Sunday 4 December 2011

प्लॅटफॉर्म नंबर ५

अंधेरी स्टेशन - प्लॅटफॉर्म नंबर ५

रोज कानात आयपॉडचे हेडफोन ठोसून,
फूल वॉल्यूम मध्ये गाणी ऐकन हाच पर्याय असतो;
गर्दीतून स्वत:ला एकट करण्याचा…
तरीपण गेले दोन दिवस चुकल्या सारख वाटत आहे,
रोज प्लॅटफॉर्मवर येऊन मी आयपॉड म्यूट करायचे;
एक आजोबा खूप छान बासरी वाजवतात,
गेले दोन दिवस मी त्याना पाहील नाही;
मनात पाल चुकचुकतेय;
आंधळ्या आजोबांना काही झाल तर नसेल ना?
बासुरी च्या त्या लयात मी स्वत:ला खूप लकी समजायचे…
त्यांची बासुरी आणि ते हृदयाच्या जवळ कधी पोहचले कळलच नाही;
काहीच नात नाही त्यांच आणि माझ,
ना ते मला पाहु शकतात;
ना माझी हिंमत होते त्यांच्या जवळ जाण्याची;
का अशे दुरावे आहेत माणसांमध्ये??
कधी कधी समजतच नाही!
त्याना मी पुन्हा पाहु इच्छीते,
त्यांच्याशी बोलण्या करता मी घरून लवकर निघाले
पण ते दिसत नाहीयेत;
भेटतील ना बासुरीवाले आजोबा...???

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment