Sunday, 4 September 2011

नात..केव्हातरी कुठेतरी
अचानक भेट होते,
सारे धागे दोरे
आपोआप जुळून येतात.
केव्हातरी कुठेतरी
एक वार्याची झुळूक
सावकाशपणे निघून जाते
सोबतीला एक सुगंध देऊन जाते.
केव्हातरी कुठेतरी
ना पाहताच
खूप काही बोलून जातो आपण,
मनात अन ओठांवर
मात्र तेच मंद स्मितहास्य.
केव्हातरी कुठेतरी
तुझ ते खुलून हसन
जुळवून आणतात सारे क्षण
मलीनतेचा मुकुट गळून पडतो  आपोआप.
केव्हातरी कुठेतरी
सजगतेच भान
जाग करत या मनाला
भावनांच्या चक्रव्यूहातून
बाहेर ना पडता
अति गुंततच जातो आपण.
केव्हातरी कुठेतरी
हक्कांसारखे भाव, शब्द
आपोआप उमटायला लागतात बोलण्यातून
आकाराला येत एक सुंदर नात..


प्रिया 

Jagnyasathi...

Ratrichya kalyakutt andharat
kajvyanchi kirkir,
tathasta zadachi pane sarsar aaptataat
pandharya sadital te aajichya goshtitale bhut
same to same hadalch ti
kutryanchya radnyatun
yamchi chahul
smashanatlya vizalelya
rakhetun uthanare te dhur
dolyat khupnare te bhayan vavtal
melelya undarala
tocha marnare te kavale
shikarivar najar
theun zadap ghalnara to vagh
sagal kahi jagnyasathi
fakt jagnyasathich...

क्षितिज...

क्षितिजाच्या पुलावरून चालताना,
हे जग एकटच वाटत,
पण आयुष्याच्या पुलावरून चालताना,
आपणच या जगात एकटे असतो…

ही चारोळी मी बी.एस.सी. फर्स्ट ईयर मध्ये, फिजिक्सच्या लेक्चरला रचली होती…त्यामुळे सार श्रेय पाटील सरांना आणि त्या लेक्चर संपल्याच्या घंटेला…

प्रिया सातपुते


Tribute to my friendआठवणींच्या पिटाऱ्यात,
सापडतात काहींचे चेहरे,
चेहरे जे नेहमी हसवायचे, रडवायचे, रुसवा काढायचे, जे नेहमी सोबत असायचे,
हातातून रेती सुटत जाते तशी, एक एक आठवण दूर होत जाते, चेहरे पण हलकेच गायब होतात ...पण कधीच ना विसरण्याकरता...

Miss u so much...hope i'll be there in heaven beside u soon...do the reservation...:P

प्रिया