प्रियांश...१०३
अंधारात खडे मारायचे नसतातच, ते दुसऱ्यांना लागण्याआधी तुमच्याच हाताला टोचतात! आजकाल बहुतांश प्रत्येक आईवडिलांना स्वतः च्या मुलासाठी त्यांचं ऐकणारी, त्यांच्या मुठीत राहणारी, स्वतः च मत नसणारी सून हवी असते! कारण, मग ती आमच्या मुलाला आमच्या पासून तोडेल, आमचं ऐकणार नाही, आमचं काही चालणार नाही, आमचा मुलगा तिचा होऊन बसेल, म्हातारपणात सेवा करणार नाही...पण, जावई मात्र श्रावणबाळ नको, तो तर मुलीचं ऐकणारा पाहिजे, आमची मुलगी स्ट्रॉंग हेडेड आहे, मग न्यूक्लियर, शक्यतो स्वतः च घर असणारा अर्थात एकटा राहणारा असेल तर बरंच! आईवडील काय एकटे राहतातच की, भेटायला जातीलच की, नाही तर आहेच वृद्धाश्रम!
Hypocrisy! आजकाल हे खूप पाहायला भेटत आहे! तू कर मेल्यासारखं मी करतो झोपल्यासारखं!
पांचटगिरी नुसती, लग्न करून बाहुली नाही आणत आहात, एक जिवंत व्यक्ती आणणार आहात, प्रेम द्या अन घ्या!
धन्य आहेत लोकं, स्वतः डोळे बंद करून बसतील, ज्ञानाचं ढोंग करतील, अन शकुनी मामा सारखे गेम करून जातील!
कर्म करत रहा याचा अर्थ काहीही करा असा नव्हे! अन शेवटी कितीही ग्रंथ वाचा, कीर्तने ऐका, गावोगावी फिरा पण, मनात दुसऱ्यासाठी प्रेम नसेल, आदर नसेल, माणुसकी नसेल तर मग हे सारं व्यर्थ आहे, ढोंग आहे!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment