झोपलेल्या बाबा कडे पाहून वाटत,
दिवस कशे भुर्रकन उडून गेले,
त्याच्या परीला पंखतर होते पण उडता येत नव्हत,
बाबा तिला कधी दूर जाऊ देत नव्हता,
कॉलेज मधून उशीर झाल्याची त्याची तगमग,
मला कधी कळलीच नाही,
मुलगी थोड्या दिवसात सासरी जाईल,
या भीतीत तो जगतोय,
त्याच्या झोपलेल्या चेह्रायावारचे भाव
आज मला, कळतायत
पोटच्या गोळ्यासारख मला त्यान वाढवल,
लहानच मोठ केल,

ज्या बाबाने मला आयुष्य जगायला शिकवलं,
त्याला सोडून जाव लागेल हि कल्पनाच करवत नाही,
लहान असताना आईचा मार पडताना
बाबाची कुशीत शिरायचे,
लग्नानंतर पण घेईल ना बाबा मला कुशीत ?
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment