Monday, 16 March 2015

शायरी

हम लबोसे कह ना पाये
वह नज़र से पढ़ ना पाये
इसी कश्मकश में चल पढ़े तो
रास्ते हमराही हो गए।

प्रिया सातपुते

Saturday, 14 March 2015

प्रियांश…६४

लग्न म्हणजे काय? याची वेगवेगळी उत्तरे आपणास मिळतील…लग्न म्हणजे आईवडीलांखातर घोड्यावर चढणे नव्हे…वय वाढतंय म्हणून नात्यातली माणसे काय बोलतायत म्हणून लग्न करणे नव्हे! लग्न ही माझ्यासाठी तरी व्यवहार करता येणारी गोष्ट नाही, कारण व्यवहार करायचे तर मग लग्न नावाच्या बंधनात अडकायच का? स्वतःला जेव्हा वाटेल हा/हीच तो/ती जिच्यासोबत मी संपूर्ण आयुष्य न कंटाळता जगू शकेन, तिथे नक्कीच सप्तपदी घेऊन संसार थाटावा! आपल्या बाजूचे काय म्हणत आहेत, पाठीमागचे काय म्हणत आहेत, हे पाहण्यापेक्षा आपला मार्ग चालत रहायचा. कुठल्या तरी पायवाटेत अथवा हायवेला भेटेलच प्रत्येकाला त्याचा सोलमेट! म्हणून फक्त पुढे जात रहायचं… 

प्रिया सातपुते 


Friday, 13 March 2015

प्रियांश...६३

सहसा मी कधी क्राईम पेजेस वाचण्याच्या भानगडित पडत नाही! पण, आज पप्पा जोर देऊन वाच म्हणाले, त्यात मम्माने पण जोर दिला! मग, मी ती बातमी वाचली, काही क्षण तशीच बसून राहीले.

मग बायोलॉजी आठवली, डिस्कवरीपण! विंचूची आई आपल्या पिल्लांना पाठीवर पोसते अन तिच पिल्ली मोठी झाल्यावर, खाऊन, नांगे मारून आईला यमसदनास धाडतात! हे सांगण्याच तात्पर्य हेच की आजचा मनुष्य या विचवांच्या पोरांसारखच स्वतःच्या आईवडिलांना पुरेपूर खाऊन टाकतो अन त्यांच्या देहाची, मनाची लत्करे लत्करे करून टाकतो!

कोल्हापुरमध्ये काही दिवसांपूर्वी एका श्रीमंत वृद्ध स्त्रिचा मृतदेह रंकाळा तलावात आढळून आला. पोलिसांच्या चौकशी अंतर्गत आढळून आले होते, त्या तीन दिवसांपासून गायब होत्या! मृतदेहाची ओळख पटवायला त्यांची दोन मुले, सूना, एकुलती एक मुलगी, नातवंड अशी सारी हजर होती, निर्विकार चेहरयाने! एका मुलाने आईच्या अंगावर असणाऱ्या तीस तोळे सोन्याची चौकशी करून, स्वतःच आईच्या अंगावरचे दागिने काढून घेऊन, आईच्या देहाला तीन चार वेळा आलटुन पालटुन खात्री केली की दागिने राहीले तर नाहीत ना? ना आई गेल्याच दुःख, ना आवेग! आईच्या देहासमोरच दोघा भावांचा वाद सुरु झाला, दागिने कोण घेणार? त्यात बहिण सुद्धा आपला हिस्सा मागु लागली! हे सार त्या माऊलीच्या देहासमोर! मेल्यावर एका श्रीमंत घराण्यातील वृद्ध स्त्रिला ही वागणूक मिळत होती मग साधारण कुटुंबात तर बोलयलाच नको! जिवंत असताना काय होत असेल कोण जाने? म्हणून त्यांनी आत्महत्या पत्करली? की त्यांना कोणी मारून टाकल? अशे नाना विचार डोक्यात भुंगा घालत आहेत!

राहून राहून एकच प्रश्न पडतोय, "म्हातारपण कोणाला चुकलय का? सांगा ना ? मग का हा विकृतपणा?
स्वतः च्या आईवडिलांना एखाद्या कस्पाटासमान फेकून द्यायच? वृद्धाश्रमात तर कधी भर रस्त्यात, तर कधी मारून टाकायच...तुम्हीही म्हातारे व्हाल, आयुष्याच बुमरँग पुन्हा फिरेल मग त्याच माऊलीचे हात आठवतील, पाठीवर फिरनारा उबदार वडिलांचा हात आठवेल अन स्वतः चीच कीव येईल अन शेवटी तुम्ही सुद्धा अशेच तरंगाल,...लक्षात ठेवा, कॄतघ्ननांनो, लक्षात ठेवा.....

प्रिया सातपुते

त्रिशा'ज डे आउट

आज हिरमुसलेल्या माझ्या परीला घेऊन मी न्यू पैलेस गाठला…तिच्या डोळ्यातली निरागसता, प्रत्येक शस्त्रामागील तिची चौकशी, मेलेल्या प्राण्यांना पाहून हळहळणारी तिची नजर बरंच काही सांगून जात होती! सेल्फिज काढून आमचा मोर्चा आम्ही तिथे ठेवलेल्या जिवंत प्राण्यांकडे वळवला, त्यांना खाऊ घालण्यासाठी आम्ही दोन मोठे बिस्कीट्चे पुडे विकत घेतले…कस काय कळत या मूक जनावरांना कोण जाणे? आसुसलेल्या नजरेने ते धावतच  आमच्याकडे आले…त्यांना भरवण्यात सुखं मिळत नव्हत, उल्टा जीव झरझरत होता…काय वाटत असेल त्यांना त्या बंदिस्त चौकडीत? आपल्याला आवडेल का असं जगण? अर्थात नाहीच… पुढे आमचा मोर्चा चिंचेच्या झाडाकडे वळला, लहानपणी ऐकलेलं चिंचेच्या झाडावर भुते राहतात, आपसूकच स्वतःलाच टपली देऊन मी दगडाने चिंचा पाडायला सुरुवात केली, माझ्या परीच्या आनंदाला तर पारावारच उरला नव्हता, पटापट चिंचा गोळा करण्यात ती मग्न झाली होती…तिच्याकडे पाहून मी पुन्हा ते सोनेरी बालपण अनुभवत होते…

प्रिया सातपुते


Thursday, 12 March 2015

सावर रे सख्या सावर...

सावर रे सख्या सावर
माथ्याच कुकू
रक्तात माखु
देऊ नगस...

सावर रे सख्या सावर
भरल्या घराला
उघड्या हातांनी
विस्तू लाऊ नगस...

सावर रे सख्या सावर
मयताच्या आगी पाई
जिवंत पोरीला
पोटातच सपवु नगस...

सावर रे सख्या सावर
डोळ मिटताना
दुसऱ्या जीवाच
शिव्याश्राप घेऊन जाऊ नगस...

प्रिया सातपुते

Thursday, 5 March 2015

प्रियांश…६२

आजही प्रतीक्षेत आहोत कधी शिक्षा मिळेल या हैवांनाना? आपण म्हणतो माणसावर परिस्थिती ओढवते, म्हणून माणूस परिस्थितीच्या पुढे हतबल होऊन गुन्हेगार बनतो. दारू पिऊन, फन-आनंद उपभोगताना, यांना आपले गरीब आईवडील आठवत नाहीत, बाहेरख्यालीपणा करताना यांना त्यांची बायको दिसत नाही, पण, वासना शमवायला कोणीही मग ती तरुणी असो बालिका अथवा वृद्ध स्त्री. या हरामखोरांना स्वतःच अल्पवयीनत्व पुढे करून कायद्याचे काळे कोट घातलेले वकील सोडवतात! वकीली म्हणजे एखाद्या नराधमाला वाचवण??? निष्पाप मुलींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून, स्त्रिया पुरुषांपेक्षा कशा कमी आहेत, अन त्यांनी काय कराव? कोणते कपडे घालावे? घर सांभाळाव, फुल बनून फ्लॉवर पॉट मध्ये सजाव, गटर मध्ये जाऊ नये? स्त्री म्हणजे काय फक्त शोभेची वस्तू वाटली आहे का ? स्त्री-पुरुष कधी मित्रमैत्रीण असू शकत नाहीत…. अशे अक्कलेचे तारे तोडून स्वतःच त्या नराधमांना साथ देऊन, त्यांनी दाखवून दिलं की या निर्लज्ज माणसांना संस्कारच नाहीत.

कायदा पळवाटा देतोय अन अशे काळे कोट वाले कावळे निष्पाप स्त्रियांना टोचायला मोकळे. बलात्कार करणारा मात्र मोकाट सुटतो जामिनावर, लग्न करून संसार थाटतो आणि तोंड मारायला मोकळा होतो. यांच्या नजरेत ना असते शरम ना पश्चाताप. म्हणून जनेतेने का शांत बसायचं? कितीतरी लाखो कळ्या चिरडल्या जात आहेत, आता तरी  जागे व्हा, एकत्र लढा अश्या हरामखोरांच्या विरोधात. काहीही झालं तरी स्त्रीवर बोटे दाखवायला सारे मोकाट सुटतात, पण ज्या माणसाने हे कृत्य केलंय त्यांना का कोणी चिरडत नाही?? समाजाच्या भल्यासाठी बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार केलं जात, अन अश्या नराधमांना मोकाट सोडलं जात का????

प्रिया सातपुते

प्रियांश…६१

लहानपणापासून ऐकत आलेय… आज होळी, उद्या पोळी, बामन मेला संध्याकाळी…पण, आजवर यामागचा अर्थ काही उमगला नव्हता. लहानपणी बामन असतो काय हेचं माहित नव्हत! ते कळायला लागल्यावर, "फक्त बामनच का मरतो? दुसऱ्या जातींची नावे का घेत नाहीत?" पण, कोणीच उत्तर द्यायचं नाही, सगळे होळीच्या व्यापात असायचे. कालांतराने होळीचं रूपही बदलत गेलं, बऱ्याच वर्षांनी पुन्हा हेच वाक्य कानी पडलं अन कोड सुटलं…कधी काळापासून हे जातीयवादी यमक रूढ होत, कोण जाणे? पण, काळ बदलतोय तसा माणूसही या होळीच्या आगीत स्वार्थाने बरबटलेले, जातीयवाद जाळून टाकू दे, माणूस फक्त माणूस म्हणून जगू दे दुसंर काहीच मागण नाही माझं! प्रेमाच्या रंगात माणूस न्हाऊन निघू दे, ते फक्त माणुसकी जपण्यासाठी. 

होळीच्या तुम्हां सर्वांना रंगीबेरंगी शुभेच्छ्या!!!!

प्रिया सातपुते