Tuesday, 21 June 2016

पाऊस-चारोळी

पाऊस येतो
तुझ्या बहाण्याने
अन मी चिंब होते
तुझ्या नजरेने...

प्रिया सातपुते

Wednesday, 8 June 2016

पाऊस...

पहिला पाऊस
पहिलं प्रेम
पहिल्या पावसातील
पहिलीच भेट...

पाऊस मला रोज भेटतो
तुझ्या माझ्यातलं गाणं गातो
कधी हिरमुसतो
कधी हरवतो
तुझ्या कवेत विसावतो...

पाऊस मनामनाचा साथी
बिलगतो देहावरी
क्षणांच्या गाठोड्यात
चुंबनांच्या लहरी...

प्रिया सातपुते
Thursday, 2 June 2016

पाऊस अन मी...

पावसाचं अन माझं,
एक वेगळंच नात आहे,
मनातलं काहूर हेरून
धाऊन येणारा तोच
माझा खरा मित्र आहे...

प्रिया सातपुते
https://www.facebook.com/KahiManatale