आजही प्रतीक्षेत आहोत कधी शिक्षा मिळेल या हैवांनाना? आपण म्हणतो माणसावर परिस्थिती ओढवते, म्हणून माणूस परिस्थितीच्या पुढे हतबल होऊन गुन्हेगार बनतो. दारू पिऊन, फन-आनंद उपभोगताना, यांना आपले गरीब आईवडील आठवत नाहीत, बाहेरख्यालीपणा करताना यांना त्यांची बायको दिसत नाही, पण, वासना शमवायला कोणीही मग ती तरुणी असो बालिका अथवा वृद्ध स्त्री. या हरामखोरांना स्वतःच अल्पवयीनत्व पुढे करून कायद्याचे काळे कोट घातलेले वकील सोडवतात! वकीली म्हणजे एखाद्या नराधमाला वाचवण??? निष्पाप मुलींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून, स्त्रिया पुरुषांपेक्षा कशा कमी आहेत, अन त्यांनी काय कराव? कोणते कपडे घालावे? घर सांभाळाव, फुल बनून फ्लॉवर पॉट मध्ये सजाव, गटर मध्ये जाऊ नये? स्त्री म्हणजे काय फक्त शोभेची वस्तू वाटली आहे का ? स्त्री-पुरुष कधी मित्रमैत्रीण असू शकत नाहीत…. अशे अक्कलेचे तारे तोडून स्वतःच त्या नराधमांना साथ देऊन, त्यांनी दाखवून दिलं की या निर्लज्ज माणसांना संस्कारच नाहीत.
कायदा पळवाटा देतोय अन अशे काळे कोट वाले कावळे निष्पाप स्त्रियांना टोचायला मोकळे. बलात्कार करणारा मात्र मोकाट सुटतो जामिनावर, लग्न करून संसार थाटतो आणि तोंड मारायला मोकळा होतो. यांच्या नजरेत ना असते शरम ना पश्चाताप. म्हणून जनेतेने का शांत बसायचं? कितीतरी लाखो कळ्या चिरडल्या जात आहेत, आता तरी जागे व्हा, एकत्र लढा अश्या हरामखोरांच्या विरोधात. काहीही झालं तरी स्त्रीवर बोटे दाखवायला सारे मोकाट सुटतात, पण ज्या माणसाने हे कृत्य केलंय त्यांना का कोणी चिरडत नाही?? समाजाच्या भल्यासाठी बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार केलं जात, अन अश्या नराधमांना मोकाट सोडलं जात का????
प्रिया सातपुते

No comments:
Post a Comment