लहान मुलं मातीचा गोळा असतं, त्याला हवा तो आकार द्या ते तसं रूप घेत, त्याला पहिला आकार देते ती त्याची "आई", प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला गुरु ही त्याची आईचं असते. आई, आपल्याला बोलायला, चालायला, बागडायला शिकवते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आपल्याला प्रेम करायला शिकवते, "निरपेक्ष प्रेम". संस्कारांचं बाळकडू तिच देते. चिमुकल्या पंखात उडण्याच बळ देते. कालांतराने क्रम लागतो बाबांचा, त्यांच्यातला कणखरपणा आणि तत्वं देण्याचा ते आतोनात प्रयत्न करतात. अशा माझ्या आई-बाबांना एकचं सांगावस वाटतंय, "Love you Mumma-Papa".
मग, येते ती शाळा, माझी शाळा!!
काळ्या फळ्यावर जसा खडू अक्षरे उमटवायचा तशीच काही गत आमची पण असायची, काही गोष्टी मनाच्या फळ्यावर छाप सोडून जायच्या तर काही एका कानातून आत आणि दुसरया कानातून बाहेर.
आयुष्याचा पहिला अध्याय, इथेच लिहला गेला. आईच्या मायेनी डोक्यावर हात ठेऊन, वेळ पडली तर कान ओढणाऱ्या बाईंच्या आसपास घुटमळतो आजही जीव!! या शाळेत मिळाले अगणित "गुरु", ज्यांनी आमच्या भविष्यासाठी अतोनात जीव ओतला. "गुरुपौर्णिमा" अजूनही आठवते, दिक्षीत गुरुजी आणि तोफखाने गुरुजींच्या फोटोंना गुलाब ठेवताना तेव्हा जास्ती काही जाणवत होत कि नाही हे माहित नाही, पण आज ते दिवस आठवून डोळे मात्र पाणवतात हे नक्की.
पंखाना बळ घेऊन आपण उंच भराऱ्या मारू लागतो, कळत नकळत कुठे तरी ठेच लागून पडतो, तेव्हा मात्र जितकं काही आपण शिकलो आहे, ते सगळ विसरून जातो आणि एका अंधारात गुरफटून जातो. आपणास, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याकरता जी व्यक्ती पुढे येते, आपल्या निरपेक्ष प्रेमाच्या चादरीत आधार देऊन, आपणास पुन्हा उडण्याच बळ देते, त्यांच्या प्रत्येक शब्दांत जादू असते, आपण पुन्हा उंच भराऱ्या घेऊन उडू जरी लागलो तरी आपणास जपण्यास ते नेहमीच तत्पर असतात. अश्या माझ्या "जादूगार गुरुंना " माझा शत शत प्रणाम!! अशे गुरु तुम्हा सर्वाना लाभोत हीच गुरुंपुढे प्रार्थना!!
मी माझ्या सर्व प्रिय गुरुंना, धन्यवाद देऊ इच्छिते कि त्यांनी मला इतक सुंदर घडवलं आहे कि मी स्वतःला आरशात पाहते तेव्हा आपसूकच मला माझ्या डोळ्यात मी त्यांनाच पाहते, माझातल्या प्रत्येक गोष्टीत कुठेतरी माझी आई, बाबा, माझे जादुगार अर्थात गुरुजी आणि निखील भैय्या, भागवत मैडम, घोरपडे मैडम, संध्या मैडम, कुंभार सर, जाधव सर,…. यांची छवि मला जाणवते.
Love you all, thank you so much for inspiring me and creating me!!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment