लहानपणापासून ऐकत आलेय… आज होळी, उद्या पोळी, बामन मेला संध्याकाळी…पण, आजवर यामागचा अर्थ काही उमगला नव्हता. लहानपणी बामन असतो काय हेचं माहित नव्हत! ते कळायला लागल्यावर, "फक्त बामनच का मरतो? दुसऱ्या जातींची नावे का घेत नाहीत?" पण, कोणीच उत्तर द्यायचं नाही, सगळे होळीच्या व्यापात असायचे. कालांतराने होळीचं रूपही बदलत गेलं, बऱ्याच वर्षांनी पुन्हा हेच वाक्य कानी पडलं अन कोड सुटलं…कधी काळापासून हे जातीयवादी यमक रूढ होत, कोण जाणे? पण, काळ बदलतोय तसा माणूसही या होळीच्या आगीत स्वार्थाने बरबटलेले, जातीयवाद जाळून टाकू दे, माणूस फक्त माणूस म्हणून जगू दे दुसंर काहीच मागण नाही माझं! प्रेमाच्या रंगात माणूस न्हाऊन निघू दे, ते फक्त माणुसकी जपण्यासाठी.
होळीच्या तुम्हां सर्वांना रंगीबेरंगी शुभेच्छ्या!!!!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment