Tuesday, 29 November 2011

नेट-प्रेम भाग-५


       


श्री आणि श्रेयची गट्टी जमून चार महिने झाले होते, दोघांचा रोजचा कार्यक्रम ठरलेला होता रात्री 10 ते मध्यरात्री १२ किंवा १ पर्यन्त चॅट करणे. त्यापेक्षा लेट श्री तिला थांबू देत नव्हता. श्री मुळे श्रेया मध्ये बरेच बदल घडले होते, ती आई सोबत कमी भांडायला लागली होती, आणि श्री मुळे तिची मराठी पण खूप चांगली झाली होती. नाहीतर या मुंबई च्या मुलींची मराठी म्हणजे चहा मध्ये  मिठच!!!

श्री चा नॉलेज फक्त इंजिनियरिंग मध्येच नव्हता तर तो साहित्याचा पण खूप अभ्यास करायचा. मराठी, इंग्लीश नॉवेल्स आणि बरीच पुस्तके त्याच्या संग्रहात होती. 
मुंबईच्या श्रेया मुळे औरंगाबादच्या श्री मध्ये पण खूप सारे बद्दल झाले होते. हल्ली श्री साहेब ऑफीस मधून शार्प  ८ ला बाहेर पडायचे, त्याला आता घरी यायला जड जात नव्हत. जो मुलगा वीकेंड्स ना पण बाहेर
जायच टाळत होता तो आता चक्क पुण्यात त्याच्या कलिगस सोबत बाहेर फिरायला, नाइट आउट ला जात होता, श्रेया ने श्री ला आयुष्य जगायला शिकवल होत...

श्रेया च्या वहिनी च्या भावाच लग्न होत गोव्याला तिने श्री ला संगितल.

श्री- तू जात आहेस का?
श्रेया- डोन्ट नो!
श्री- गोआ इज गुड प्लेस, अन लग्नात काय तुम्हा मुलींची मज्जा च असते.
श्रेया- अच्छा!! ते कस रे?
श्री- साडी, ज्वेलरी, मेकअप आणि मुलांची लाईन..
श्रेया- हेहे..:-P
श्री- मग लग्नाची शॉपिंग झाली कि नाही? 
श्रेया- मी कशाला करू! माझं थोडीच लग्न आहे, वहिनींची तयारी झालिय..मला फक्त अटेंड करायच आहे..
श्री- अच्छा! कधी आहे लग्न?
श्रेया- परवा आहे
श्री- परवा आहे आणि तू आता सांगते आहेस मला
श्रेया- अरे मी जाणार नव्हते पण सगळेच जात आहेत त्यामुळे जाव लागणार
श्री- किती दिवसांकरता?
श्रेया- ३ डेज़
श्री- ह्म्म्म 
श्रेया- झोपाव लागेल आता, उद्या वहिनी सोबत खूप काम करायच आहे पॅकिंग, वगेरे.
श्री- ओक उद्या येणार आहेस का ऑनलाइन?
श्रेया- हो येणार रे
श्री- ओक गुड, पळ आता, gn sd
श्रेया- gn sd .
श्रेया लोग आउट झाली तसा श्री पण लॉग आउट झला, त्याला कळात नव्हत की तो इतका अपसेट का झाला आहे, डोळे बंद करून तो झोपण्याचा ट्राय करत होता पण श्रेया त्याच्या मनात घोळत होती. शेवटी उद्या ती भेटेलच म्हणून तो झोपी गेला. 

दुसऱ्या दिवशी रात्रीचे २ वाजून गेले होते, श्रेया ऑनलाइन आलीच नाही. श्री खूप उदास झाला होता. मग त्याने विचार केला 'थकली असेल', तो वेड्या सारखा स्वत:लाच उत्तर देत होता.

श्री ला जाणवत होत पण तो मान्य करत नव्हता, तो श्रेया च्या प्रेमात पडला होता.........


प्रिया सातपुते 



Tuesday, 22 November 2011

Baba



झोपलेल्या बाबा कडे पाहून वाटत,
दिवस कशे भुर्रकन उडून गेले,
त्याच्या परीला पंखतर होते पण उडता येत नव्हत,
बाबा तिला कधी दूर जाऊ देत नव्हता,
कॉलेज मधून उशीर झाल्याची त्याची तगमग,
मला कधी कळलीच नाही,
मुलगी थोड्या दिवसात सासरी जाईल,
या भीतीत तो जगतोय,
त्याच्या झोपलेल्या चेह्रायावारचे भाव
आज मला, कळतायत
पोटच्या गोळ्यासारख मला त्यान वाढवल,
लहानच मोठ केल,
मागण्या आधीच प्रत्येक गोष्ट त्यान मला दिली,
ज्या बाबाने मला आयुष्य जगायला शिकवलं,
त्याला सोडून जाव लागेल हि कल्पनाच करवत नाही,
लहान असताना आईचा मार पडताना
बाबाची कुशीत शिरायचे,
लग्नानंतर  पण घेईल ना बाबा मला कुशीत ?

प्रिया सातपुते

Sunday, 20 November 2011

Khoon


Roj nava daav, roj navi manse,
Roj hotat ithe natyanche khoon,
Koni kadhi sura gheun ubha,
Tar koni tikhat shabd,
Kay kami bochnar?
Hach vichar kartey mi…
Konala dakhvu ya jakhama?
Jya disatch nahit,
Fakt salat rahatat,
Jase rastyvar marun padlelya,
Pretala kavale tochat astat…
Jyanchya sobat bagdle,
Jyana mazya mukya shabdatle bhav samjayche,
Tech ata prashnarthak najarene pahatat…
Khup door nighun aale ahe,
Parat firnyache sare marg dhusar ka zalet?
Ek haak,
Koni deil ka mala
Uchalela sura koni fekun deil ka?
Koni thambvel ka maza honara ha khoon…???

Priya

Friday, 18 November 2011

नेट-प्रेम भाग-४





मोबाइल च्या कर्ण कर्कश्य रिंग मुळे श्री ची झोप उडाली...ऑफीस कॉलिंग...तो वैतागला होता...अनीच्छेने का होईना त्याने कॉल आन्सर केला, "I'll work from home today, as, I'm not feeling good." आणि त्याने बॉसला कळवून टाकलं. सकाळचे ११ वाजले होते. किचन मध्ये जाऊन त्याने चहा ठेवला, ऑफीस मधून दर २ मिनिटा मध्ये कॉल येत होते, तसा त्याने पटकन लॅपटॉप ओन् केला आणि काम सुरू केल. हॉटेल मध्ये कॉल करून तस त्याने ब्रंच पण ऑर्डर करून टाकला...

कामातून थोडा टाइम मिळताच त्याने याहू ला साइन इन केल...खूप सारे फ्रेंड्स ऑनलाइन होते, काही मेसेजस आले पण होते, काही ना रिप्लाइ करत त्याने स्टेटस बिज़ी करून टाकलं. डोरबेल वाजली तसा त्याचा जीव भांड्यात पडला, ऑलरेडी पोटात कावले डान्स करत होते...विदाउट ब्रश ऑलरेडी त्याने चहा घेतला होता आणि आता तो तसाच विदाउट ब्रश ब्रंच करणार होता. खान करत करत टीवी सुरू होता आणि साइड बाय काम पण.

काम करत असताना त्याला याहू च नोटिफिकेशन आल, श्रेया_बॉस एक्स्पेक्टेड युवर फ्रेंड रिक्वेस्ट...तस त्यान चेक केल तर ती ऑनलाइन होती, त्याने तिला मेसेज करून टाकला, तसा त्याला इन्स्टेंट पण अनपेक्षित रिप्लाइ मिळाला, ऑलरेडी चिडलेल्या माणसाला आणखी कसा त्रास द्यायचा हा श्री चा जन्मजात गुण होता आणि तो ते काम खूप छान प्रकारे पार पडत होता.
पण नंतर त्याला जाणवल की श्रेया मॅडम खरच फस्टरेट आहेत, श्री ने तिचा सारा प्रॉब्लेम एकूण घेतला, कशी ती आई सोबत भंडली, का भंडली....तो खूप संमजावत होता तिला पण तीच डोक फिरल होत..त्याला कळत नव्हत काय बोलाव, शेवटी तो बोलून गेला की, "माझी आई पण अशीच होती, मी पण असाच चिडायचो, आणि आता आई नाहीय तेव्हा समजत मला."
श्रेया पण पटकन सॉरी बोलून गेली त्याला, पण या वाक्यामुळे खुपच फरक पडला श्रेया वर, ती थोडी का होईना शांत झाल्या सारखी वाटत होती. संध्याकाळचे ७ वाजत आले होते, त्याला आता थोडा वेळ का होईना बाहेर जाऊन यायच होत, त्या बहाण्याने त्याने तिला घरी जायला संगितल. श्रेया ने पण जाते मंतल्यावर त्याला थोडं बर वाटलं. याहू वरुन लॉग आउट करून, तो डाइरेक्ट बाथरूम मध्ये  आंघोळीला पळाला, थोड्या वेळात पटापट तयार होऊन तो घराबाहेर पडला.
रात्रीचे ८ वाजले होते, श्री भराभर पाऊले टाकत होता, थोड्याच वेळात त्याला मुलांच्या गोंधळाचा आवाज ऐकू येत होता, प्रत्येक पावला मागे आवाज वाढत चालला होता आणि श्रीच्या चेहरयाचे भाव बदलत चालले होते, त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्या झलकत होत. तो पोहचला होता, आताच्या जगात याला "स्लम" अर्थात "झोपडपट्टी " म्हणतात, तो पोहताच सारी छोटी मुले त्याला येऊन चिकटली..सगळीकडे एकच गोंधळ श्री दादा आला रे....
श्री प्रत्येक आठवड्यात जितक जमेल तितक्या वेळा येऊन इथल्या मुलांना वेळ देत होता, त्याना त्यांच्या अभ्यासात मदत करत होता, कधी कधी छोटी मोठी भांडंण, रूसवे फूगवे सोडवून देत होता. श्रीला त्याच्या आई नंतर यांचाच आधार होता, कलीग्स सोबत पब, क्लब्स ला जान त्याला आवडायच नाही मुळात तो त्या ढाच्यात बसत नव्हता, सगळे मित्र त्याच्या मागे लागून थकून जात पण तो कधीच पब, क्लब च्या पायर्‍या चढला नाही. रात्रीच जेवण पण पवार काकून कडे आटपून तो पुन्हा बच्चापार्टीत रमून गेला. ९.३० होत आले होते त्याला आता निघायच होत, ऑफीस मध्ये रोज वर्क फ्रॉम होम फंडा चालू शकत नाही यावर तो खूप उदास होता. पण, पर्याय नाही. तो घरी निघाला का कोणास ठाऊक पण त्याच्या विचारात श्रेया रेंगळली, घरी गेली असेल का ती वेडबाई? परत भांडली नसेल बहुतेक? स्ट्रेंज वाटत होत श्रीला पण! विचारांचे घोडे दौडत ते त्याला घरी गेल्या गेल्या ऑनलाइन घेऊन गेले. ऑनलाइन जाताच श्रेया चा मेसेज आला आणि त्याच्या ओठांवर स्मितहास्य झळकल.

प्रिया सातपुते 


Sunday, 13 November 2011

नेट-प्रेम भाग-३



                       

रोजचा  रटाळ दिवस संपवून श्रीकांत घरी परतला, दाराच कुलुप उघडताना दोन सेकेंड का होईना त्याच्या मनात आईचा विचार आला, हताषपणे दार उघडून, डोळ्यातल पाणी पुसत  वॉश बेसिन कडे गेला आणि जोर जोरात पाण्याचे फवारे चेहरयावर मारुन घेऊन, तसाच गॅलरीत जाऊन उभा राहिला, थंड गार वारा त्याच्या ओल्या चेहररयाशी भिडत होता, एकटक अंधरया  आकाशात तारयांकडे  पाहत फक्त एकच शब्द त्याच्या तोंडातून निघाला.."आई"….

बराच वेळ झाला होता, सेल फोन ची रिंग होऊन त्याच लक्ष भरकटल, सेल वर नाव दिसत होत तसा त्याचा चेहरा पुन्हा जास्तचं गंभीर झला, ऑफीस मधून कॉल होता बॉस चा, अझ  यूजवल ऑफिशयल टॉक्स सुरू झाले आणि त्याचा चेहरा अधिकच शांत आणि गंभीर झाला, कॉल सुरू असतानाच त्याने लॅपटॉप काढला, नेट कनेक्ट केल, काही मेल्स फॉर्वर्ड केले आणि फाइनली ४० मिनिट्स नंतर कॉल संपला,..रात्रीचे २ वाजत होते, अजुन तो जेवला पण नव्हता. किचन मध्ये जाऊन जेवण घेऊन आला, पण एकही घास उचलला जात नव्हता…अचानक का कोणास ठाऊक उठून बेडरूम मध्ये गेला, कपाटात एक अल्बम होता तो घेऊन पाहु लागला, आईच्या फोटोला छातीशी लावून रडू लागला…एक एक पान पालटून पाहाताना त्याचा हात थारथरत होता, जुन्या आठवणी जितक्या कोंडून ठेवल्या होत्या तितक्याच तीव्रतेने त्या उन्मळून बाहेर येत होत्या…तसाच बसून राहिला श्री. रडून त्याचा चेहरा सुजला होता आणि डोळे लाल लाल झाले होते, नको असताना पण तो उठला थंड झालेल्या ताटाकडे गेला दोन घास खाऊन, ताट तसच ठेऊन आला. लॅपटॉप समोर धरून काम करवेना म्हणून तो याहू ला कोणी फ्रेंड ऑनलाइन दिसतो का पाहत होता…कोणीच नव्हत म्हणण्यापेक्षा यालाच कोणाशी बोलायच नव्हत. फालतू मध्ये  चॅट रूमस  मध्ये जाऊन आयडीज पाहत होता, एका आयडीवर येऊन तो थांबला विचार करून त्याने मेसेंज…आयडी होता “श्रेया_द_बॉस”.  
 मेसेंज होता “हाय बर्डन ओन् सब श्रेया!!”
त्याला गॅरेंटी होती की ही मुलगीच आहे, टिपिकल गर्ल इन्स्टेंट रिअक्शन त्याला भेटलीच, “एक्सक्यूस मी !!  हाउ डेअर यु से लाइक देट !!
श्री- सॉरी आई वाज़ जस्ट चेकिंग इफ इट्स गर्ल ऑर नॉट
श्रेया- देण वॉट यु थिंक हू आई एम?
श्री-बॉस आई बिलीव!!
श्रेया- एस आई एम
श्री- हम्म्म…मी तर घाबरलो बाबा
श्रेया- मग घाबरलाच पाहिजे ना!!
श्री- मराठी?
श्रेया- मी मराठी!
श्री- bdw वॉट यू डुईंग सो लेट? गर्ल्स डोन्ट कम अप सो लेट
श्रेया- वाय? असा नियम आहे का कुठे?
श्री- तस नाही ग पण…
श्रेया- gtg  बाय 
श्री- वाय? एंग्री ? वेट

तोपर्यन्त ती निघून गेली होती.  काही क्षण तो तसाच बसून राहिला मग त्यान काही टाइप केल- नियम तर नाही तुम्ही तर बॉस आहात ना…
फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करून त्यान नेट बंद केल, लॅपटॉप पण..घड्याळात पाहील तर पहाटेचे ६.३० झाले होते. श्री सोफयात जाऊन लेटून गेला. थोडा वेळ तो छताकडे पाहत राहिला कोण जाणे त्याला अंधारात काय दिसत होत. हलकेच पापण्या मिटून तो फायनली झोपी गेला, आणखी एका रटाळ दिवसाला सामोरा जायला.....


प्रिया सातपुते 
  



Saturday, 5 November 2011

Sutka

Andharat timtimnara
prakash
ani
Andharat lukluknara
kajva
doghehi ekch gosht kartat
Andhakaratun swatahachi sutka..

Nisarg Mitra

Surya kadhicha aakashat yeun sangtoy-
visar sar jun, nava divas, navi aasha,
Fool sugandh fulpakharana det shikvtay mala-
dilela sugandh parat yet nahi, sarvana det rahav,
Hirvagaar Vruksh mala teklel pahun sangu lagla-
kitihi sankat aali tari swathach astitva visru nako,
mag itukali paan pan bolu lagli mantat kashi-
aayushya ek marg asto jithe vegvegale rutu yetat an jatat, konihi
chirantan nasat,
Paulvatetun chaltana kata bolu lagla-
Itak kankhar ho jar koni tochalch tari tyalach lagl pahije,
mag jamin sangu lagli-
sahan kar pan chukana nahi, pramanik raha swataha chya manashi
manje sagle marg opopch milatil,
varyachi zuluk kanat sangun geli-
kadhi kadhi bandh sutlach tari gar varyasarkh thand ho, pan kahi
thikani garam varya sarkhi ho, swatahacha fayda uthvu nako deu
konalach,
nadichya shant panyakade pahat hote toch tehi sangun gel-
swatahachya manat kay ahe he kadhich kalu nako deu samudrachya
panyapramane ani yogya veli yogya goshti nadichya panyasarkhya dakhav,
toch pavsacha chhotasa themb othanshi yeun padla,
othanvarti garva det manala-
prem karnaryanvar bharbharun prem kar,
toch veej chamkun manali-
swatahache nirnay dusryanvar nako sopvu, swatahach astitva jap,
pavsat chimb bhijun,
dhag gele vishrantila,
chandra chandnyachi ratr sajali,
Chandnya manalya-
Sampla ata divas, ugvel navi pahat, shant zopi ja, sajja ho navya
divsala samori jayla,
Toch chandra manala-
Kitihi dukh asal te aajchya chandnya ratri visrun ja,
Dukhas chiktun nako rahus,
Zop an udya sathi sajja ho...

Friday, 4 November 2011

Nakalatch he...

Nakalatpanech sare
ghadun gele,
nakalatpanech
ekmekanche dole
nistabhatene ekmekana
pahun gele,
Nakalatch,
tu mazya manachya an mi tuzya manachya
aarpar pahu lagle
pratek bhavache, tarangache arth
samju lagle.
Nakalatch,
vivahbandhanat na adaktahi
aapan aaple houn gelo,
Nakalatch,
sare ghadat rahate
aayushya hi nakalatch sar kahi
sangun takate,
Nakalatch,
tuzya shabdatun
bandhan mukt houn
ek sansar suru zala
Nakalatch,
eka tanhulin
aapal jaganch badlun takal,
Nakalatch,
sare ghadate
Nakalatch,
sare fulate
Nakalatch,
sare kshan stabhad pane athavanitun vihar karun
shavbhumit jaun ektech
jalun jatat an,
Nakalatch,
athavanina ubara yeto
to datato an
tapakan galavarun
haluhalu sarkat khali padato...
PRIYA

Savli.

Tuzi chahul lagtach
vadhat jate hi savali
andharachya garketun
baher kadhate hi sakhi