या जगात काय खर अन काय खोट? याची प्रचिती प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पद्धतीने घ्यायची. या जगात खरेपणाला न्याय नाही, हे जरी खर असलं तरीही आत्म्यात मुरल्याप्रमाणे हा प्रामाणिकपणा कुठे निघून देखील जात नाही. खरेपणाने काम करत, मुंडी खाली घालून, वाटेल ते सोसनारयांची कमी नाही…रोज स्वतःचा अपमान पोटात घालून ते मन मारून काम करतात तेही या पोटासाठीच!! पण, एकदाचं मनातली भीती सोडून, वाणीत प्रामाणिकपणाचे आवाहन कराच…मग, जे व्हायचं ते होऊ देत…स्वतःच्या आत्मसन्मानापुढे कोणालाही जुमानू नका…एकदा स्वतःला मान द्या, प्रेम द्या अन दयेच्या फाटक्या कपड्यांना फेकून आत्मसन्मानाने बहरणारे रंगबिरंगी कपडे घाला, त्यांचा श्वास तुमच्या फुफ्फुसात असा साठवा की बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत गुलामी नष्ट होईल…अन तुम्हाला तुमच्यातला खरा स्वः जाणवेल…
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment