केव्हातरी कुठेतरी
अचानक भेट होते,
सारे धागे दोरे
आपोआप जुळून येतात.
केव्हातरी कुठेतरी
एक वार्याची झुळूक
सावकाशपणे निघून जाते
सोबतीला एक सुगंध देऊन जाते.
केव्हातरी कुठेतरी
ना पाहताच
खूप काही बोलून जातो आपण,
मनात अन ओठांवर
मात्र तेच मंद स्मितहास्य.
केव्हातरी कुठेतरी
तुझ ते खुलून हसन
जुळवून आणतात सारे क्षण
मलीनतेचा मुकुट गळून पडतो आपोआप.
केव्हातरी कुठेतरी
सजगतेच भान
जाग करत या मनाला
भावनांच्या चक्रव्यूहातून
बाहेर ना पडता
अति गुंततच जातो आपण.
केव्हातरी कुठेतरी
हक्कांसारखे भाव, शब्द
आपोआप उमटायला लागतात बोलण्यातून
आकाराला येत एक सुंदर नात..
प्रिया
No comments:
Post a Comment