Monday, 1 April 2013

काही मनातले- पप्पा आणि मी


आज परीक्षा संपवून घरी आल्यापासून, माझं मन भिरभिरत होत, जसं कि त्याला उडायचं होत. पप्पा घरी येउन थोडाच वेळ झाला होता, सहसा एकदा स्वारी घरी आली कि बाहेर जात नाही, पण, आज दिवस जणू माझ्या मनाप्रमाणे वागणार होता. पप्पा आणि मी पट्कन निघालो, पप्पा माझ्या नवीन बाईकला आज पहिल्यांदाच चालवणार होते. 

कोल्हापूरच्या ट्रेफिक मधून सटकायला जास्ती वेळ लागला नाही, नवीन बांधल्या गेलेल्या उड्डाणपुलावरून आमची बाईक सुसाट तर नव्हती पण, वाऱ्याची प्रत्येक झुळूक मनाला एक वेगळीच अनुभूती देत होती. घरी जितकं बोलन होत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्ती आज आम्ही धमाल केली. 

सरनोबतवाडी कडून येताना, भिरभिरणारा वारा आणि चांदण्यांनी जणू मला पुन्हा एकदा लहान करून टाकल. लहानपणी त्याचं बोट पकडून चालणारी मी, बाईकच्या मागे बसून पुन्हा तेच अनुभवत होते... 
जितक्या या क्षणांना घट्ट मिठ्ठीत घ्यावं तितकेच ते गालांवर गुलाबी हसू ठेऊन उडून जातात, अगदी बाईकच्या पाठी मागे बसून जणू मी उडण्याचा अस्वाद घेतला... 


प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment