मनाचे मनाशी चालू असणारे हितगुज मी इथे लिहित आहे. खूप दिवसांपासून मनात होत कि मनातल मनात नको ठेवायला. लहानपणापासून डायरी माझी जिवलग मैत्रीण-मित्र. मनातल कोणासमोर व्यक्त होण मला कधी जमलच नाही. या मुळे काही लोकांना मी घमेंडखोर, तर काहीना चक्क स्वार्थी पण वाटले. माझ्या मनातल्या विचारांच्या घोड्यांचा लगाम मी सोडून दिला आणि मग जन्माला आल,............"काही मनातले" © 2011 Priya Satpute All Rights Reserved
Wednesday, 31 August 2016
Monday, 22 August 2016
प्रियांश...८२
आपल्या अवती भोवती इतके सारेजण असतात जे बोलत नाहीत, पण निसर्गाने ठरवून दिलेली कामे चोख बजावतात! मधमाशी दिवसभर मध गोळा करते, पक्षी घर बांधताना एक एक काडी गोळा करतात काँक्रीटच्या जंगलात, एक मुंगी किती मेहनत करून साखरेचा एक कण घेऊन जाते, मग तो साखरेचा कण कितीही वेळा पडू दे, ती तो कण घेऊन जातेच! या छोट्याश्या जीवांकडून आपण खूप काही शिकू शकतो! आपल्या बाजूला काय चालू आहे? आपल्या पुढे कोण आहे? आपल्या मागे कोण आहे? याचा विचार न करता आपला मार्ग चालत रहायचं, आपल्या ध्येयाकडे! यालाच तर आयुष्य म्हणतात!
प्रिया सातपुते
Saturday, 6 August 2016
प्रियांश...८१
या छोट्याश्या आयुष्यात बरीचं मंडळी भेटली, ज्यांनी मैत्री केली खरी पण, स्वार्थासाठी! तोंड पोळवल म्हणण्यापेक्षा मन पोळून निघालं, मैत्रीवरून विश्वास उडवला, माणसांना पारखायची नजर दिली, अन माझ्या सगळ्यात जिवलग मित्रांशी मैत्रिणीशी मला भेटवल, ते म्हणजे माझे शब्द! माझे बेस्ट फ्रेंड्स, हेचं मला नेहमी कोणत्याही प्रसंगातून तारून नेतात! यांच्यामुळे काही जुनी, नवी मंडळी परिचयाची झाली! मैत्री हे नातं फक्त दोन माणसांमध्ये मर्यादीत नसतं, ते आपल्या स्वः पर्यंतचा प्रवास असतो, जिथे आपण स्वः बनून बागडतो, मनमोकळं बोलू शकतो,...मैत्री हा प्रवास असाच चालू राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
आजच्या मैत्री दिनाचं औचित्य साधून ज्या सो कॉल्ड मैत्रीमुळे मी आयुष्यात खूप शिकले त्यांना मनापासून धन्यवाद, तुमच्यामुळे मी माझ्या प्रवासात नवीन प्रियाला शोधू शकले, खूप खूप आभार!
माझ्या सर्व मित्रपरिवारास मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
हॅप्पी फ्रेंडशिप डे गाइज...
©प्रिया सातपुते