Feeling....??? Empty वाह! Sounds interesting!विचारचं किती सुंदर आहे हा, काश असं खरंच होता आलं असतं तर, किती जाम मज्जा आली असती! रोज माणूस एक बटन दाबून सगळ्या त्रासातून मोकळा होऊन झोपी गेला असता! काळ्या निरभ्र आकाशात एकटक चांदण्यापाहून स्वतःच अस्तित्व शोधायची गरज पडली नसती! आपल्याला ग्रांटेड धरणारी आपली माणसे, मित्रपरिवार न कळत का होईना कधी कधी आपल्यावर भावनांचा मारा करतात, मग त्या कधी इन्स्टंट असर दाखवतात तर कधी हळुहळू! काश असं बटन माझ्याकडे असतं तर काय झालं असतं? कदाचित काही मनातले कधीच जन्माला आलं नसतं, मला मीच सापडले नसते, मीही त्या बटणासारखी कृत्रिम बनून राहिले असते एक चालता फिरता जीव, ज्याला भावनाच नाहीत! Sounds not at all interesting! Feeling something inside you, is nothing but the sign that you're still alive!
मी जिवंत असल्याचा दाखला माझे शब्द मला रोज देतात!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment