आपण स्वतःसाठी सुंदर दिसतो त्यापेक्षा आपण दुसऱ्याच्या नजरेत सुंदर दिसतो ही भावना मनाला मोहवून टाकते! आपल्याही प्रेमात कोणी पडू शकतो! या एका विचाराने मन वेड होत, मग काय? आपण त्याच्या नजरेत अजून फुलून दिसावं म्हणून रोज नवे अतरंगी प्रकार करतो...कारण? मनाचा काय भरवसा ते आज एकाच्या मोहात उद्या दुसऱ्याच्या! मग, रोज आपण मनाशी झगडतो, आवडते मी त्याला! नाही ग, काय आहे असं तुझ्यात? की तू आवडशील त्याला? मग, सुरु होतो जीवघेणा प्रवास! मनाचा डोक्यासोबत! मन काही ऐकत नाही, अन डोकं काही करू शकत नाही! डोकं मनाला हतबल सुन्न होऊन एका कोपऱ्यात बसून हुंदके देताना दुरून पाहत राहतो! काश, डोक्याला, मनाला पाय असते, म्हणजे निदान डोकं मनापर्यंत धावत जाऊन त्याला बिलगून समजूत तरी घालू शकलं असतं! पण, असं काही होत नाही, मन एकटंच हुंदक्यांमध्ये विरून जात, कधीही सुंदर न दिसण्यासाठी...
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment