Friday, 6 May 2016

प्रियांश...७४

पायात मुंग्या आल्या की पाय सुन्न होतो! तसचं मनाचं देखील आहे, मन सुन्न झालं की ते विचार नावाच्या लाखो मुंग्यांनी टोचून निघते, रक्त निघत नसलं तरीही त्याच्या जखमेतून भळाळून भूतकाळ बाहेर पडतो तो काही या क्षणात त्याला राहू देत नाही. मग ते झुलत राहत भूत अन भविष्यात! म्हणून तर मनाला कब्जात ठेवता आलं पाहिजे, त्याला ध्यानातून कणखर बनवलं पाहिजे! मनासोबत वाहवत न जाता त्याच्यावर स्वार होता आलं पाहिजे!

प्रिया सातपुते