हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो, बहिण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटात राखी बांधते. हा धागा फक्त बांधायचा म्हणून नसतो, ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतिक आणि भावाकडून बहिणीला मिळणारी संरक्षणाची हम्मी असते. ज्या मनगटात मी हा धागा बांधतेय त्याच्या मनगटात माझं रक्षण करण्याची ताकत, भावाला सुखी समृद्ध आयुष्य आणि चिरंतन प्रेम रहाव हीच प्रार्थना प्रत्येक बहिण आपल्या भावासाठी करते.
आजच्या या कलयुगात, २ वर्षाची चिमुकली सुद्धा सुरक्षित नाही, मग जन्माला आलेल्या मुलींचं सोडाच! द्रोपदीच्या वस्त्रहारणात धावून आलेला कृष्ण आता कुठे लुप्त झाला आहे कोणास ठाऊक? पण आज, मी सर्व पुरुषांना विनंती करते कि त्यांनी स्वतः मधल्या कृष्णाला जाग कराव आणि आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांना नुसतं पाहत न राहता, प्रतिकार करावा म्हणजे कोणी रिंकू भर रस्त्यात जाळली जाणार नाही, भर रस्त्यात एक माणूस कोणी अमृताला चाकूने भोकसणार नाही. दिवसा ढवळ्या कोणी माथेफिरू ऍसिड फेकून एखाद्या तरुणीला आयुष्यभराचा मृत्यू देणार नाही, ज्या चिमुकलीला जग असत तरी काय हेच माहित नाही अश्या निष्पाप बालिकांवर कोणी बलात्कार करू शकणार नाही, दारू ढोसून कोणी निर्घुनतेने तरुणींवर अत्याचार करून, खून करू शकणार नाही.
प्रत्येक बहिणीसाठी रक्षाबंधनची अपूर्व भेट म्हणून तुम्ही सारे स्वतः मध्ये एक योद्धा जागा करा जो नेहमी स्त्रियांच्या मानासाठी, रक्षणासाठी तत्पर राहील.
प्रिया सातपुते
Happy Rakshabandhan!!
No comments:
Post a Comment