Saturday, 22 October 2011

नेट-प्रेम भाग-२रोजचा प्रमाणे आई सोबत भांडण केल्याशिवाय श्रेया मॅडम च्या दिवसाची सुरूवात होत नव्हती.....
पण आज कारण अगदी विचित्र होत, तिला कॉलेज ग्रूप सोबत मूवी ला जायच होत आणि अस यूजवल आईने नकार दिला, तरिपान ती आईला कन्विन्स करत होती आणि तितक्यात दादाचा फोन आला....मग अचानक श्रेयाचे हावभाव बदलले, चहाचा कप तिने भिरकावला आणि पाय आपटात ती कॉलेज ला निघून गेली....
पार्किंग मध्ये बाइक काढताना तिचे डोळे पानवले होते, समोरून लोक येताना पाहून तिने चटकन ग्लेरस  चढवले...पण मनात खूप सारे विचार घेऊन ती निघाली खरी पण बाइक कॉलेज च्या रस्त्याने जातच नव्हती. तिने स्ट्रेट हाइवे वर  बाइक घेतली, सिटी पासून खूप दूर निघून आली होती ती...तिला खूप रडायच होत, कोणाच्या तरी खांद्यावर डोक ठेऊन मन मोकळ करायच होत...पण तिच कोणी समजेल अस कोणीच तिला आठवल नाही...स्कार्फ काढून ती वेगाने बाइक चलवू लागली होती, साइड ने ट्रक ने ओवर्टेक केळेवर तिला जाणवलं  की ती खूप दूर निघून आली आहे...३० मिनिटानी एक डिवाइडर तिला दिसला तिथून तिने यू -टर्न मारला...विचारांच थैमान होत डोक्यात...तिने ठरवल आज घरी जायच नाही....कॉलेज ला लेट पोहचली...काही झालच नाही हा आव आणण्यात ती एक्स्पर्ट.

पूजा विचारात होती श्रेया ला "तुझे डोळे इतके लाल लाल का दिसत आहेत?'
श्रेया-"काही नाही ग...झोप झाली नाही, थोड बर वाटत नाहीय मला म्हणून उशीर झाला, तुम्हाला वाटेल मी खोट  बोलतेय म्हणून मी मुद्दाम आले आज."
मीनल-ह्म थोडा लवकर लॉग आउट करत जा मणजे झोप येईल...
श्रेया-गप्प यार..आधीच माझ...अरे सोड ना, तुम्ही सगळे जाऊन या मूवी ला माझ्यामुळे प्लान कॅन्सल नका करू
अवणी-पक्का ना? नंतर रडत नको बसू नेल नाही म्हणून!
श्रेया-नाही रडणार...
मॅडम लेक्चर करता आल्या आणि त्यांच कॉन्वर्सेशन मध्येच थांबाल...
लेक्चर संपल. ब्रेक टाइम होता पुन्हा श्रेया च्या ग्रूप ने विचारलं  येतएस का? ती नाही म्हणाली. बाकीचे लेक्चर्स अटेंड करायचा तिचा मूड नवतच सो तिने ब्रेक नंतरच डाइरेक्ट मोर्चा केफे कडे वळवला...
दुपारचे 2.30 झाले होते, याहू ओपन करून ती मेल्स चेक करत होती पण तिचा मूड नव्हता,  काही वाचण्याचा, मेसेंजर ला लोग इन केल...तिचे खूप सारे फ्रेंड्स अवेलबल दिसत होते पण तिने लागलीच स्टेटस अवे करून टाकला.
आणि ती फालतू टीपी करायला लागली...तितक्यात श्री चा मेसेज आला...

श्री- काय मॅडम आज दुपारी?? कॉलेज ला दांडी! ;-)

श्रेया विंडो क्लोज़ करणार इतक्यात पुन्हा एक मेसेज आला,

श्री- मूड ऑफ आहे वाटत मॅडम चा? :( 
श्रेया- तुला काय करायचं आहे? तू तुझ काम कर
श्री- तेच तर करतोय मी
श्रेया-डोक खराब नको करुस माझ तू
श्री- अरे तुला डोक आहे म्हणजे ? lol 
श्रेया- शट अप...तुम्हा सगळ्याना डोक आहे मीच एकटी बिनडोक आहे, ना मला डोक आहे ना अक्कल
श्रेया जाम भडकली होती आणि तिचा बांध आता तुटला होता...
श्रेया- मीच मूर्ख आहे ना बाकी तुम्हा सार्‍याणा खूप जास्ती अक्कल आहे, हर्ट करनच  येत का तुम्हा लोकांना 
श्री- अग  काय झाल तुला ? कोणी काही बोलला का तुला....माझ इंटेशन तुला हर्ट करण्याच नव्हत श्रेया! एम सॉरी
श्रेया- एम सॉरी मी तुझवर सारा राग काढला
श्री- ह्म्म्म 
श्रेया- व्हाट ह्म्म्म !!
श्री- तू सांगशील का मला काय झाल ते इतक अस काय झाल क तू इतकी जाम भडकलीस माझावर? :(

श्रेया ने श्री ला सकाळी घडलेला प्रकार सांगितला...

श्री- अग वेडाबाई! आई वर इतक कोणी चिडत का?
श्रेया- असंच असत नेहमी दादा ला सगळीकडे परमिशन मिळते मी काय घोड मारलय कोण जाणे?
श्री- अग तू शांत हो आधी, रिलॅक्स
श्रेया- तुला माहितेय श्री मी रागत भलतीकडेच हाइवे पर्यन्त बाइक नेली, इतका राग आला होता मला
श्री- तू वेडी आहे का...किती रिस्की असत माहितेय का तुला, एकटी मुलगी हाइवे वर, कोणाचा भरवसा नाही, रागत बाइक चालवत नको जाऊस तू प्लीज ....
श्रेया- हो रे, माहितेय मला..
श्री- ह्म्म्म गुड, कुठे आहेस तू?
श्रेया- केफे
श्री- वाय 
श्रेया- जस्ट
श्री- टाइम पहिलास का?
श्रेया- हो
श्री- घरी कधी जाणार आहेस?
श्रेया- मूड नाहीय घरी जायचा
श्री- केफे मध्येच झोपणार का मग आज?
श्रेया- जाईन रे खिटपीट नको करू
श्री- ऑलरेडी लेट झाला आहे ७ वाजत आहेत, ७ च्या आत घरात बेटा
श्रेया- पकवू नको, जाईन लेट, कळू दे तिला पण जरा!
श्री- वेडी आहे का आई ला काळजी आहे तुझी
श्रेया- प्लीज तो टॉपिक बंद कर रे
श्री- माझी आई पण अशीच होती, मी पण  असाच चिडायचो, आणि आता आई नाहीय तेव्हा समजत मला
श्रेया- ओह! एम सॉरी श्री, आई डिडण्ट नो!
श्री- इट्स ओके ...जा पळ घरी आता तू,
श्रेया- ह्म्म्म 
श्री- एम गोईंग होम, cul
श्रेया- ओके, आर यु कमिंग इन द नाइट?
श्री- यूप , gtg now, tc, गो होम 
श्रेया-हो जाते…

श्रेया चॅट विंडो कडे पाहत राहिली, तिला खटकल  की श्री ला आई नाही...घड्याळात पाहील तर ७ वाजून गेले होते. साइन आउट करून ती निघाली खरी पण ती श्री चा विचार करत होती, त्याच्याशी बोलून सारा राग गायब झाला होता, तिला खूप बर वाटत होत. घरी जाऊन डोरबेल वाजवायला हात पोहचतोच आई ने डोर उघडल, आई काही बोलणार इतक्यात तिने आई ला घट्ट मिठ्ठी मारली, आणि सॉरी म्हणून रडली...आईने पण तिला कुशीत घेतल...जेवण उरकून ती पटकन रूम मध्ये पळाली.
तिला श्री सोबत बोलायच होत, तिने लोग इन केल पण तो आला नवता, ती हिरमुसली ...१०  वाजले होते...बाकीचे कॉलेज फ्रेंड्स मूवी बद्दल सांगत होते पण तीच कशातच लक्ष नव्हत ...तेवढ्यात श्री ऑनलाईन आला...तिने लगेच त्याला हाई मेसेज पाठवला, श्री चे पण मेसेज सुरू झाले.....
मन मोकळ करायला श्रेया ला एक चांगला मित्र भेटून गेला होता..........

प्रिया सातपुते परीराज्यपरीराज्यात पुन्हा एकदा                           

जावसं वाटतय...                                       


आईच्या कुशीत 


रोज एक नवी परीराणी बनून,


स्वप्नांचे पंख लाऊन 


चंदेरी सोनेरी दुनियेत 


भटकावस वाटतय...


बाबांच्या स्पर्शान


डोळे अलगद उघडून 


पुन्हा त्या स्वप्नानमध्ये रमावास वाटतय


बाबांची परी बनून


निर्धास्त जगावस वाटतय...


लहानग्या डोळ्यातलं परीराज्य कधीच गायब झाल,


पुन्हा कधी दिसेल ते माझ परीराज्य....


प्रिया 

Vedya mana

Vedya mana kuthe dhavnar tu?

Kiti lapshil, kiti lajshil


Dolyanvar patti bandhun


Aandhali koshimbir khelshil


Vedya mana...


Vedi aas tuzi, vedi odh


Kuthvar neil tula


Vedya mana...


Nadikinari dagdan chya aadoshala


Mashyanchya punjkyat gungun jashil


Vedya mana...


Ektya valanavar chaltana,


Ekhadya kalpvruksha javal visavshilch na?
Priya....