Saturday, 10 March 2012

नेट-प्रेम भाग-९
संध्याकाळचे ५.३० झाले होते...श्रेयाची चुळबूळ सुरू होती, तिच एका ठिकाणी लक्षच नव्हत...मनात काही ठरवून ती आईला म्हणाली, "मम्मा  मी टेरेसवर जातेय फिरायला.”...टेरेस वर जाऊन तिने सभोवती पाहिले...मग डोळे बंद केले...सेल वर श्री चा नंबर  लावला...आणि पुन्हा कट केला...पुन्हा तिने घड्याळ पाहील ५.४५ झाले होते, तिच्या हातात सेल पुन्हा नाचू लागला होता...करू आता कि नको, मग तिने ठरवल अजुन १५ मिनिट जाऊ देत मग करते...मग ती टेरेस च्या पायऱ्यांवर जाऊन बसली, १५ मिनिटस होत आले होते..मग तिने एकदम ठामपणे  नंबर फिरवला, रिंग जाऊ लागली तसा तिच्या चेहरयाचा तणाव वाढू लागला...रिंग अजुन पण जात होती...फोन उचलला गेला...पलीकडून आवाज आला, "हेलो!!” 

श्रेया: हाय  श्री!! श्रेया बोलतेय..
श्री: हाय,..कॅन आय कॉल यू इन मिनिट?
श्रेया: अ...  
ती काही बोलणार इतक्यात श्री म्हंटला, "मी कॉल करतो तुला लगेचच."
आणि कॉल कट झाला..एक सेकेंड तिला समजलच नाही काय होत आहे…तिचा चेहरा रागाने लाल झाला होता..”वॉट द …” तितक्यात सेल रिंग झाला श्री चा कॉल होता..ती रागातच होती, कॉल कट करायचा विचार येत होता तरीपण तिने कॉल आन्सर केला.

श्री: सॉरी सॉरी…आय नो तू खूप रागत आहेस, अग बस मधून उतरायच होत म्हणून मी कॉल ठेवला…बोल  कशी आहेस?
श्रेया: अरे तस काही नाही मी समजू शकते..
श्री: आय डोन्ट बिलिव इट, तू खर्च रागत नाहीयस?
श्रेया ला खूप हसू फुटल…तसा श्री म्हणाला, " म्हणजे मी बरोबर बोलत होतो…हो ना?"
श्रेया: ह्म्म्म  मी रागत होते पण…
श्री: मग आता राग गेला ना ?
श्रेया: हो रे..कधीच..
श्री: सांग कसा होता  तुझा दिवस?
श्रेया: माझा दिवस...बोर...थोडं टायर्ड वाटत आहे, ट्रॅवेलिंग अन ऑल...तुझा कसा होता?
श्री: माझा एकदम मस्त अझ यूझवल...
श्रेया: मग स्वारी आता घरी??
श्री: हो जस्ट पोहचतच आलोय...वेट गिव मी अ मिनिट
डोर उघडण्याचा आवाज आला...
श्री काही बोलणार इतक्यात श्रेया बोलली, तू फ्रेश हो मग बोलूया..
श्री: ओके मी तुला 10 मिनिटस मध्ये कॉल बॅक करतो..
श्रेया: चालेल…आय एम वेटिंग..

फोन कट होतच श्री फटफट  फ्रेश होण्याकरता पळला, इकडे श्रेया च्या चेहरयावर एक स्मितहास्य होत…
तितक्यात पुन्हा फोन रिंग झाला…
श्रेया: हा बोल…फार लवकर आवरल तुझ?
श्री: म्हणजे काय..मुलींसारख थोडीच दोन दोन तास लावेन मी?
श्रेया: हे….वॉट यू मीन बाय  दयाट??
श्री: मी तुझाबाद्दल थोडीच बोलत होतो, इन जनरल बोललो
श्रेया: ह्म्म्म। 
श्री: बर बाई सॉरी…
श्रेया: ईईए…बाई नको म्हणू प्लीज
श्री खूप जोरात हसू लागला…
श्रेया: हसायला काय झाल त्यात? काय आवाज करत आहेस, भांडी आपटात का आहेस?
श्री: अग... चहा बनवत आहे..घेणार का तू?
श्रेया: येतो तुला? अरे वा!! हो घेते ना पाठव सेल मधून, चहा ओतून दे सेल वर, (श्रेया हसते)
श्री: वेरी फनी!! हो येतो तुझा पेक्षा छान बनवतो मी..
श्रेया: अच्छा! ह्म्म्म..वी’ल सी..
श्री: बाय द वे गोवा मध्ये काय काय केल तू?
श्री चहा चा मग घेऊन बाल्कनी मध्ये गेला खुर्ची मध्ये निवांत बसून तो श्रेया ची बडबड एन्जॉय करत होता…

अंधार दाटून आला होता, श्रेया च्या आई च्या हाका ऐकू आल्या..
श्री ला वाटल त्याने ऐकल काही, तस त्याने विचारल कोणी बोलवत आहे का तुला?
श्रेया: हा आई बोलवत आहे खाली…
श्री: तू घरी नाहीयस?
श्रेया: आहे पण टेरेस वर आहे
श्री ने वॉच मध्ये टाइम पहिला…तस त्याने पटकन म्हंटल, "अग! ७.०० वाजून गेलेत अंधार पडला असेल ना, जा खाली आता..
श्रेया: हो जाते आता..
श्री: रात्री ऑनलाइन येतेस?
श्रेया: हो
श्री: ओके चल, मी पण थोड काम करून घेतो
श्रेया: ओकीझ…सी या
श्री: सी या.

कॉल कट झाला तशी श्रेया पटकन उठली अन खाली निघून गेली, श्रेयाच फेस एकदम फ्रेश दिसत होता…श्रेया च्या चेहरावर एक वेगळाच रंग चढला होता…………..पहिल्या प्रेमाचा.

प्रिया सातपुते