Saturday, 30 July 2016

प्रियांश...७९

सैराट ही एक अप्रतिम कलाकृती आहे, फक्त तो सिनेमा एका उच्चवर्णीय डायरेक्टरने काढला नाही हाच त्याचा गुन्हा! मराठी सिनेमाच्या खूप साऱ्या प्रतिभावंत कलाकारांनी कौतुकाचे दोन शब्द सुद्धा ऐकल्याचे वाचले नाही! का तर डायरेक्टर खालच्या जातीचा आहे! हल्ली काय वाटेल ते सैराट बद्दल बोललं जातं आहे! बलात्कार सैराट मुळे वाढले, पिढी खराब होतेय...

अरेच्या हे आधीपासून होत आहे या समाजात! फरक इतकाच की आता लोक पुढे येऊन बोलू लागेलत, मिडिया सक्रीय झाला आहे. पण, लोकांची व्यसने वाढली आहेत...दारूच्या नशेत माणूस लहान बाळामध्ये, लहान मुलीमध्ये, तरुणी मध्ये, वृद्धेमध्ये सुद्धा फरक पाहू शकत नाही, त्या नीच राक्षसाला शमवायची असते त्याची वासना! या दारू बद्दल बहिष्कार टाकाता का? दारू समाजाची कीड आहे, या बद्दल बोलायचं सोडून समाजात होणाऱ्या विघातक परंपरा आपल्या समोर मांडल्या, ऑनर किलिंग किती भयानक आहे, हे सत्य दाखवलं म्हणून सैराट वाईट का? फालतू सैराट विरोधातील मेसेजस, वॉटसअप वर फिरवताना लोक हे विसरतात की त्यांनी सुद्धा प्रेम केलं आहे, जर नाही तर त्यांच्या मुलांनी केलंच आहे! या वयात जर मुले प्रेमात पडणार नाहीत मग काय म्हातारे झाल्यावर पडतील? अन या निरागस भावनांना वेगळंच रूप दिल की मग निष्पाप मुलं जीव गमावून बसतात! किती वर्षे हा समाज जातीच्या विळख्यात अशी रक्त पिणार?

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment