I love you हे वाक्य आता इतकं कॉमन झालं आहे की आपण प्रत्येकालाच लव्ह यू यार, आय लव्ह यू फॉर दिस म्हणत राहतो अगदी नेहमी! पण, जिथे हे बोललं पाहिजे तिथे मात्र माणूस स्वतःची गच्छंती करून घेतो! जिथे यांची जादू चालेल, अन एक नातं उमलून दरवळू लागेल तिथे मात्र आपण, फक्त विचारच करत राहतो अन मग काही वर्षांनी कॉफीचा मग हातात घेऊन स्वतःशीच कुजबुजतो शेट यार काश मी तिला/त्याला हे बोललो/बोलले असते तर....
या काश अन तर मध्ये सगळा मामला कॉफीच्या धुरासोबत उडून जातो! पण, तोच धूर सुगंध बनून एकमेकांच्या मिठीत दरवळला तर बातच न्यारी! 😘
योग्य वेळी, योग्य व्यक्ती खचितच मिळते आयुष्यात, सो डु नॉट लेट देम गो!
ऑल द बेस्ट गाइज👍
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment