का कोणास ठाऊक आज मला या विषयावर थोडंस लिहावसं वाटलं. काही दिवसांपूर्वी जिया खानच्या आत्महत्येमुळे बराच गोंधळ झाला, जिवंत असताना कोणालाही तिची इतकी क्रेझ नव्हती पण तिच्या अश्या मृत्यूमुळे सर्वानीच हळहळ व्यक्त केली. मृत्यू इतका सोप्पा झाला आहे कि त्याची भीती कोणालाच उरली नाही कि काय? हा प्रश्न मनात उमटतो हे मात्र नक्की.
हिंदू धर्माप्रमाणे जे कोणी आत्महत्या करतो किंवा करते त्यांना कधीच मोक्षं मिळत नाही, ते हजारो वर्ष अडकून पडतात. आत्मा ही एक चिरंतन चेतना अर्थात एनर्जी आहे, जी कधीच मरत नाही ती फक्त आपले रूप अर्थात कपडे बदलते, म्हणजेच आपला देह हा एक प्रकारचा आउटफिटच आहे. आपल्या चेतनेला संपवणे हा एक अक्षम्य गुन्हा आहे आणि त्याला प्रत्येक धर्मात पापच मानलं जात.
आजकाल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर यंगस्टर्स आपल्या जीवच बर वाईट करायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त चालू असते ती स्पर्धा जिंकण्यासाठी आणि जर त्यात हार मिळाली तर ती त्यांना पचत नाही मग ती प्रेमात असो वा अभ्यासात वा घरातल्या हलक्या फुलक्या भांडणात.
माझी लहानपणीची मैत्रीण, नेहमी पहिला नंबर असणारी, पण पाचवीत तिला बोर्डिंगला घालण्यात आलं, पण पुन्हा तिला गमेना म्हणून दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळाला कारण आमच्या शाळेत प्रवेश बंद झाले होते. कालांतराने आमचे मार्ग वेगळे झाले आणि एके दिवशी वर्तमानपत्रात तिचा फोटो आला होता, तिने आत्महत्या केली होती. दहावीत बोर्डात, बारावीला पण बोर्डात आणि तिची आत्महत्याची बातमी वाचून माझं डोक चक्रावूनच गेलं होत. आम्हाला कारण समजलं नाही. फक्त एवढचं कळाल कि ती जेवून, तिच्या लहान भावासोबत बोलून, आपल्या रुममध्ये गेली, थोड्या वेळात तिचे बाबा रूम मध्ये पाहतात तर तिने पंख्याला दोर लाऊन आत्महत्या केली होती. असं काय घडलं कि तिने जीव दिला हे अजूनही गूढच आहे पण, आपला जीव इतका स्वस्त झाला का? कि तो इतक्या सहजासहजी संपवून टाकायचा?
आयुष्यात अडचणी कोणाला चुकल्या आहेत? त्या तर सर्वांच्याच पाचवीला पुजलेल्या असतात पण, म्हणून आत्महत्या हा उपाय असूच शकत नाही. त्रासाला कंटाळून लग्न झालेल्या बायका जीव देतात, पाठीमागे आपल्या मुलाबाळांच काय होईल? याची जर सुद्धा चिंता नसावी? कि मदत मागायला लाज वाटते म्हणून जीव देण हा मार्ग नक्कीच असू शकत नाही. कारणे काहीही असोत आत्महत्या हा उपाय नाही. आपल्या जवळच्या मित्र-परिवारात जर कोणी सुसायडल सिम्पटमस दाखवत असेल तर त्यांना मदत करा, आयुष्य खूप सुंदर आहे हे पटवून द्या.
माझ्या जादुगाराने म्हंटले आहे कि, आयुष्यं हे हायवे सारखं असतं, जिथे आपणास एक्झिट दिसतात, हे आपल्या हातात असत कि कोणती एक्झिट घ्यायची अथवा नाही!!
Life is short and precious, live it like there's no tomorrow!!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment