दोस्तीत अन प्रेमातली गद्दारी एकंच ना? साला ही दुनियाच न्यारी, ज्याच करावं भल, तो म्हणतो आपलच खर! मागच्या जन्माची कर्म की पाप म्हणू, पाठीत सूरा मारणारीच जास्ती भेटलीत या छोटयाश्या आयुष्यात! प्रेम करणारी हातातून क्षण निसटून जातात तशी निसटून गेलीत…
आज पाऊस, मनाला सोलवटून गेला, सर्रकण काळजात कोणी सूरा खुपसला असचं वाटलं. मैत्रीत माणूस काही पाहत नाही,… जोरदार मुंबईचा पाऊस, गुडघाभर पाण्यातून वाट काढत, हॉस्पिटलमध्ये अडमिट केलेल्या मैत्रिणीला, औषध देण्याआधी खाण्यासाठी काहीच नाही याचीच चिंता मनात होती…पूर्ण रात्र तिच्यापाशी काढली, मनात कुठेच परकेपणा नव्हता, होत ते फक्त मैत्रीसाठीच निरपेक्ष प्रेम! पण, काळ बदलतो पण, हा पाऊस आठवणीही तश्याच बरसवतो.…मनाला थंडावा न देता मैत्रीत स्वतःचा वापर करून देल्याचे दाखले द्यायला, तू किती मूर्ख आहेस हे सांगायला पाऊस बरसतो…आठवणींची, विश्वासघाताची झळ द्यायला बरसतो…
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment