Wednesday, 29 May 2013

पाऊस आणि मी


गार गार वारा,
पावसाच्या धारा, 
झेलू कश्या, 

या क्षणांना …. सांग ना ग त्रिशा… मी माझ्या ६ वर्षाच्या भाचीकरता जोर जोरात गात होते. दिवस होता, मंगळवार अर्थात अंगारकी संकष्टीचा आणि पावसाने चक्क अकस्मातपणे हजेरी लावली. मग काय, पहिल्या पावसाला कोणी नाही म्हणेल का? आधीच मी पाऊस वेडी, मग तो कसाही पडो, मला तो हवाच असतो, लहानपणापासून पावसाची आणि माझी गट्टी कायमची आहे. 

पहिल्या पावसाचा, 
पहिला स्पर्श, 
मोहरून टाकतो, 
माझा या मनाला… 

घमघमणारा ओल्या मातीचा सुगंध, जितका नाकात साठवता येईल तितका मी तो प्रयत्न केला पण, मन काही तृप्त झाल नाही. बागडणाऱ्या माझ्या परीला पाहून माझातल लहान मुल पण जाग झाल, मग काय मस्त धमाल केली, मनसोक्त भिजून, गाणी गाऊन, एकमेकांवर पाणी उडवून, गोल गोल फिरून, जोरजोरात ओरडून पावसाला दाखवून दिलं... 

पाहतोयास ना,
तुझ्यासाठी मी किती वेडी, 
ढगांना ओरडायला सांगतोयस, 
तरीपण तुझासोबत मी बागडतेय, 
विजांना चमकायला सांगतोयस, 
तरीपण तुझ्यासाठी मी गातेय, 
तू काहीही कर, 
मी काही तुला मला चिंब भिजवल्याशिवाय जाऊ दयायची नाही… 

पावसा, माझ्या मित्रा, सख्या, यारा, माहितेय न तुला माझासारखी वेडी तुला भेटायची नाही. 

प्रिया सातपुते 

Happy First Rain to all of you...Enjoy and love it!!


Tuesday, 28 May 2013

कथा-२


ढग दाटून आले होते, ती केव्हाची पाऊसाची वाट पाहत होती. पाऊस पडेल आणि तो तिला खेचून घेऊन जाईल, ही भीती तिला वाटू लागली. नेहमीच्याच कथांसारख, तिला पाऊस आवडतो पण, त्याला नाही. ओल्या मातीचा सुटणारा घमघमाट आणि चिंब करणाऱ्या पावसाच्या धारा, हे सगळ तिला आवडतं पण, त्याला नाही. त्याला फक्त दिसतो तो चिखल, डबकी, कपड्यांचे कुबट वास आणि बरच काही. म्हणूनच, तो येण्याआधी पाऊसाने यावं असं ती मनोमन विनवत होती. 

याचं तलावाकाठी गेले चार वर्षांपासून दोघे रोज न चुकता भेटायचे, जणू त्यांच्या प्रेमाची साक्षच होता हा तलाव. या तलावाच्या साक्षीने तिने कितीतरी कविता रचल्या आणि त्याला ऐकवल्या सुद्धा, हि गोष्ट वेगळी कि त्याला कविता आवडायच्या नाहीत, पण त्याला ती आवडायची. तिच्या मनात पाऊसाची हुरहूर तर बहाणा होता, गेल्या कित्येक महिन्यांपासून ती वाट पाहत होती कि कधी तो तिला लग्नासाठी विचारेल? कि नाही? मनाच्या द्वंदात तिला कळलच नाही कधी पाऊसाचा पहिला थेंब तिच्या गालांवर येउन पडला. मनातच हसून ती तो पुसणार तोच पाठीमागून त्याने तिला मिठीत घेत म्हणाला," राहू दे!! तसं पण, पाऊस तुला माझ्यापेक्षा जास्ती आवडतो ना !!" 

दोघांच्या हसण्यात तिच्या मनातली हुरहूर फुर्रर होऊन गेली… पाउसाच्या धारांमध्ये आज पहिल्यांदाच तो सुद्धा तिच्या सोबत उभा होता . तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून, त्याने तिला तलावाकडे पाहण्यास सांगितलं, तसा तो बोलू लागला," हे सुंदर निरंग पाणी दिसतंय तुला, बघ पावसाच्या धारा कश्या विलीन होत आहेत आणि ते वृक्ष इतक्या दूर असून पण त्याचं प्रतिबिंब या निरंग पाण्यात विलीन झालंय," तो पुढंच काही बोलणार तोच तिने त्याला लाडाने फटका देत म्हंटल, "काय रे थट्टा करतोयस माझी… " तिचा रडवेला चेहरा त्याला पाहवला नाही," अग! हे तूच म्हणाली होती दोन वर्षापूर्वी, अजूनपण लक्षात आहे माझ्या, आणि तुला वाटत मी ऐकतच नाही, मी सार ऐकतो, तुझा प्रत्येक शब्द आणि इथून पुढेही मला आयुष्यभर ऐकतच रहायचय, होशील ना माझी? " हळूच खिश्यातून अंगठी काढून त्याने डावा हात पुढे केला, तशी ती रडतच त्याच्या मिठीत विलीन झाली. 

आजूबाजूला बऱ्याच दुर्दैवी गोष्टींना पाहून, हल्ली सगळ्यांचा हा गैरसमज होऊन बसला आहे कि प्रेमात सगळेच दगा देतात किंवा प्रेमाला त्याची मजल मारताच येत नाही. प्रत्येक कथा जशी वेगळी असते, तशीच माणसे सुद्धा वेगळीच असतात. प्रेम हि वैश्विक भावना आहे आणि ती ज्यांना मिळाली किंवा ज्यांनी जपली त्यांच्यासारखे लकी कोणीच नाहीत. म्हणून, जे प्रेमात तोंडघशी पडले त्यांनी बावचळून जाऊन काही वेडेपणा करू नये, उलटा हे लक्षात ठेवाव कि, "यू डिझर्व बेस्ट अन्ड मूव ऑन". 


I wish you all pure and unconditional love & when you found it don't let it go. 
Cheers,

Priya SatputeTuesday, 14 May 2013

कथा - १


हल्ली नात्यांची परिभाषा इतकी बदलत चालली आहे कि, आताच्या या जगामध्ये सगळ अगदी INSTANT हवं असतं, INSTANT गर्लफ्रेंड, INSTANT बॉयफ्रेंड, INSTANT नाती, INSTANT ब्रेकअप, आणि असं बरचं काही जे इथे मांडताना माझे शब्द अपुरे पडतील. अश्या या INSTANT दुनियेत बदलणारी नात्यांची परिभाषा किती छान आहे किंवा किती भयानक आहे हे मला इथे मांडायचे नाही, नजरेखालून काही जणांना रोज मरताना तर काही जणांना कोल्ड हार्ट होताना पाहिलं आहे, तर काही जवळच्या मित्रांना स्वतःला संपवताना.
नात टिकत कि नाही? कि ते नात आहे कि नाही? हा विचार मनाला शिवत सुद्धा नाही. कधी वाटत कि माणूसच तर भावनाशुन्य नाही बनला ना? हे मनाला पडलेलं एक कोडच आहे.

अश्या या INSTANT दुनियेच्या काही छोट्या मोठ्या कथांना मी तुमच्यासमोर मांडत आहे.
* या कथांचा कोणत्याही जिवंत व्यक्तींशी काडीमात्र संबंध नाही आहे, या सर्व काल्पनिक आहेत. जर कोणासोबत साधर्म्य असेल तर तो फक्त योगायोग आहे. दुखवल्या बद्दल क्षमस्व!!*

आजची कथा आहे, मेघा आणि आकाश-
दोघेही भेटले या INSTANT इंटरनेटच्या दुनियेत अर्थात, फेसबूक!!
आजकाल तरुणांच्या दुनियेत कोणाच्या लिस्ट मध्ये किती फ्रेंड्स जास्ती असतील ते एक स्टेटस मानलं जात आहे, मग भलेही तुम्ही त्यांना ओळखा अथवा नाही. मेघा आणि आकाश मध्ये मिचुअल फ्रेंड्स जास्ती असल्यामुळे दोघांना भेटायला वेळ लागला नाही. दोघे एकाच शहराचे, पण आकाश जॉब साठी मुंबईला होता आणि मेघा कानपूर.

दोघांची व्हर्चुल रिलेशनशिप खूप छान सुरु होती, जोपर्यंत आकाशला रियलिस्तिक पार्टनर भेटली नव्हती. 
आकाशाला व्हर्चुल रिलेशनशिपचा कंटाळा येण स्वाभाविक होत आणि त्याला पुन्हा त्या व्हर्चुल जगात जायची इच्छा नव्हती. तो मेघाला टाळू लागला, थोड्याच दिवसात त्याने तिला ब्रेकअप करत असल्याचे सांगून टाकलं. पण, हा धक्का मेघासाठी नवीन होता. भावनांच्या चक्रात ती इतकी अडकून गेली कि तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, नशिब बलवत्तर कि तिच्या घरच्यांनी मानसोपचार तज्ञांची मदत घेतली आणि मेघाला यातून सुखरूप बाहेर आणले. 

दुर्दैवाने प्रत्येकालाच अशे समजूतदार पालक भेटतील असे नाही, पण तरी सुद्धा मदत मागण्यात तरुणाईने लाज माणू नये. भावनांच्या भोवरयात अडकून न पडता आपल पुढील आयुष्यं कस सुखमय होईल हे पाहावं
भावना आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत, पण त्यांना मैनेज करणं आपल्याच हातात असतं म्हणून भावनांना मनाच्या कप्प्यात ताळेबंद करू नका, त्यांना एखाद्या पिटुकल्या बाळासारख जपा.

प्रिया सातपुते