मनाच्या पाऊलवाटे वर
उभे आहे कोणीतरी,
कटाक्ष प्रेमाचा
करतो आहे प्रवास कमी,
प्रवासाच्या या रगाड्यात
उभे आहोत आपण दोघेही एकाच पाऊलवाटे वर
पण,
पाऊलवाटे वर चालू शकतो
फक्त एकच व्यक्ती,
पाऊलवाटेच्या या प्रवासात
कोणी प्रथम चालायचं?
हाच होत आहे एक गम्य प्रश्न,
आणि प्रश्नच उत्तर देतोय आपण दोघेही एकच....
प्रिया
No comments:
Post a Comment