Friday 13 March 2015

त्रिशा'ज डे आउट

आज हिरमुसलेल्या माझ्या परीला घेऊन मी न्यू पैलेस गाठला…तिच्या डोळ्यातली निरागसता, प्रत्येक शस्त्रामागील तिची चौकशी, मेलेल्या प्राण्यांना पाहून हळहळणारी तिची नजर बरंच काही सांगून जात होती! सेल्फिज काढून आमचा मोर्चा आम्ही तिथे ठेवलेल्या जिवंत प्राण्यांकडे वळवला, त्यांना खाऊ घालण्यासाठी आम्ही दोन मोठे बिस्कीट्चे पुडे विकत घेतले…कस काय कळत या मूक जनावरांना कोण जाणे? आसुसलेल्या नजरेने ते धावतच  आमच्याकडे आले…त्यांना भरवण्यात सुखं मिळत नव्हत, उल्टा जीव झरझरत होता…काय वाटत असेल त्यांना त्या बंदिस्त चौकडीत? आपल्याला आवडेल का असं जगण? अर्थात नाहीच… पुढे आमचा मोर्चा चिंचेच्या झाडाकडे वळला, लहानपणी ऐकलेलं चिंचेच्या झाडावर भुते राहतात, आपसूकच स्वतःलाच टपली देऊन मी दगडाने चिंचा पाडायला सुरुवात केली, माझ्या परीच्या आनंदाला तर पारावारच उरला नव्हता, पटापट चिंचा गोळा करण्यात ती मग्न झाली होती…तिच्याकडे पाहून मी पुन्हा ते सोनेरी बालपण अनुभवत होते…

प्रिया सातपुते


No comments:

Post a Comment