सहसा मी कधी क्राईम पेजेस वाचण्याच्या भानगडित पडत नाही! पण, आज पप्पा जोर देऊन वाच म्हणाले, त्यात मम्माने पण जोर दिला! मग, मी ती बातमी वाचली, काही क्षण तशीच बसून राहीले.
मग बायोलॉजी आठवली, डिस्कवरीपण! विंचूची आई आपल्या पिल्लांना पाठीवर पोसते अन तिच पिल्ली मोठी झाल्यावर, खाऊन, नांगे मारून आईला यमसदनास धाडतात! हे सांगण्याच तात्पर्य हेच की आजचा मनुष्य या विचवांच्या पोरांसारखच स्वतःच्या आईवडिलांना पुरेपूर खाऊन टाकतो अन त्यांच्या देहाची, मनाची लत्करे लत्करे करून टाकतो!
कोल्हापुरमध्ये काही दिवसांपूर्वी एका श्रीमंत वृद्ध स्त्रिचा मृतदेह रंकाळा तलावात आढळून आला. पोलिसांच्या चौकशी अंतर्गत आढळून आले होते, त्या तीन दिवसांपासून गायब होत्या! मृतदेहाची ओळख पटवायला त्यांची दोन मुले, सूना, एकुलती एक मुलगी, नातवंड अशी सारी हजर होती, निर्विकार चेहरयाने! एका मुलाने आईच्या अंगावर असणाऱ्या तीस तोळे सोन्याची चौकशी करून, स्वतःच आईच्या अंगावरचे दागिने काढून घेऊन, आईच्या देहाला तीन चार वेळा आलटुन पालटुन खात्री केली की दागिने राहीले तर नाहीत ना? ना आई गेल्याच दुःख, ना आवेग! आईच्या देहासमोरच दोघा भावांचा वाद सुरु झाला, दागिने कोण घेणार? त्यात बहिण सुद्धा आपला हिस्सा मागु लागली! हे सार त्या माऊलीच्या देहासमोर! मेल्यावर एका श्रीमंत घराण्यातील वृद्ध स्त्रिला ही वागणूक मिळत होती मग साधारण कुटुंबात तर बोलयलाच नको! जिवंत असताना काय होत असेल कोण जाने? म्हणून त्यांनी आत्महत्या पत्करली? की त्यांना कोणी मारून टाकल? अशे नाना विचार डोक्यात भुंगा घालत आहेत!
राहून राहून एकच प्रश्न पडतोय, "म्हातारपण कोणाला चुकलय का? सांगा ना ? मग का हा विकृतपणा?
स्वतः च्या आईवडिलांना एखाद्या कस्पाटासमान फेकून द्यायच? वृद्धाश्रमात तर कधी भर रस्त्यात, तर कधी मारून टाकायच...तुम्हीही म्हातारे व्हाल, आयुष्याच बुमरँग पुन्हा फिरेल मग त्याच माऊलीचे हात आठवतील, पाठीवर फिरनारा उबदार वडिलांचा हात आठवेल अन स्वतः चीच कीव येईल अन शेवटी तुम्ही सुद्धा अशेच तरंगाल,...लक्षात ठेवा, कॄतघ्ननांनो, लक्षात ठेवा.....
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment