Saturday, 30 June 2012

लहानपणी सावल्यांशी खेळताना खूप मज्जा यायची,
वेगवेगळे आकार, कल्पना आणि मज्जा...
पण तेच रात्र होताच त्या सावल्या भूतावाल्यांच रूप घ्यायच्या,
आईच्या कुशीत जणू एक ओलावा, शांती जाणवायची,
आणि आता त्याच सावल्या खूप मोठ्या होऊन, 
रोज रात्री एक प्रश्न घेऊन येतात,
आता पुढे  काय?


    प्रिया

Friday, 15 June 2012

पाखरू                                     
मन पाखरू पाखरू पाखरू...
झेपावते आभाळी,
जणू साऱ्या मोहातून
ते मुक्त झाले.....


प्रिया 

 

वास्तव


  
मोरपीस गालांवर फिरावं अन
सारी स्वप्न पूर्ण व्हावी
डोळे उघडताच स्वप्न्तील गोष्ट
समोर उभी असावी
पण आयुष्य....असत का इतक सोप?
स्वप्नातल्या परी प्रमाणे कोणी याव
अन जादूची छडी फिरवावी....
वास्तव इतक भयाण, कठोर का असते?
क्षणा क्षणाला इथे नात्यांचा खेळ, प्रेमाचा छळ...
जिथे पाहाल तिथे क्रूर हत्या...
अजन्म्या पिल्लांचा खून...तिथे जिवंत माणसाला कसली आली किंमत ???प्रिया

व्यथाआसवांची भाषा कोणालाच उमगत नाही,
त्यांचा फक्त एकच मित्र असतो
तो म्हणजे लुकलुकणारे डोळे,
सुखात दु:खात,
सगळीकडे साथ देतात...
सगळेजण साथ सोडतील,
पण डोळे आणि अश्रू हे नेहमीच एकत्र राहतील,
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत........

प्रिया


Thursday, 14 June 2012

सुंदर मन माझ                               
                                
                 
सुंदर मन माझ ,
मोरपिसासारख नीळ नीळ?
कि
मावळणाऱ्या गुलाबी ढगांसारख?
सुंदर मन माझ...
ना रंग उमगे मला न भाव,
प्रत्येक क्षणी याचा वेगळाच डाव!
सुंदर मन माझ...
कोणाच्या प्रेमात पडलेलं?
न त्याला काळे कि हे प्रेम!
सुंदर मन माझ...
नव्या दिवसाला समोर जाणार,
रात्रीत अंथरुणात हमसून रडणार,
कोणाच्या आठवणीत हेच त्याला न ठाव!
सुंदर मन माझ...
ओठावरच गुलाबी हसण,
आणि मनातून कला रंग,
यांना कधी ओळखणार हे
सुंदर मन माझ....

प्रिया

Monday, 4 June 2012

नेट-प्रेम भाग-11


आज श्री भलताच खुशीत दिसत होता, कारण पण तसच होत...
जिच्यावर तो अतोनात प्रेम करत होता, जिचा आवाज ऐकल्याशिवाय त्याचा दिवस सुरु काय संपायचा पण नाही, सभोवार फक्त श्रेया, श्रेया, आणि फक्त श्रेयाच....त्याची श्रेया पुण्याला येणार होती..त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. moot court competition  या अंतर महाविद्यालयीन स्पर्धेसाठी ती तिच्या कॉलेज ची representative  होती....जेव्हा पासून श्रेयाने त्याला हि गुड न्यूस दिली होती त्याच्याने धड काही खाल्ल गेल ना पिल्ल...ऑफिस मधून आल्यापासून तो श्रेयाच्या फोन ची वाट पाहत होता...एक उसासा टाकत तो पुटपुटला "कधी फ्री होणार हि..."

मावळणाऱ्या सूर्याला पाहून तो श्रेयाच्या विचारात मग्न झाला होता..काळ मांजर वाटेच्या आडव जात तशे अचानक श्री एका अनामिक भीतीने व्याकूळ झाला....
एका पाठोपाठ एक अशे नकारात्मक विचारांनी त्याला घेरून टाकल...जणू त्याच्या वेगवेगळ्या प्रतिकृतीच त्याच्या समोर उभ्या ठाकून त्याला प्रश्न करत होत्या....

"ती श्रीमंता घरची एकुलती एक मुलगी तुझा सारखा सामान्य माणसासोबत खुश राहील?"

"स्वतःला आरशात पाहिलास का तू कधी? ना तू ह्रितिक, ना सलमान आहेस...कशी पसंद करेल ती तुला?"

"वेडा झाला आहेस का श्री तू?"

" जरी तिने तुला पसंद केल, तिचे आई वडील तयार होतील का एका अनाथाला आपला पोटचा गोळा द्यायला?"

मग श्री जणू झटकन ओरडला- मी प्रेम करतो तिच्यावर खूप प्रेम...सुखात ठेवेन मी तिला, तिच्या बाबांनी जस तिला फुला सारख जपल आहे तसच मी तिला आयुष्यभर जपेन...काही होऊ नाही देणार, काही कमी पडू नाही देणार मी तिला...तितक्यात फोन रिंग झाला..श्रेया चा होता..त्याने डोळे बंद केले क्षणभर एक श्वास घेतला आणि फोन उचलला.....
पलीकडून श्रेयाचा आवाज आला, "माझा विचार करत होतास ना?"
श्री-  मी? नाही तर...आताच आलोय घरी...
श्रेया थोडी हिरमुसली,
श्री- अग वेडाबाई! तुझाच विचारात आहे मी सकाळपासून...आज ना धड ऑफिस मध्ये लक्ष लागल ना कामात..
श्रेया- माहित होत मला..मी पण खूप excited  आहे रे...
श्री- कधी येणार आहे मग माझी वेडाबाई?
श्रेया- काय रे ते बी नको माणू मला!!
श्री- मग काय म्हणू तूच संग..वकीलीन बाई???
श्रेया- ह्म्म्म....
श्री- मग कधी आहे competition ? तू कधी येत आहेस इकडे? कोण कोण येत आहे? केस तयार केली का?
श्रेया- अरे किती सारे प्रश्न? श्वास तरी घे...२ दिवसांची competition आहे, टोटल आम्ही १५ जण आहोत..आम्ही एक ४,५ दिवस राहायचं म्हणत आहोत, जेणेकरून थोड फिरता पण येईल..आणि...
श्री- आणि काय? बोल ना..
श्रेया- काही नाही..
श्री- श्रे तू लाजते आहेस? ओ माय...
श्रेया- shut up ?
श्री- का माझी भीती वाटतेय का तुला? कि कोणत्या नमुन्याशी भेटेन म्हणून?

श्रेया- वेडा आहेस का तू? मला तर वाटतंय कि तूच पळून जाशील मला पाहून
श्रेया आवाज नरम पडला होता.
श्री- मी का पळून जाईन? विश्वास नाही...
श्रेया ने त्याच वाक्य पूर्णच होऊ दिल नाही....श्री खूप विश्वास आहे स्वतः हूनही जास्ती..मला माहित आहे कि आपण एकमेकाला कधीच पाहिलं नाही, पण तरीही आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो कारण आपली मने जुळली आहेत...प्रेम फक्त चेहरे पाहूनच होत का? मन, महत्वाच नाही??
श्री च्या डोळ्यात पाणी दाटून आल होत..तशी श्रेया पुन्हा म्हणाली, आता प्लीज सेंटी नको होऊ तू....
श्री हसून म्हणाला...खूप शहाणी झालीय माझी बाहुली...
श्रेया- मग बाहुलाच हुशार असू शकतो का इंजिनीर साहेब??
तसा श्री जोरात हसू लागला...आपली बुवा वकीलीण बाई समोर इतकी मजाल नाही.

दोघांच्या हसण्यात श्रीच्या अंतर्मनातल्या प्रतिकृती विरून गेल्या....

प्रिया