Sunday, 31 July 2016

प्रियांश...८०

People are so judgmental about others!

दुसऱ्याने आयुष्यात काय झेललं आहे याचा विचार न करता, लोकं त्यांच्याबद्दल मनात येईल ते वाईट बोलतात, ते दुसऱ्यांपर्यंत कसं पोहचवता येईल हेही पाहतात! दोन बेस्ट फ्रेंड्स मग ते जर भिन्नलिंगी असतील तर त्यांच्या चारित्र्याचे धिंडवडे काढले जातात. बाईकवर बहीण भाऊ चालले असले तरी असं पाहिलं जातं की काय पाप केलं!

एकचं बोलावसं वाटतंय, स्टॉप बिइंग जजमेंटल!

प्रिया सातपुते

Saturday, 30 July 2016

प्रियांश...७९

सैराट ही एक अप्रतिम कलाकृती आहे, फक्त तो सिनेमा एका उच्चवर्णीय डायरेक्टरने काढला नाही हाच त्याचा गुन्हा! मराठी सिनेमाच्या खूप साऱ्या प्रतिभावंत कलाकारांनी कौतुकाचे दोन शब्द सुद्धा ऐकल्याचे वाचले नाही! का तर डायरेक्टर खालच्या जातीचा आहे! हल्ली काय वाटेल ते सैराट बद्दल बोललं जातं आहे! बलात्कार सैराट मुळे वाढले, पिढी खराब होतेय...

अरेच्या हे आधीपासून होत आहे या समाजात! फरक इतकाच की आता लोक पुढे येऊन बोलू लागेलत, मिडिया सक्रीय झाला आहे. पण, लोकांची व्यसने वाढली आहेत...दारूच्या नशेत माणूस लहान बाळामध्ये, लहान मुलीमध्ये, तरुणी मध्ये, वृद्धेमध्ये सुद्धा फरक पाहू शकत नाही, त्या नीच राक्षसाला शमवायची असते त्याची वासना! या दारू बद्दल बहिष्कार टाकाता का? दारू समाजाची कीड आहे, या बद्दल बोलायचं सोडून समाजात होणाऱ्या विघातक परंपरा आपल्या समोर मांडल्या, ऑनर किलिंग किती भयानक आहे, हे सत्य दाखवलं म्हणून सैराट वाईट का? फालतू सैराट विरोधातील मेसेजस, वॉटसअप वर फिरवताना लोक हे विसरतात की त्यांनी सुद्धा प्रेम केलं आहे, जर नाही तर त्यांच्या मुलांनी केलंच आहे! या वयात जर मुले प्रेमात पडणार नाहीत मग काय म्हातारे झाल्यावर पडतील? अन या निरागस भावनांना वेगळंच रूप दिल की मग निष्पाप मुलं जीव गमावून बसतात! किती वर्षे हा समाज जातीच्या विळख्यात अशी रक्त पिणार?

प्रिया सातपुते

Wednesday, 27 July 2016

कविता

का कोणास ठाऊक
मी रात्रीचा दिवस
अन दिवसाची रात्र करतेय
फक्त तू स्वप्नांत येशील म्हणून
पण, तू काही येत नाहीस
दिसते ती फक्त तुझी पाठमोरी सावली
तुझ्या सावलीला पकडावं म्हंटल तर
ती काही हाती लागत नाही,
लागते ती फक्त निराशा
तुझ्यावर केलेल्या प्रेमाची!
पण, का कोणास ठाऊक
मी आज खूप खुश आहे
मला माझीच हरवलेली सावली
परत मिळाली म्हणून की
मला मीच उमगले म्हणून!
प्रेमात मी हरूनही जिंकले
अन तू कायमचा मुकलास
माझ्या निरपेक्ष प्रेमाला!

प्रिया सातपुते

Tuesday, 26 July 2016

प्रियांश...७८

कधी कधी वाटत नेहमी मीच का समजून घेऊ, कधी कधी वाटत मीच का बोलु, कधी कधी वाटत मीच का !!!!!
हा विचार आपल्या सर्वांमध्ये येतंच राहतो. मग, हळूच एक विचार येतो आणि माझ्यात डोकावतो, माझ्यावर हसतो, चिडवतो, रडवतो सुद्धा!
पण, जे तो सांगतो ते एकूण सारा राग भुर्रकन उडून जातो...यालाच तर प्रेम म्हणतात...जे नाही केल तर सगळेच दूर निघून जातील... आयुष्य असंच असतं कधी रुसायचं, कधी रागवायचं, तर कधी सारं विसरून कान पकडून ढसाढसा रडायचं अन प्रेमाने मिठीत विसवायचं!

प्रिया सातपुते

Sunday, 24 July 2016

शायरी

मेरे रुठ जाने पे
इतना भी मुस्कुराया न करो
किसी दिन सच में रुठ गई तो
इन ही यादों में तडपते रह जाओगे...

प्रिया सातपुते

Saturday, 23 July 2016

प्रियांश...७७

आजकाल बरीच नाती मैत्रीतून प्रेमात पोहचल्यावर गटांगळ्या खातात अन मग हाताशी ना मैत्री राहते ना प्रेम! मैत्री नंतर प्रेमाच्या प्रवासात एकदा का प्रेमाचा पल्ला गाठला की पाखरं मैत्री विसरून जातात अन तिथेच घोटाळा करतात! आपण आधी बेस्ट फ्रेंडझ आहोत हे न विसरता पुढे जाल तर आयुष्याचा प्रवास एकत्र सुखकर होईल! हाच कानमंत्र जपा!

प्रिया सातपुते

Monday, 18 July 2016

चारोळी

मी अशीच आहे
शब्दांमधून बडबडणारी
अन समोर उभी असताना
शब्दांमध्ये रमणारी...

प्रिया सातपुते

Saturday, 16 July 2016

शायरी

मुझे धुंडता है सनम तू यहा वहा
दो पल मुंदके दिलमें झाकता खुद के
तो मैं 'तेरी मंजिल बन जाती
उसी पल में....!

प्रिया सातपुते

Tuesday, 12 July 2016

प्रियांश...७६

आनंद म्हणजे???

ओ हॅलो, कुठल्याही मुलाचं नावं नाही! ना राजेश खन्नावाला सिनेमा! आनंद म्हणजे, ते सोडलेले पिटुकल पिल्लू जे माणसाला खूष ठेवत, आयुष्यात जगण्याची खुमारी देत! प्रत्येकाने सकाळी उठल्या उठल्या आरशात पाहून एक सुंदर मनाला खूष करणारी स्माईल दिली पाहिजे! रोज आनंदी राहण्याची सवय लाऊन घेतली पाहिजे, मग रोज येणाऱ्या इंटुकल्या पिंटुकल्या अडचणींवर तुम्ही सहज विजय मिळवाल!
Have a great day guys...

प्रिया सातपुते

Monday, 11 July 2016

पाऊस आणि तू...

मला पाऊस खूप आवडतो
पण त्याला आवडत नाही,
पावसाच्या सरीसोबत
चालू असते त्याची कसरत,
कधी चिखल चुकवायची!
तर कधी मला अडवण्याची!
तरीही मी धावते,
भर पावसात
चिंब होण्यासाठी,
मनाला अन देहाला
रीत करण्यासाठी,
मग, ना तू खूप ओरडतोस!
विनवण्या करतोस!
आजारी पडशील!
ऐक ना जरा माझ! बोलत,
माझ्या पाठमोऱ्या देहाला
भान हरपून पहातच राहतोस
अन पाऊस तुला चिंब करून
माझ्या जवळ सोडून जातो...

प्रिया सातपुते

Sunday, 10 July 2016

चारोळी

तुझं माझं नातं
अगदी या
ऊन पावसासारखंच,
क्वचितच आमने सामने येणार!

प्रिया सातपुते

चारोळी

तुला भेटायला येतानाच
पाऊस मला चिंब भिजवतो
का कोणास ठाऊक
त्याला ही तुझं रागावणं आवडतं..

प्रिया सातपुते

चारोळी

मी जे बोलते
ते तू कधी ऐकतच नाही!
पण, न बोलता
सारच कसं ओळखतोस?

प्रिया सातपुते

चारोळी

आज अचानक तुझी
आठवण झाली
अन पावसाची सर
मला चिंब भिजवून गेली...

प्रिया सातपुते

चारोळी

आवडत मला
तुझं माझ्यासाठी झुरण
माझा आवाज ऐकताच
तुझ्या गालावरची कळी खुलण...

प्रिया सातपुते

Friday, 8 July 2016

प्रियांश...७५

प्रियांश...७५

काम चांगलं असलं की साहजिकच वेगवेगळ्या कंपन्या मागे लागतात हे आतापर्यंत मला उमगलं आहे. एकदा आम्हांला भेटून जा, प्लिज! अशी आर्जव ऐकली की मग उत्तर काय द्यायचं तेच समजतं नाही! म्हणून मी त्या कंपनीची इत्यंभूत माहिती मिळवून जाते. आज सुद्धा माहिती काढूनच गेले होते. आज एक अनुभव गाठीशी आला, त्यांचा कंपनी फॉर्म भरा म्हणून ते मागे लागले अन आजचा प्रियांश घडला!
फॉर्म मध्ये जनरली नाव, पत्ता, जन्म तारीख,  शिक्षण,...अशी वेगवेगळी माहिती भरावी लागते, अर्थात इथे धर्म, राष्ट्रीयत्व विचारलं जातं इथपत पटतं पण, पुढे जे वाचलं ते पाहून तर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली! "जात"! त्याच्यापुढे कोणता पोटवर्ग!
कितीही शिका, नाव कमवा, चांगलं काम करा पण, ही जात जखमेची खपली काढल्याशिवाय रहात नाही! हा प्रपंच का? तर कंपनी ब्राह्मण व्यक्तीची आहे! 😁 मला तर हसू की रडू हेचं कळत नव्हतं!

प्रिया सातपुते

चारोळी

माझं फुरफुरणार
लालेलाल नाक
अन घोगरा आवाज
कसा रे आवडतो तुला?

प्रिया सातपुते