गार गार वारा,
पावसाच्या धारा,
झेलू कश्या,
या क्षणांना …. सांग ना ग त्रिशा… मी माझ्या ६ वर्षाच्या भाचीकरता जोर जोरात गात होते. दिवस होता, मंगळवार अर्थात अंगारकी संकष्टीचा आणि पावसाने चक्क अकस्मातपणे हजेरी लावली. मग काय, पहिल्या पावसाला कोणी नाही म्हणेल का? आधीच मी पाऊस वेडी, मग तो कसाही पडो, मला तो हवाच असतो, लहानपणापासून पावसाची आणि माझी गट्टी कायमची आहे.
पहिल्या पावसाचा,
पहिला स्पर्श,
मोहरून टाकतो,
माझा या मनाला…
घमघमणारा ओल्या मातीचा सुगंध, जितका नाकात साठवता येईल तितका मी तो प्रयत्न केला पण, मन काही तृप्त झाल नाही. बागडणाऱ्या माझ्या परीला पाहून माझातल लहान मुल पण जाग झाल, मग काय मस्त धमाल केली, मनसोक्त भिजून, गाणी गाऊन, एकमेकांवर पाणी उडवून, गोल गोल फिरून, जोरजोरात ओरडून पावसाला दाखवून दिलं...
पाहतोयास ना,
तुझ्यासाठी मी किती वेडी,
ढगांना ओरडायला सांगतोयस,
तरीपण तुझासोबत मी बागडतेय,
विजांना चमकायला सांगतोयस,
तरीपण तुझ्यासाठी मी गातेय,
तू काहीही कर,
मी काही तुला मला चिंब भिजवल्याशिवाय जाऊ दयायची नाही…
पावसा, माझ्या मित्रा, सख्या, यारा, माहितेय न तुला माझासारखी वेडी तुला भेटायची नाही.
प्रिया सातपुते
Happy First Rain to all of you...Enjoy and love it!!
No comments:
Post a Comment