आयुष्य नात्यांनी सजलेलं असेल तर ते खूपचं सुंदर असतं पण, आपण प्रत्येक नात्याला ग्रांटेड धरून त्यातली मज्जा हरवतो.
चार पाच दिवसापूर्वीच एका जुन्या मैत्रिणीशी गप्पा झाल्या, सुरुवात चॅट मध्ये झाली अन पंधरा मिनिटातच तिचा फोन आला. भडाभडा कधी एकदा मन मोकळं करते असं तिचं झालं होतं.
ती- लग्नाला जेमतेम एक वर्ष झालंय ग प्रिया, हा मला वेळचं देत नाही, सतत याच्या ऑफिशियल ट्रिप्स, घरी सुद्धा लॅपटॉप मध्ये घुसून असतो! मला तर वाटायला लागलंय मीच लॅपटॉप असते तर त्याच्यासोबत तेवढा वेळ तरी मिळाला असता! घरी सगळ्यांमध्ये असूनपण मी एकटी पडते. विकेन्ड्स पण काम चालूच असतं याच, आमच्यात धड बोलणं सोड माझ्याकडे पाहणं पण होत नाही याचं! माझी मानसिक कुचंबना होत चालली आहे! लग्न, नवीन घर, नवीन माणसं यांच्यासोबत ऍडजस्ट व्हायला हवं, याला फॅमिली ओरियेन्टेड बायको पाहिजे म्हणून मी जॉब सोडला, माझ्या मनात खूप निगेटिव्ह विचार येत आहेत, याचं कोणासोबत अफेयर आहे म्हणून हा मला असं करत तर नसेल ना? आता तर मला वाटू लागलंय मी हे लग्न करून फसले तर नाही ना? हल्ली तर डिव्होर्सचे विचार पण...इतकं सारं बोलून ती ढसाढसा रडू लागली!
मनात एक विचार टपली देऊन गेला, मी काय सांगणार हिला मी स्वतः सिंगल! I'm not suitable person to give advice on such matters damn it! Freak man!
मलाच कळत नव्हतं काय सांगणार तरी बोलावं तर लागणार होत...
मी- लग्नाआधीच तुला त्याचा जॉब प्रोफाइल माहित होता ना तुला?
ती- हो ग, पण, कोर्टशिप पिरियड मध्ये तो खूप वेगळा होता, दिवसातून त्याचे 25 फोन यायचे, खूप काळजी करायचा तो अन आता...
मी- अग, पण आता तू हक्काने त्याची झाली आहेस, थोडे बदल तर होणारच ना?
ती- तू माझी मैत्रीण आहेस कि त्याची?
तिचा चढलेला रागीट आवाज, मला हसूच आणत होता!
मी- तुझीच आहे ग! बरं ऐक, त्याचे प्रोजेकट् डेडलाईन आहे का?
ती- हो
मी- अरे यार, तुला माहीतच आहे ना डेडलाईन मध्ये काय हाल होतात ते? तू पण तर केलं आहेस काम!
ती- अग, पण गेले 3 महिने हा बिझीच असतो, फोन केला की बिझी, काही बोलायचं तर बिझी,....वर्कहॉलिक आहे ग हा! अँड आय हेट इट!
मी- तू अशी टोकाची भूमिका घेऊ नकोस, हेट अँड ऑल! एक तर तू आधी या ओव्हर इमोशनल झोन मधून बाहेर ये!
ती- अग, मी काय केलंय...
मी- प्लिज माझं आधी ऐकून घे...
ती- बरं
मी- मला असं वाटतंय तू रिकामी झाली आहेस मनात अन डोक्यात, त्यामुळे हे सगळे किडे उडया मारत आहेत! Start working again...तू जिजूशी बोल पण न कितपिट करता, म्हणजे तो पण शांतपणे ऐकेल! डेडलाईन्स जोक नाही हे तुला माहित आहे, थोडं समजून घे त्याचं प्रेशर! त्याला सांग तुला पुन्हा जॉब सुरु करायचा आहे!
ती- तो नाही बोलणार ग!
मी- हे तू आधीच का ठरवत आहेस? तो होच बोलेल! आधी तू बिझी असायचीस म्हणून डोक्यात किडे नव्हते! तू बोलून तरी बघ पोझिटिव्हली! मला वाटतंय यू शुड टॉक टू हिम, शेयर युवर इंसिक्युरिटीज.
ती- बघते...
मी- बघते नको बोलचं, आता विकेंड पण आली आहे, बोल त्याच्याशी, तुझा भांडखोरपणा बाजूला ठेऊन!
ती- ओके!
आज तिचा फोन येऊन गेला, मॅडम क्लोउड नाईन वर आहेत! सगळं आलबेल झालंय हे ऐकून खूप मस्त वाटलं! मॅडम जॉब सर्च मध्ये पण लागल्या आहेत!
हे एवढं सगळं सांगण्यामागे हेतू तसा निष्पाप आहे! कारण, मी स्वतः एक वर्कहॉलिक होते. आपल्याला कळत सुद्धा नाही आपण आपल्या कुटुंबाला किती दुखावतो, अन सगळ्यात भयानक म्हणजे स्वतः ला कसे गमावतो! समोर असतात ते फक्त डेडलाईन्स अन मग आपण त्यातलेच एक होऊन जातो! ना आपली पर्सनल लाईफ राहते ना फॅमिली!! जितक्या लवकर तुम्हाला उमगेल तितक्या लवकर या वर्कहॉलिसम मधून बाहेर पडा! कामाला फक्त कामच ठेवा, जितका वेळ घरी आहात, तो वेळ एन्जॉय करा!
आयुष्य सुंदर आहे त्याला वर्कहॉलिसम मध्ये वाया घालवू नका...
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment