Friday, 30 December 2011

नेट-प्रेम भाग-८


गोवा ट्रीप संपवून वर्‍हाड घरी परतल, सगळेच थकून गेले होते, पण श्रेया मॅडम तर जाम खुश दिसत होत्या...डाइरेक्ट बेडरूम मध्ये जाऊन तिने आधी पीसी ऑन करायला जाणार इतक्यात आई चा आवाज आला, "आधी फ्रेश हो मग त्या बॉक्स च्या मागे लाग, आल्या आल्या काही मदत करायच सोडून...." आईच पुटपुटन चालूच होत...तशी श्रेया पाय आपटात हॉल मध्ये आली, स्वत:च्या बेग्स उचलून रूम मध्ये गेली, पुन्हा आली आणि आई समोर येऊन उभी राहिली...तस दादाने तिला जायला खुनवल....श्रेया च्या आईच हे नेहमीचच आहे..प्रवासातून आल्या आल्या राग कोणावर तरी निघतोच.

श्रेया ने रूम चा दरवाजा बंद केला आणि म्हणाली, "मी आंघोळी ला जातेय मला डिस्टर्ब करू नका", हे म्हणत मॅडम चा पीसी ऑन झाला, नेट ऑन झाल...याहू साइन इन ला वेळ लागत होता तशे तिचे पाय जास्तीच हलू लागले होते, जितकी ती एक्झामच्या रिज़ल्ट वेळी एक्सांइटेड नसते त्यापेक्षा जास्ती एक्सांइटेड आज दिसत होती आणि फाइनली लॉग इन झाल, ऑफलाईन मेसेज विंडो ओपन झाली, ऑनलाइन फ्रेंड्स विज़िबल झाले, पण, तिथे श्री दिसत नव्हता, मग तिने ऑफलाईन मेसेज पाहायला सुरूवात केली. स्क्रोल करत ती पाहत होती सगळे श्री चे ऑफलाईन मेसेज होते आणि दुसायांचे पण...तिला समजत नव्हत की काय वाचू आणि काय नको...ऑफलाईन मेसेज वाचत तिला एकदम हसू फुटल आणि हसता हसता रडू..एक शब्दच बोलून गेली, "अतरंगी".
त्याला ऑफलाइन मेसेज टाकणार इतक्यात श्री ऑनलाइन आला...श्रेया चा चेहरा फुलून गेला..पटकन तिने त्याला पिंग केल...
श्री चा काही रिप्लाइ आला नाही...तस ती त्याला मेसेज करत गेली..पण काहीच रिप्लाइ नाही...श्रेया चा चेहरा रडवेला झाला होता, तितक्यात आई दरवाजा वाजवायला लागली, तस तिने पटकन जाऊन बाथरूम मध्ये  नळ  सुरु केला आणि पुन्हा श्री ला मेसेज करू लागली, पण काहीच रिप्लाइ येत नव्हता, तस तीच श्रीच्या स्टेटस कडे लक्ष गेल, आइडल...हुषष… पटकन आणखी एक मेसेज टाकून ती आंघोळीला पळाली.

श्री आणि अमोल बॉस च्या कॅबिन मधून बाहेर आले, अमोल काही बोलणार इतक्यात श्री डेस्क कडे परतला, अमोल त्याला पाहत होताच तोच श्री लॅपटॉप मध्ये घुसला. श्रेया ची मेसेज विंडो पाहून त्याचे फेशियल एक्सप्रेशन चेंज झाले जशे एखाद्या लहान मुलाला रडताना चॉकलेट दिल्यावर होत अगदी तस...अमोल चाट पडला, मनाशी काही ठरवत तो कामात गुंतून गेला.

इकडे श्री ने श्रेया चे सारे मेसेज वाचले..लास्ट मेसेज होता आय बी आर बी (आय बी राइट बॅक)...श्री आतुर झाला होता कधी तिचा मेसेज येतो...साइड बाइ काम पण सुरू होत. १५ मिनिटांनी श्रेयाचा मेसेज आला आय एम बॅक
श्री- व्व्हेयर वेयर यु?? हाऊ आर यु ??
श्रेया- गोवा आय टोल्ड यु सो..
श्री- ह्म्म्म  आय नो देट वेरी वेल..बट अटलिस्ट यु शुल्ड ह्याव टोल्ड मी!
श्रेया- अरे एम सॉरी..त्या दिवशी मी ऑन लाईन येऊ नाही शकले
श्री- हाऊ आर यु? हाऊ वाझ द वेडिंग? हाऊ वाझ द गोवा ?
श्रेया- अरे स्लो डाउन..एक एक विचारशील कि सगळे प्रश्न एकदम!!
श्री- हो ग बाईई… 
श्रेया- ईई... 
श्री- कळल बाई नाही बोलत
श्रेया- डॅट्स मच बेटर, वेडिंग वाझ गुड, गोवा टू, बट 
श्री- बट ?
श्रेया- काही नाही
श्री- बट व्हाट ??
श्रेया- आय डिडण्ट  एन्जॉय
श्री- वाय???
श्रेया- माय माइंड वाझ समवेयर एल्स..
श्री- वाय?
श्रेया- काही नाही रे...लीव इट...बाय द वे..मी गोआ शॉपिंग साठी एन्जॉय केल
श्री- ओह्ह्ह गर्ल्स !!
श्रेया- शट अप जलकुकडु
श्री- ओह्ह्ह हो 
श्रेया- बाय द वे मी तुझ नवीन नाव ठेवल आहे अतरंगी कस आहे??
श्री- व्हाट हे काय..काही पण हा
श्रेया- इट सूट्स यू  :D 
श्री- ह्म्म्म… 
श्रेया- श्री मी ट्राइ केल होत रे ऑन लाईन यायला, कि मी लेट येणार आहे..बट नाही जमल
श्री- इट्स ओक..इट हॅपन्स..नंबर द्यायला हवा होता मी तुला माझा, म्हणजे तू अटलिस्ट मला मेसेज केला असता
श्रेया- हो केला असता मी
श्री- टेक डाउन माय  नंबर 92********
श्रेया- हहम्म्… ओके 
श्री- हेल्लो व्हाट ह्म्म्म 
श्रेया- आय विल कॉल यू 
श्री- ह्म्म्म… 
श्रेया- अरे सच्ची, आई डोर वाजवत आहे, आय ह्यव टू गो नाउ, रात्री येतोस का ऑन लाईन?
श्री- हो
श्रेया- सी या
श्री- टेक केयर, सी यू सून

श्रेया लॉग आउट झाली, श्री कामात बिझी झाला...ग्लुकोन-डी  घेतल्यावर जशी इन्स्टेंट एनर्जी मिळते तस काही श्री ला पाहून वाटत होत.....

प्रिया सातपुते 


Wednesday, 21 December 2011

नेट-प्रेम भाग-७


मिटिंग संपवून श्री त्याच्या डेस्क कडे जात होता तोच, अमोल ने त्याला थांबवल आणि विचारपूस केली,
"आर यू ओके श्री?"
श्री- ह्म्म्म, आय एम ओके!!
अमोल- वाटत नाहीय पण तस, काही प्रॉब्लेम आहे का?
श्री- काहीच नाही रे..
अमोल- तू ब्रेक घे, स्वत: कडे पहिला का?
श्री-(वैतागून) काही नाही झालंय.
अमोल त्याच्या खांद्यावर हात ठेऊन ओके ओके करत निघून गेला. तसा श्री ताडकन उठून कॅंटीन कडे गेला.

नेहमी शांत, हसमुख राहणारा श्री, अजबच वागत होता, त्याला पाहून अमोल खूप अपसेट होता. श्री आणि अमोल जिवलग मित्र...
कॅंटीन मध्ये कॉफी घेऊन तो बसणार तोच अमोल पण आला, तसा श्री बावरला, अमोल ला हा लुक नवीन नव्हता.

अमोल- कोण आहे ती?
श्री- कोण ती?
अमोल- श्रेया जिचं प्रेज़ेंटेशन पाहून आलो!
श्री- माहीत आहे ना मग मला का विचारात आहेस?
अमोल- (जोरात टेबल व हात पटकून) प्रेमात पडला आहेस का?
श्री शांत राहतो, तशी अमोल ला खूप एक्सायेटमेन्ट होते, तो कान उभे करून एकू लागतो. खूप दिवसांपासून तो
बदललेल्या श्री ला पाहत असतो.
श्री- काही नाही कोणी नाही
अमोल- मग उग्गीच च मीटिंग मध्ये श्रेया च प्रेज़ेंटेशन झाल?
श्री- काय प्रेज़ेंटेशन काही पण बडबडू नकोस जस्ट चुकुन मी वेगळी फाइल घेऊन आलोय
अमोल- अरे श्री मी काय आता भेटलो नाही तुला, तुला सांगायच नाही तर मी फोर्स करणार नाही.
अमोल मान झुकवतो. तसा श्री ला असह्या होत आणि तो बोलतो, "आय लव हर!!"
अमोल मान वर करून पाहतो तो श्री च्या डोळ्यात साठलेल पाणी पाहून तो स्तबद्ध  राहतो. श्री अमोल पुढे सार काही सांगून टाकतो.
अमोल- तू पाहिलच नाही तिला राईट? मग हे होऊच कस शकत?
श्री- मी श्रेयाच्या चेहरयाशी प्रेम नाही करत तिच्या अल्लड मनाशी करतो..मी खूप सप्राइज़ आहे की मी असा झालो आहे..
अमोल- श्री हे सगळ व्हर्चुयल आहे, ती मेघा समोरून तुला लाईन देतेय अन ते सोडून तू अशा विचित्र गोष्टीत गुंतत आहेस! से येस टू मेघा!
तसा श्रीचा चेहरा लालबुंद झला.
तितक्यात नारायण दोघांना  बोलवायला आला...बॉस कॉलिंग भाऊ...


प्रिया सातपुते
Wednesday, 7 December 2011

फसलेले मन...


फसलेल्या मनाला सगळेच 
फसवे दिसतात,
पोळलेले मन, आसवांनी भरलेले डोळे 
आणि सलणाऱ्या आठवणी,
आठवणी ज्या कधी उन्मळून येतात,
मनाला भूलावतात,
कोष्ट्याच्या जाळ्यात गुंफतात,
अश्या गुंफतात कि श्वासही गुरफटून जातो,
हळू हळू श्वास बंद होईल,
हालचाली मंदावतील 
आणि मग भूकावलेले कुत्रे,
मनाचे लचके तोडतील,
रक्त्बाम्बळ मन 
ना त्याला आधाराची कुबडी मिळेल,
ना शांतता,
फरफटून शेवटी, अखेरच्या श्वासात पण त्या फसव्या मनाला 
ओढ असते ती जगण्याची,
स्वतंत्र जगण्याची, भरारी घेण्याची,
फसव्या मनाला सगळेच लाथाडतात, 
स्वतः त्याच अस्तित्वच..
मग एका पडक्या विहिरीत 
तरंगताना दिसत हे फसलेले मन... 

प्रिया सातपुते

Monday, 5 December 2011

Sunday, 4 December 2011

नेट-प्रेम भाग-६
श्रेया च्या घरी सकाळपासूनच जोरदार तयारी सुरू होती, पॅकिंग, लॉक करण, तिला कळत नव्हत इतकी गडबड का करत आहेत? पण ती चुपचाप मज्जा पाहत होती...कॉलेजला 3-4 दिवसांची दांडीच होती. संध्याकाळ पर्यन्त तिने सारी कामे उरकली आणि अर्थात घरच्यानी पण,...तिच सार लक्ष घड्याळा  कडे होत, कधी १० वाजतात आणि कधी ती ऑनलाइन जाणार. पण, ऐनवेळी खूप सार्‍या पाहुन्यांनी घर भरून गेल...तिला कधी ऑनलाइन जाऊन श्री सोबत बोलेन अस झाल होत पण वेळच नाही मिळाला. ती खूप थकून गेली होती आणि ती ऑनलाइन जाऊ  पण शकत नव्हती.

सकाळी लवकर उठून सर्वाना जायच होत, श्रेया चा चेहरा मलूल पडला होता, तिला राहून राहून वाटत होत की श्री ने खूप वाट पहिली असणार. पण आता पर्याय नव्हता, ३ दिवसांचीच तर गोष्ट होती. संध्याकाळ पर्यन्त सगळे जण  गोव्याला पोहचून गेले. हळदीची तयारी सुरू होती,....

श्रेया खूप इरिटेट झाली होती तिला समजत नव्हत काय कराव, शेवटी तिने वाहिनींच्या छोट्या बहिणीला गाठल आणि विचारलं  नेट आहे का जवळपास खूप महत्वाचा मेल करायचा आहे. पण ती जाऊच नाही शकली. श्रेया सगळ्या सोबत होती हसत होती, डान्स सुरू होते पण तिच्या मनात सारखा श्रीचाच विचार येत होता.

फाइनली लग्न उरकल आणि तिला खूप बर वाटत होत कि आता घरी जाऊ पण ऐनवेळी वाहिनींच्या घरच्यानकडून खूप फोर्स झाल्यामुळे त्यांचा मुक्काम वाढला. श्रेया जाम वैतागली होती..तिला समजत नव्हत तिला अस का होत आहे..शेवटी ती सगळ्यां सोबत गोवा भटकायला गेली, सुंदर बीचेस, आणि पुन्हा श्री चे शब्द तिला आठवले एन्जॉय!!....

समुद्रा च्या किनारयापाशी जाऊन ती सनसेट पाहत होती...लाटांना पाहत होती एक लाट तिच्या पायांशी येऊन विरून गेली...तसा तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला...तिच्या डोळ्यात पाणी दाटून आल होत...हलकेच डोळ्यातल पाणी तिच्या गालांवर ओघळल...फक्त एकच शब्द तिच्या तोंडातून निघाला "श्री"...

छोटी मयुरी च्या हाकेने तिची तंद्री तुटली, तिने डोळे पटकन पुसून घेतले..हसत हसत ती मयुरी कडे गेली तिला उचलून घेत तिने कार कडे मोर्चा वळवला. सगळ्यांसोबत असून पण नेहमी  एक शब्द ना बोलता थांबणारी श्रेया आज एकदम गप्पा झाली होती. आई ने विचारलं काय झाल बर वाटत नाहीय का तुला? तिने नुसत् ह्म्म्म केल आणि ती कार मध्ये जाऊन डोळे बंद करून बसली. तिच्या मनात श्री नावाच वादळ सुरू होत, तिला फक्त श्री आठवत होता.

आज गोव्याचा ५ वा दिवस होता, ती आईच्या मागे लागली होती घरू जाऊया म्हणून, पण पूजा आणि वहिनीच मन तिला मोडवत  नव्हत. गोव्याचे चर्चेस पाहुन तिला मज्जा येत नव्हती शेवटी तिने दादा ला म्हंटल कि बीच कडे जाऊयात, सनसेट पाहायचा आहे. तसे सगळेच सनसेट पाहायला गेले. श्रेया वॉक च्या बहान्याने दूर पर्यन्त चालत गेली, सगळेजण आस पासच बसून गेले होते...श्रेयाची पाय वाळूत पण भर भर जात होते, थोड लांब गेल्यानंतर तिने मागे वळून पाहील आणि खात्री केली सगळे दूर होते...ती मटकन खाली बसून गेली वाळूत हात घालून ती काही तरी लिहीत होती...मग तिच लक्ष गेल तिने श्री च नाव लिहल होत, तिने पुसन्या करता हात पुढे नेला...पण तिची हिंमत होत नव्हती...शेवटी तिचा बांध तुटला आणि ती रडू लागली...श्रेया ला समजत नव्हत कि तिला समजल होत ते तिलाच माहीत!!!
दादा च्या हाकेने ती बावरली तिने पटकन चेहरा साफ केला,..डोळे पुसले,...तिचे लाल डोळे पाहून वहिनी ने एक कटाक्ष टाकला..हसून श्रेयाने वाळू गेल्याचा बहाणा केला.

आज ६ वा दिवस होता, सगळेजण गोवा सोडण्याच्या तयारीत होते, तसा श्रेयाचा चेहरा फुलून गेला होता. विंडो मधून बाहेर पाहत ती पुन्हा श्री च्या विचारात रमून गेली...........

प्रिया सातपुते 
प्लॅटफॉर्म नंबर ५

अंधेरी स्टेशन - प्लॅटफॉर्म नंबर ५

रोज कानात आयपॉडचे हेडफोन ठोसून,
फूल वॉल्यूम मध्ये गाणी ऐकन हाच पर्याय असतो;
गर्दीतून स्वत:ला एकट करण्याचा…
तरीपण गेले दोन दिवस चुकल्या सारख वाटत आहे,
रोज प्लॅटफॉर्मवर येऊन मी आयपॉड म्यूट करायचे;
एक आजोबा खूप छान बासरी वाजवतात,
गेले दोन दिवस मी त्याना पाहील नाही;
मनात पाल चुकचुकतेय;
आंधळ्या आजोबांना काही झाल तर नसेल ना?
बासुरी च्या त्या लयात मी स्वत:ला खूप लकी समजायचे…
त्यांची बासुरी आणि ते हृदयाच्या जवळ कधी पोहचले कळलच नाही;
काहीच नात नाही त्यांच आणि माझ,
ना ते मला पाहु शकतात;
ना माझी हिंमत होते त्यांच्या जवळ जाण्याची;
का अशे दुरावे आहेत माणसांमध्ये??
कधी कधी समजतच नाही!
त्याना मी पुन्हा पाहु इच्छीते,
त्यांच्याशी बोलण्या करता मी घरून लवकर निघाले
पण ते दिसत नाहीयेत;
भेटतील ना बासुरीवाले आजोबा...???

प्रिया सातपुते