झिट घ्यायची अथवा नाही!!

Life is short and precious, live it like there's no tomorrow!!

प्रिया सातपुते