प्रियांश...७५
काम चांगलं असलं की साहजिकच वेगवेगळ्या कंपन्या मागे लागतात हे आतापर्यंत मला उमगलं आहे. एकदा आम्हांला भेटून जा, प्लिज! अशी आर्जव ऐकली की मग उत्तर काय द्यायचं तेच समजतं नाही! म्हणून मी त्या कंपनीची इत्यंभूत माहिती मिळवून जाते. आज सुद्धा माहिती काढूनच गेले होते. आज एक अनुभव गाठीशी आला, त्यांचा कंपनी फॉर्म भरा म्हणून ते मागे लागले अन आजचा प्रियांश घडला!
फॉर्म मध्ये जनरली नाव, पत्ता, जन्म तारीख, शिक्षण,...अशी वेगवेगळी माहिती भरावी लागते, अर्थात इथे धर्म, राष्ट्रीयत्व विचारलं जातं इथपत पटतं पण, पुढे जे वाचलं ते पाहून तर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली! "जात"! त्याच्यापुढे कोणता पोटवर्ग!
कितीही शिका, नाव कमवा, चांगलं काम करा पण, ही जात जखमेची खपली काढल्याशिवाय रहात नाही! हा प्रपंच का? तर कंपनी ब्राह्मण व्यक्तीची आहे! 😁 मला तर हसू की रडू हेचं कळत नव्हतं!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment