Monday, 26 December 2016

प्रियांश...९७

आपण स्वतःसाठी सुंदर दिसतो त्यापेक्षा आपण दुसऱ्याच्या नजरेत सुंदर दिसतो ही भावना मनाला मोहवून टाकते! आपल्याही प्रेमात कोणी पडू शकतो! या एका विचाराने मन वेड होत, मग काय? आपण त्याच्या नजरेत अजून फुलून दिसावं म्हणून रोज नवे अतरंगी प्रकार करतो...कारण? मनाचा काय भरवसा ते आज एकाच्या मोहात उद्या दुसऱ्याच्या! मग, रोज आपण मनाशी झगडतो, आवडते मी त्याला! नाही ग, काय आहे असं तुझ्यात? की तू आवडशील त्याला? मग, सुरु होतो जीवघेणा प्रवास! मनाचा डोक्यासोबत! मन काही ऐकत नाही, अन डोकं काही करू शकत नाही! डोकं मनाला हतबल सुन्न होऊन एका कोपऱ्यात बसून हुंदके देताना दुरून पाहत राहतो! काश, डोक्याला, मनाला पाय असते, म्हणजे निदान डोकं मनापर्यंत धावत जाऊन त्याला बिलगून समजूत तरी घालू शकलं असतं! पण, असं काही होत नाही, मन एकटंच हुंदक्यांमध्ये विरून जात, कधीही सुंदर न दिसण्यासाठी...

प्रिया सातपुते

Saturday, 24 December 2016

प्रियांश...९६

प्रियांश...९६

आयुष्यात काही मोक्याच्या क्षणांत घरी परत जाण्याची इच्छा होत नाही... हे प्रत्येकासोबत होत, आपण चिडतो, कधी रडतो, कधी स्वतःला दुखावतो, कधी उगाचच भटकत राहतो... हे आपण सगळेच करतो... But, just don't go too far, don't go on heights and don't go down...हे होतंच असतं...कधी आपला फेव्हरेट स्पॉट पण नकोसा होतो, जीव अर्धमेला होता, कधी फक्त मन रडतं राहत पण डोळे सुकलेले असतात... मग आपण थोडं जास्ती दूर जातो... जातोच! एका पॉईंटला एक किक बसते, you just need to understand that kick, that moment and just go back, take a fresh air, feel your lungs, your heart and let go of your pain forever! प्लिज घरी परत जा... घरी तुमची वाट पाहणारी तुमची आई, बाबा, बायको, मुलं... यांना फक्त एकदा आठवा!
Please, go back!

©प्रिया सातपुते

Friday, 25 November 2016

Celebration of Puberty! उत्सव ऋतुचक्राचा!

Celebration of Puberty!
उत्सव ऋतुचक्राचा!

कळीच फूल बनणं हा प्रवास खरतरं खूपच सुंदर आहे! एखादा गुलाब जेव्हा उमलतो तेव्हा सारेचं भान हरपून जातात, हे जरी खरं असलं तरीही कळीतून फूल हा प्रवास त्याहूनही सुंदर आहे. पण, जेव्हा एखादी मुलगी या प्रवासाची पायरी चढते तेव्हा आसपासच्या लोकांच्या भुवया वरती जातात. अग! एवढ्या लवकर कशी मोठी झाली? अग बाई! कावळा शिवला का पोरीला? काय ग बाई सगळं बाईच्याच जातीला! मग हळुहळू त्या लहानगीच बालपण अश्या टोमण्यांनी आपणच हिरावून घेतो आणि नको त्या वयात तिला प्रौढ करतो.

वयात येणं! ही एक नैसर्गिक बाब आहे. तिला धर्माच्या चौकटीत बांधून स्त्रियांना स्वतःच्याच शरीराबद्दल अनादर, अनास्था करण्यास वर्षानुवर्षे भाग पाडले जाते. तिच्या मनात भयानक गोष्टी बिंबवल्या जातात. लहानग्या जीवाला तिच्या शरीराची सगळ्यात नॉर्मल बाबीचा बाऊ करायला शिकवलं जातं. या दिवसांत एका कोपऱ्यात बसायचं, कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही, देवासमोर अथवा देवाला स्पर्श नाही करायचा, मंदिर प्रवेश बंद, घरात काही शुभ कार्य असेल तर फिरकायच नाही! जशी काही ती अपवित्रच झाली आहे, त्यावर कहर म्हणजे जर देवाला शिवलंस तर नापास होशील, ढ होशील, मुलांशी बोलशील तर प्रेगनंट होशील...अशे वाटेल त्या वाईट गोष्टी तिच्या मनात भरवल्या जातात, जेणेकरून तिच्या मनात भीतीच हे पिल्लू, भूताच रूप घेऊन ते आयुष्यभर तिच्या मानगुटीवर बसलं जाईल.

आपणांस निसर्ग अर्थात देवाने घडवलं असं जरी मान्य केलं तरी निसर्गतः प्रत्येक महिन्याला येणाऱ्या ऋतुचक्रास घृणास्पद, हीन का समजावं? ज्या गोष्टीमुळे संपूर्ण जग अस्तित्वात आहे; ती बाब पाप असूच कशी शकते?
ज्या परमेश्वराने स्त्रिला गर्भाशय दिला, त्या गर्भात नऊ महिने राहून जन्माला येणार मुलं पाप नसतं पण, एक स्त्री मात्र या नैसर्गिक ऋतुचक्रात पापी, कावळा शिवलेली, अडचण असलेली एका अडगळीच्या खोलीत बसवली जाते, का?? तर, घरात तिची सावली पडेल, अन्न नासेल, तुळस जळून जाईल, देव कोपेल अन बरंच काही...

एका हाडामासाच्या मुलीला मन असू शकत हे सारे विसरून गेलेत, हीन बुरसटलेल्या परंपरांनी शिक्षित समाजालाही अडाणी करून टाकलं आहे म्हणूनच अगदी काही डॉक्टर बनलेल्या मुलीही या परंपरा पाळतात तर कमी शिकलेल्या स्त्रिया आपल्या मुलींना यातून बाहेर काढताना मी पाहिलं आहे, किती हा विरोधाभास!

आपली लहानमुले सध्या इंटरनेटच्या महाजाळात वेगवेगळ्या विकृतींना बळी पडू शकतात, त्यांना त्यांच्या शरीरातले बदल नीटपणे सांगायला हवेत. योग्य वयात, योग्य माहिती त्यांना वाईट प्रकारांपासून दूर ठेवू शकते. वाईट प्रकार मग ते मानसिक नैराश्य असो, पॉर्न पाहणं असो वा नको त्या वयात लैंगिक संबंध, या अश्या प्रकारांपासून त्यांना योग्य माहितीच परावृत्त करू शकते. यासाठी त्यांना आपली साथ अन मैत्रीचा हातच हवा असतो.

या लहानग्यांना कळीतून फुलात रुपांतरीत होऊ द्या! त्यांना त्यांचं बालपण मजेत घालवू द्या! तारुण्याच्या उंबरठ्यावर नवं आयुष्य त्यांना साद देत आहे, महिन्याचे ते दिवस अशी ओळख करून देण्यापेक्षा त्यांना कळू द्या हे तर सेलिब्रेशन आहे...Don't make it embarrassment for them, make it celebration of Puberty to welcome new phase of life.

प्रिया सातपुते

Thursday, 24 November 2016

प्रियांश...९५

प्रियांश...९५

कधी कधी वाटत खूप दूर निघून जावं, जिथे कोणी दुखावणार नसाव, जिथे फक्त प्रेम असावं...आयुष्य गोलमालच आहे! कधीही न संपणार वर्तुळ! जे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला गोल गोल फिरवतच राहील! काही मोक्याच्या क्षणात वाटेल झुगारून देऊया सारं पण, हे पाश सोडवत नाहीत! सगळी मोहमाया आहे...शेवटी काय तर भांडी वाजणारच 😂

प्रिया सातपुते

Sunday, 20 November 2016

चारोळी

पावसाच्या अवेळी
येण्याचं कोड आज सुटलं?
पहिल्या वहिल्या डेटचं
रोपटं आज रोवलं...

प्रिया सातपुते

Saturday, 19 November 2016

प्रियांश...९४

'पुरुष' हे पात्र खरतरं खूप वाईट पद्धतीने मार्केटिंग केलं गेलंय! वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये ते अत्यंत विचित्र आणि वाईट पद्धतीने मांडलं गेलंय, त्यामुळेच या पुरुषाला ओळ्खताना आपण गफलत करतो.

लहानपणापासून यांच्या मनावर बिंबवलं जात, तू मुलगा आहेस! मुले रडत नाहीत! मुले स्ट्रॉंग असतात अन मुली  नाजूक! तू हिरो आहेस! घरातील कामे मुलांनी नाही मुलींनी करायची असतात! एखादा मुलगा आईला मदत करतोय म्हटलं तर त्याला, बायकी आहेस का तू? असं बोलून हिणवल जातं! पहायचं झालं तर एका मातीच्या गोळ्याला सुंदर पुरुषात किंवा स्त्रिमध्ये घडवताना या भेदाभेदांमुळे ही एकमेकांस पूरक पात्रे, एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होऊन जातात.

एका स्त्रिला जसं मन असतं अगदी तसंच मन पुरुषाला सुद्धा असतं, त्यालाही भावना असतात, त्यालाही दुःखत, खुपत, त्यालाही रडू येतं! तो काही दगड नसतो ना भावनाशून्य! तोही हाडामासाचा, मन, प्रेम, यातना, अश्रू असणारा पुरुष असतो! फरक असतो तो जडणघडणीचा, विचारांचा! बस्स, बाकी काय स्त्री असो वा पुरुष आपण सारे एका माळेचे मणी...

जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिया सातपुते

Friday, 11 November 2016

प्रियांश...९३

Feeling....??? Empty  वाह! Sounds interesting!विचारचं किती सुंदर आहे हा, काश असं खरंच होता आलं असतं तर, किती जाम मज्जा आली असती! रोज माणूस एक बटन दाबून सगळ्या त्रासातून मोकळा होऊन झोपी गेला असता! काळ्या निरभ्र आकाशात एकटक चांदण्यापाहून स्वतःच अस्तित्व शोधायची गरज पडली नसती! आपल्याला ग्रांटेड धरणारी आपली माणसे, मित्रपरिवार न कळत का होईना कधी कधी आपल्यावर भावनांचा मारा करतात, मग त्या कधी इन्स्टंट असर दाखवतात तर कधी हळुहळू! काश असं बटन माझ्याकडे असतं तर काय झालं असतं? कदाचित काही मनातले कधीच जन्माला आलं नसतं, मला मीच सापडले नसते, मीही त्या बटणासारखी कृत्रिम बनून राहिले असते एक चालता फिरता जीव, ज्याला भावनाच नाहीत! Sounds not at all interesting! Feeling something inside you, is nothing but the sign that you're still alive!
मी जिवंत असल्याचा दाखला माझे शब्द मला रोज देतात!

प्रिया सातपुते

Thursday, 10 November 2016

प्रियांश...९२

प्रियांश...९२

नात्यांचं समीकरण करणं खूपच अवघड आहे! तू X, मी Y, की 2X, 5Y?  जिथे तुम्ही विचार न करता वावरता, कोणतेही छक्के पंजे न ठेवता वागता, जिथे तुमचे सारे मुखवटे गळून पडतात तिथे जे नातं रुजत ते अगदी मनातून असतं, ज्याच्या नशिबी हे नातं तो नखशिखांत श्रीमंत!

प्रिया सातपुते

Monday, 7 November 2016

चारोळी

आज काही श्वास
उसने देशील?
अजून थोडावेळ
पाहू दे तुला...

प्रिया सातपुते

Monday, 31 October 2016

चारोळी

एक पिंटुकला दिवा
उजळवतो आसमंत सारा
खुलवतो प्रत्येक मनाला
गुंफतो नात्यांना साऱ्या...

शुभ दीपावली!
प्रिया सातपुते

Thursday, 20 October 2016

प्रियांश...९०

प्रियांश...९०

स्त्रीचं आयुष्य हे कधीच तिच्या एकटीची मक्तेदारी असू शकत नाही! हवं तेव्हा कुठेही जाता यावं एवढा सुद्धा हक्क तिला नसतो. मनासारखं वागता यावं इतकाही नाही! तिला नेहमीच नात्यांच्या साखळदंडात जखडून ठेवलं जातं. ती कधीच स्वतःची नसते, अगदी कधीच शेवटच्या श्वासापर्यंत! तिला मनासारखं जगू देणारा पार्टनर जर तिच्या आयुष्यात आला तर ती एक स्त्री म्हणून वेगवेगळ्या रंगात त्याच्यासोबत जगू शकते!

प्रिया सातपुते

Wednesday, 19 October 2016

चारोळी

एक क्षण तुझा
एक क्षण माझा
दोघांच्या मिठीत
दरवळतो तो आपला...😘

प्रिया सातपुते

Thursday, 13 October 2016

प्रियांश...८८

प्रियांश...८८

आजकाल लग्नासाठी नवरा शोधणं खूपचं अवघड झालंय बाबा! अरेंज मॅरेज म्हणजे सगळ्यात भयंकर हॉरर मूवीच आहे! एका भल्या मोठ्या झाडाला नवरे नावाची फळे लागली आहेत, त्यातलं जे आवडेल ते तोडा, खा! नाही आवडलं तर फेकून द्या, दुसरं घ्या, तिसरं घ्या...! हा विचार एकदम भन्नाट आहे, पण रियल मध्ये न पचण्याजोगा! आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांचे अफेयरस प्रेम, टीपी असतात अन मुलींचे लफडं! जरी काहीही नसलं तरीही प्रश्नार्थक चिन्ह इथे येतंच! मुलगी बाहेर होती याचा अर्थ तिचा बॉयफ्रेंड असणारच, ती व्हर्जिन नसणारच! व्हर्जिन असूनही होणाऱ्या नवऱ्याच्या मनातली घालमेल फर्स्ट नाईट पर्यंत तरी जात नसणारच! बिचारा पुरुष किती रे त्याची घालमेल! स्वतः तो व्हर्जिन नसला तरी त्याला व्हर्जिन बायकोच हवी असते! व्हाय पीपल आर सो जजमेंटल? देवा सद्बुद्धी दे यांना!

काही दिवसांपूर्वीच एका मैत्रिणीशी बोलणं झालं, (😢 साला सगळे मला काऊनस्लर समजायला लागलेत, जो स्वतःच नवरा शोधत आहे😂) लग्नाआधी त्यांचं यावर बोलणं झालं होतं, सो कॉल्ड अफेयरस!
बिचारी तिला म्हणू कि तिच्या नवऱ्याला? दिसायला सुंदर, गोरी बायको तिचं अफेयर होत हे सल त्याच्या मनातून काही जात नाहीय! स्वःताला मॉडर्न म्हणून घेणारा, लग्न होईपर्यंत गोड गोड बोलणारा, अन लग्न झाल्यावर तिच्या भूतकाळाचे तिला टोमणे मारणारा हा प्राणी...स्वतःहून कुऱ्हाडीवर पाय मारतोय! मे बी याचं कधीच अफेयर नसावं, तिच्या पुढ्यात स्टाईल मारण्याच्या प्रकारात त्यानं जाणून बुजून देखील केलेलं असावं! म्हणून तो सत्य स्वीकारत नाहीय!
असं बिल्कुल समजू नका कि मी स्त्रियांची कड घेतेय, काही बायका सुद्धा असतात अश्या विचारांच्या, आमच्या फ्रेंड्सझोन मधल्या बऱ्याच जणांना बायकांच्या पुढ्यात हतबल व्हावं लागलं! हिचा का फोन आला तुला? मी आहे ना मग कशाला हव्यात तुला मैत्रिणी? मोजून पैसे देणाऱ्या, घर टू ऑफीस! तिकडेच का पाहिलस तू? सेम लाईक ऑब्सेस्ड गाईज!

आधीच्या काळात खूप बरं होत, कोणीच जास्ती शिकत नव्हतं, ना माणसाच्या अपेक्षा असायच्या, ज्याच्या पुढ्यात उभं केलं जायचं त्याच्याशी लग्न होऊन जायचं! ना प्रेम असायचं ना प्रश्न! ना मन ना भावना! शिक्षणाने सगळीकडे उद्धार केला! मनुष्याला स्वःताच्या भावना, मनाप्रमाणे जगण्याचं लायसन्स दिलं! मग, लग्नात देखील मला ज्याच्याशी कम्फर्टेबल वाटेल, त्याच्यासोबत प्रेमाने जगता येईल असा पार्टनर हवा असेल तर यात वावगं काय? इथे मग आडव्या येतात आपल्या परंपरा, जाती, पोटजाती, गोत्र, कुंडली! हा पसारा न संपणारा आहे! समोर असणारा आपला परफेकट् पार्टनर मग आपण तसाच जाऊ देतो, आपलं मन आपल्याला सांगत असतं शी इज द वन ड्युड! ही इज द वन बेब्स! पण, आपण ऐकतो आपल्या जवळच्या लोकांचं अर्थात कुटुंबाचं! आणि चूक करतो असं नाही, पण, आपला सोलमेट आपण गमावून बसतो! घरच्यांच्या खातीर मन मारून करून देखील टाकतो लग्न! आणि आयुष्यभर रिग्रेट करत राहतो काश....

प्रिया सातपुते

Tuesday, 11 October 2016

दसरा उर्फ विजयादशमी

सण प्रेमाचा
सण मनाच्या श्रीमंतीचा
सण माणसाच्या चांगुलपणाचा
सण नात्यांची परिभाषा बदलण्याचा
सण जुनं खुपण विसरून एक होण्याचा
सण भरभरून सोनं लुटून प्रेम वाढवण्याचा...

माझ्या साऱ्या कुटुंबियांना, मित्र परिवाराला विजयादशमीच्या सोनमयी शुभेच्छा!

सोनं घ्या सोन्यासारखे रहा
अन, प्रेम घ्या प्रेमासारखे रहा!

प्रिया सातपुते

Sunday, 9 October 2016

चारोळी

मन हे वेडे
का होते बावरे
तू समोर नसता
का होते कावरे...

प्रिया सातपुते

Friday, 7 October 2016

प्रियांश...८७

मुंबईहून परतल्यानंतर पहिल्यांदाच नवरात्रीत आई अंबाबाईच दर्शन घेण्याचा मोह झाला. संपूर्ण दिवस दगदगीचा होता, त्यातून इंटेन्स वर्कआउट करून बॅटरी पूर्ण डाऊन होती, तरीही जेवण उरकून पप्पा, त्रिशा अन मी दर्शनास सज्ज झालो. संपूर्ण बालपण मंदिराच्या शेजारी गेल्यामुळे आताच कमर्शियल मंदिर हल्ली मनाला भावत नाही! तरीही आज का कोणास ठाऊक एक ओढ लागली होती.
रात्रीचे साडे दहा वाजून गेले तरी सुद्धा दर्शनाची लाईन भली मोठी होती, मुख दर्शन करण्यातच शहाणपणा सुचला, त्याची रांग तर काही केल्या पुढे सरकेना, शेवटी अकराच्या सुमारास गर्दी पुढे सरकू लागली, लहान असताना या मंदिराच्या प्रत्येक पायरीवर हक्काने उडया मारायचो, गरगर देवी भोवती फिरत रहायचो अन आज भाचीच्या हातात स्टोलंच एक टोक बांधून माझ्या हाताला दुसरं! तिला धक्के लागू नयेत यांतच माझं सार लक्ष, अन पप्पा आम्हां दोघींना धक्का लागू नये यात!
शेवटी कित्येक वर्षांनी मंदिराची पायरी ओलांडली, दर्शन झालं, दोन क्षण सुद्धा तिथे उभं सुद्धा राहू शकणार इतकी गर्दी! तरीही देवीने दर्शन दिलं! सारा भूतकाळ त्या काही क्षणांत मनाला भरून पावणार सुख देऊन गेला!
दर्शन करून भवानी मातेला भेटून जाऊ हे मनात का आलं कोणास ठाऊक? तिथे देवीचा गोंधळ सुरु होता, सुंदर होत, पण, पटकन दर्शन घेऊन बाहेर येताना एक लहान मुलगा एकटाच रडत मंदिरात येत होता, त्रिशा पटकन बोलून गेली, "आतू तो मुलगा रडतोय एकटाच!" आजुबाजूला पाहिलं त्याच्यासोबत कोणीच नव्हतं, जवळ जाऊन त्याला उचलून घेतलं, थोडी विचारपूस केल्यावर कळलं पाखरू हरवलंय! जेमतेम चार वर्षाचा मुलगा, नाव श्रवण सांगत होता, धड त्याला संपूर्ण नाव पण सांगता येईना! पप्पांच नाव काय? "पप्पा". मला उमगलं याला काही सांगता येणार नाही, पटकन, बाहेर गोंधळ चालू होता तिथे गेले, तिथल्या वादकांना घडलेला प्रकार सांगितला, ते अनाऊंसमेन्टला रेडी झाले, ते बाळ काही केल्या त्या माणसांकडे जाईना! माझा हात घट्ट पकडून धरला, अन मनात प्रश्नांचं काहूर उठलं, मनात एकच विचार होता, याचे आईवडील इथेच भेटू देत! पोलीस काकांकडे जाऊया का आपण? यावर लगेच मान डोलवत, डोळ्यात पाणी आणून बावरलेल्या नजरेने पाहत होता! एवढ्यात त्याचे पप्पा आले! माझ्या काखेतून झपकन उडी मारली त्याने त्याच्या पप्पांकडे! हुश्श! थंक गॉड! बस एवढाच विचार आला तेव्हा! पप्पांना शंका तुमचाच मुलगा आहे ना? पप्पा जाम चिडले होते, तरीपण कंट्रोल केलं त्यांनी! मी त्या काकांना विचारलं, नाव श्रवणच आहे ना याच? ते बोलले नाही, "सर्वेश"! मग, शेवटी उपदेश म्हणण्यापेक्षा काळजीपोटी मी त्यांना बोलून गेले, असं सोडू नका हात, आजकाल जमाना ठिक नाही. त्याला नाव सांगता यायला हवं, कुठेही जाताना त्याच्या पॉकेट मध्ये चिठ्ठी ठेवा त्यात नाव, फोन नंबर ठेवा! अथवा गळ्यात आयडी लावा!प्लिज!
त्यांनी आणि त्यांच्या बायको दोघांनीही आभार मानले, अन सर्वेशला बाय करून आम्ही घर गाठलं!

हे सगळं सांगण्याचा प्रपंच का? तुमच्या आजूबाजूस कोणतंही लहानमुल एकटं, रडताना, अथवा बावरलेल दिसलं तर प्लिज इग्नोर करू नका! त्याला तुमची गरज असू शकते, त्याला तुम्ही पुढील धोक्यांपासून वाचवू शकता! आपल्या संपर्कातील सर्वांनाच लहानमुल गर्दीत नेण्याआधी आयडी गळ्यात घालायला द्या अथवा चिठ्ठी द्यायला सांगा. त्यावर संपूर्ण नाव, फोन नंबर नमूद करा. घरातील मुलांना संपूर्ण नाव आणि फोन नंबर तोंड पाठ शिकवा! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानमुल आपली जबाबदारी आहेत हे विसरू नका!

प्रिया सातपुते

Wednesday, 28 September 2016

प्रियांश...८६

आयुष्य नात्यांनी सजलेलं असेल तर ते खूपचं सुंदर असतं पण, आपण प्रत्येक नात्याला ग्रांटेड धरून त्यातली मज्जा हरवतो.

चार पाच दिवसापूर्वीच एका जुन्या मैत्रिणीशी गप्पा झाल्या, सुरुवात चॅट मध्ये झाली अन पंधरा मिनिटातच तिचा फोन आला. भडाभडा कधी एकदा मन मोकळं करते असं तिचं झालं होतं.
ती- लग्नाला जेमतेम एक वर्ष झालंय ग प्रिया, हा मला वेळचं देत नाही, सतत याच्या ऑफिशियल ट्रिप्स, घरी सुद्धा लॅपटॉप मध्ये घुसून असतो! मला तर वाटायला लागलंय मीच लॅपटॉप असते तर त्याच्यासोबत तेवढा वेळ तरी मिळाला असता! घरी सगळ्यांमध्ये असूनपण मी एकटी पडते. विकेन्ड्स पण काम चालूच असतं याच, आमच्यात धड बोलणं सोड माझ्याकडे पाहणं पण होत नाही याचं! माझी मानसिक कुचंबना होत चालली आहे! लग्न, नवीन घर, नवीन माणसं यांच्यासोबत ऍडजस्ट व्हायला हवं, याला फॅमिली ओरियेन्टेड बायको पाहिजे म्हणून मी जॉब सोडला, माझ्या मनात खूप निगेटिव्ह विचार येत आहेत, याचं कोणासोबत अफेयर आहे म्हणून हा मला असं करत तर नसेल ना? आता तर मला वाटू लागलंय मी हे लग्न करून फसले तर नाही ना? हल्ली तर डिव्होर्सचे विचार पण...इतकं सारं बोलून ती ढसाढसा रडू लागली!

मनात एक विचार टपली देऊन गेला, मी काय सांगणार हिला मी स्वतः सिंगल! I'm not suitable person to give advice on such matters damn it! Freak man!

मलाच कळत नव्हतं काय सांगणार तरी बोलावं तर लागणार होत...
मी- लग्नाआधीच तुला त्याचा जॉब प्रोफाइल माहित होता ना तुला?
ती- हो ग, पण, कोर्टशिप पिरियड मध्ये तो खूप वेगळा होता, दिवसातून त्याचे 25 फोन यायचे, खूप काळजी करायचा तो अन आता...
मी- अग, पण आता तू हक्काने त्याची झाली आहेस, थोडे बदल तर होणारच ना?
ती- तू माझी मैत्रीण आहेस कि त्याची?
तिचा चढलेला रागीट आवाज, मला हसूच आणत होता!
मी- तुझीच आहे ग! बरं ऐक, त्याचे प्रोजेकट् डेडलाईन आहे का?
ती- हो
मी- अरे यार, तुला माहीतच आहे ना डेडलाईन मध्ये काय हाल होतात ते? तू पण तर केलं आहेस काम!
ती- अग, पण गेले 3 महिने हा बिझीच असतो, फोन केला की बिझी, काही बोलायचं तर बिझी,....वर्कहॉलिक आहे ग हा! अँड आय हेट इट!
मी- तू अशी टोकाची भूमिका घेऊ नकोस, हेट अँड ऑल! एक तर तू आधी या ओव्हर इमोशनल झोन मधून बाहेर ये!
ती- अग, मी काय केलंय...
मी- प्लिज माझं आधी ऐकून घे...
ती- बरं
मी- मला असं वाटतंय तू रिकामी झाली आहेस मनात अन डोक्यात, त्यामुळे हे सगळे किडे उडया मारत आहेत! Start working again...तू जिजूशी बोल पण न कितपिट करता, म्हणजे तो पण शांतपणे ऐकेल! डेडलाईन्स जोक नाही हे तुला माहित आहे, थोडं समजून घे त्याचं प्रेशर! त्याला सांग तुला पुन्हा जॉब सुरु करायचा आहे!
ती- तो नाही बोलणार ग!
मी- हे तू आधीच का ठरवत आहेस? तो होच बोलेल! आधी तू बिझी असायचीस म्हणून डोक्यात किडे नव्हते! तू बोलून तरी बघ पोझिटिव्हली! मला वाटतंय यू शुड टॉक टू हिम, शेयर युवर इंसिक्युरिटीज.
ती- बघते...
मी- बघते नको बोलचं, आता विकेंड पण आली आहे, बोल त्याच्याशी, तुझा भांडखोरपणा बाजूला ठेऊन!
ती- ओके!

आज तिचा फोन येऊन गेला, मॅडम क्लोउड नाईन वर आहेत! सगळं आलबेल झालंय हे ऐकून खूप मस्त वाटलं! मॅडम जॉब सर्च मध्ये पण लागल्या आहेत!

हे एवढं सगळं सांगण्यामागे हेतू तसा निष्पाप आहे! कारण, मी स्वतः एक वर्कहॉलिक होते. आपल्याला कळत सुद्धा नाही आपण आपल्या कुटुंबाला किती दुखावतो, अन सगळ्यात भयानक म्हणजे स्वतः ला कसे गमावतो! समोर असतात ते फक्त डेडलाईन्स अन मग आपण त्यातलेच एक होऊन जातो! ना आपली पर्सनल लाईफ राहते ना फॅमिली!! जितक्या लवकर तुम्हाला उमगेल तितक्या लवकर या वर्कहॉलिसम मधून बाहेर पडा! कामाला फक्त कामच ठेवा, जितका वेळ घरी आहात, तो वेळ एन्जॉय करा!
आयुष्य सुंदर आहे त्याला वर्कहॉलिसम मध्ये वाया घालवू नका...

प्रिया सातपुते

Monday, 19 September 2016

प्रियांश...८५

मर्यादा प्रत्येक गोष्टीला असतात! पण, आपण कुठे पर्यंत रबर बनायचं हे ज्याचं त्याने ठरवावं लागतं. नाती सुद्धा या रबरेसारखी असतात, कधी खूप ताणली जातात, तर कधी पुन्हा जवळ येतात! पण, सारेच रबर लवचिक नसतात ना! काही घट्ट राहतात अन तुटून जातात, तर काहींचे तुकडे पडतात तर काही कापले जातात!

प्रिया सातपुते

Friday, 16 September 2016

प्रियांश...८४

उसवलेल्या नात्याला शिवत बसण्यापेक्षा त्याला तिथेच झटकून आयुष्यात पुढे निघून जाणं कधीही शहाणपणाचं ठरेल!

आयुष्यात तुम्ही एखाद्याची सावली बनता, त्याच्या किंवा तिच्या पडत्या नडत्या काळात साथ बनता! त्यांच्या सोबत ठाम उभे राहता! जिथे तुम्ही स्वतःला मोकळं करू शकता तिथं तुम्ही जळू सारखे चिटकून राहता ते स्वतःच रक्त, प्रेम, वेळ देत! कालांतराने चक्र फिरतात अन हीच व्यक्ती त्यांच्या सुखद काळात मात्र तुम्हांला सोडून देते अर्थात डीच करते, ते सुद्धा एका क्षणात! विचार सुद्धा शिवत नाही अश्या लोकांच्या मनात की आपल्या वाईट दिवसात ही व्यक्ती माझ्यासोबत लढली, माझ्यासोबत ठाम राहिली, मला नेहमी पाठबळ देत राहिली,....शून्य आठवण!

अश्या माणसांना इतकं महत्व द्यायचंच कशाला की ते तुमच्या आयुष्यात डोकावतील, पुन्हा यायला पाहतील, त्यांना माफ करा पण, हे लक्षात ठेवा, एकदा सोडून गेलेली व्यक्ती तुम्हाला पुन्हा सोडू शकते! स्वतःला दुजाभाव न देता स्वतः वर प्रेम करा, स्वतःच्या आयुष्याचा राजा राणी बना, तुमचा लाईफ पार्टनर तुम्हाला शोधत नक्कीच तुमच्या हृदयाचं दार ठोठावेल!

प्रिया सातपुते

Monday, 12 September 2016

चारोळी

हल्ली तुझ्या हुंदक्यांचे आवाज
माझ्या कानी रडतात
माझी घुसमट सोडवं
म्हणून गाऱ्हाणं गातात...

प्रिया सातपुते