प्रियांश...१०४
परवा बाहेर जाताना माझ्या पुढे असणाऱ्या बाईकवाल्याने पिचकारी थुंकली, माजाने, थाटात पुढे निघाला. नेहमी अश्या माणसांना ओरडून वैताग आलाय म्हणून, हॉर्नच्या आवाजांची सख्त नफरत असणारा प्राणी मी, चक्क, एका सुरात त्या बाईकवल्याला हॉर्न देत राहीले...मधुर आवाजाने त्याने बाईक स्लो केली मी पण स्लो करत गाणं वाजवत राहीले! मग, सिग्नल आला तरीही मागे राहून माझं सुरूच होत! वैतागून तो बोलू लागला, आजूबाजूचे पाहू लागले, मी म्हंटल, " भाऊ, थोड्या वेळापूर्वी तुम्ही रस्त्यात थुंकला तेव्हा तुमची मर्जी होती! माझं शहर, माझा रस्ता, माझी गाडी, माझा हॉर्न अन माझा हात, मी वाजवेन अथवा नाही माझी मर्जी!"
शरमेने मान खाली घालून, सॉरी एकचं शब्द फुटला त्याच्या तोंडून, तोपर्यंत सिग्नल सुटला, लोकांच्या नजरेतला तिरस्कार आता आश्चर्यामध्ये बदलला होता!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment