Showing posts with label प्रियाटी!. Show all posts
Showing posts with label प्रियाटी!. Show all posts

Monday, 15 February 2016

प्रियांश. . . ७१

प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी असा क्षण येतो, जिथे सार संपाव असं वाटत, प्रत्येक अडचणीतून मुक्त व्हावं असं वाटत, अश्या क्षणात जो तरला तो जगला अन जो बुडाला तो कायमचा संपला. अगदी असचं काहीसं आज स्वतः सोबत होत आहे, मुक्तपणे नक्की कुठे तराव? स्वच्छंदी आकाशात कि निळ्याशार समुद्रात?

प्रिया सातपुते

Wednesday, 27 January 2016

चारोळी


तुझ्या अर्धवट
पाणी भरलेल्या डोळ्यात
बघण्याच माझ साहस नव्हत
कारण माझच चुकल होत…

प्रिया सातपुते 

Monday, 28 September 2015

कधी एके काळी मलाही मोरपीस हवा होता...

कधी एके काळी
मलाही मोरपीस
हवा होता…

वहीच्या पानात
जपून मलाही
तो पहायचा होता…

कधी एके काळी
मलाही मोरपीस
हवा होता…

स्वतःच्याच गालावरून
मलाही तो
फिरवायचा होता

कधी एके काळी
मलाही मोरपीस
हवा होता…

गुलाबी रंगांच्या स्वप्नांत
त्यान मलाही
गोजारायला हवं होत… 

कधी एके काळी
मलाही मोरपीस
हवा होता…

प्रिया सातपुते