Tuesday 28 May 2013

कथा-२


ढग दाटून आले होते, ती केव्हाची पाऊसाची वाट पाहत होती. पाऊस पडेल आणि तो तिला खेचून घेऊन जाईल, ही भीती तिला वाटू लागली. नेहमीच्याच कथांसारख, तिला पाऊस आवडतो पण, त्याला नाही. ओल्या मातीचा सुटणारा घमघमाट आणि चिंब करणाऱ्या पावसाच्या धारा, हे सगळ तिला आवडतं पण, त्याला नाही. त्याला फक्त दिसतो तो चिखल, डबकी, कपड्यांचे कुबट वास आणि बरच काही. म्हणूनच, तो येण्याआधी पाऊसाने यावं असं ती मनोमन विनवत होती. 

याचं तलावाकाठी गेले चार वर्षांपासून दोघे रोज न चुकता भेटायचे, जणू त्यांच्या प्रेमाची साक्षच होता हा तलाव. या तलावाच्या साक्षीने तिने कितीतरी कविता रचल्या आणि त्याला ऐकवल्या सुद्धा, हि गोष्ट वेगळी कि त्याला कविता आवडायच्या नाहीत, पण त्याला ती आवडायची. तिच्या मनात पाऊसाची हुरहूर तर बहाणा होता, गेल्या कित्येक महिन्यांपासून ती वाट पाहत होती कि कधी तो तिला लग्नासाठी विचारेल? कि नाही? मनाच्या द्वंदात तिला कळलच नाही कधी पाऊसाचा पहिला थेंब तिच्या गालांवर येउन पडला. मनातच हसून ती तो पुसणार तोच पाठीमागून त्याने तिला मिठीत घेत म्हणाला," राहू दे!! तसं पण, पाऊस तुला माझ्यापेक्षा जास्ती आवडतो ना !!" 

दोघांच्या हसण्यात तिच्या मनातली हुरहूर फुर्रर होऊन गेली… पाउसाच्या धारांमध्ये आज पहिल्यांदाच तो सुद्धा तिच्या सोबत उभा होता . तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून, त्याने तिला तलावाकडे पाहण्यास सांगितलं, तसा तो बोलू लागला," हे सुंदर निरंग पाणी दिसतंय तुला, बघ पावसाच्या धारा कश्या विलीन होत आहेत आणि ते वृक्ष इतक्या दूर असून पण त्याचं प्रतिबिंब या निरंग पाण्यात विलीन झालंय," तो पुढंच काही बोलणार तोच तिने त्याला लाडाने फटका देत म्हंटल, "काय रे थट्टा करतोयस माझी… " तिचा रडवेला चेहरा त्याला पाहवला नाही," अग! हे तूच म्हणाली होती दोन वर्षापूर्वी, अजूनपण लक्षात आहे माझ्या, आणि तुला वाटत मी ऐकतच नाही, मी सार ऐकतो, तुझा प्रत्येक शब्द आणि इथून पुढेही मला आयुष्यभर ऐकतच रहायचय, होशील ना माझी? " हळूच खिश्यातून अंगठी काढून त्याने डावा हात पुढे केला, तशी ती रडतच त्याच्या मिठीत विलीन झाली. 

आजूबाजूला बऱ्याच दुर्दैवी गोष्टींना पाहून, हल्ली सगळ्यांचा हा गैरसमज होऊन बसला आहे कि प्रेमात सगळेच दगा देतात किंवा प्रेमाला त्याची मजल मारताच येत नाही. प्रत्येक कथा जशी वेगळी असते, तशीच माणसे सुद्धा वेगळीच असतात. प्रेम हि वैश्विक भावना आहे आणि ती ज्यांना मिळाली किंवा ज्यांनी जपली त्यांच्यासारखे लकी कोणीच नाहीत. म्हणून, जे प्रेमात तोंडघशी पडले त्यांनी बावचळून जाऊन काही वेडेपणा करू नये, उलटा हे लक्षात ठेवाव कि, "यू डिझर्व बेस्ट अन्ड मूव ऑन". 


I wish you all pure and unconditional love & when you found it don't let it go. 
Cheers,

Priya Satpute











No comments:

Post a Comment