Wednesday, 7 December 2011

फसलेले मन...


फसलेल्या मनाला सगळेच 
फसवे दिसतात,
पोळलेले मन, आसवांनी भरलेले डोळे 
आणि सलणाऱ्या आठवणी,
आठवणी ज्या कधी उन्मळून येतात,
मनाला भूलावतात,
कोष्ट्याच्या जाळ्यात गुंफतात,
अश्या गुंफतात कि श्वासही गुरफटून जातो,
हळू हळू श्वास बंद होईल,
हालचाली मंदावतील 
आणि मग भूकावलेले कुत्रे,
मनाचे लचके तोडतील,
रक्त्बाम्बळ मन 
ना त्याला आधाराची कुबडी मिळेल,
ना शांतता,
फरफटून शेवटी, अखेरच्या श्वासात पण त्या फसव्या मनाला 
ओढ असते ती जगण्याची,
स्वतंत्र जगण्याची, भरारी घेण्याची,
फसव्या मनाला सगळेच लाथाडतात, 
स्वतः त्याच अस्तित्वच..
मग एका पडक्या विहिरीत 
तरंगताना दिसत हे फसलेले मन... 

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment