Wednesday, 27 July 2016

कविता

का कोणास ठाऊक
मी रात्रीचा दिवस
अन दिवसाची रात्र करतेय
फक्त तू स्वप्नांत येशील म्हणून
पण, तू काही येत नाहीस
दिसते ती फक्त तुझी पाठमोरी सावली
तुझ्या सावलीला पकडावं म्हंटल तर
ती काही हाती लागत नाही,
लागते ती फक्त निराशा
तुझ्यावर केलेल्या प्रेमाची!
पण, का कोणास ठाऊक
मी आज खूप खुश आहे
मला माझीच हरवलेली सावली
परत मिळाली म्हणून की
मला मीच उमगले म्हणून!
प्रेमात मी हरूनही जिंकले
अन तू कायमचा मुकलास
माझ्या निरपेक्ष प्रेमाला!

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment