Thursday 27 September 2012

ती आणि तो

"तुला जे समजायचं ते समंज, मला आता हि रिलेशनशिप पुढे न्यायची नाही"....असं बोलून तो, माघारी फिरला....
वाळूत त्याच्या पायाचे ठसे उमटले होते, ती त्याच्या पाठमोऱ्या प्रतिकृतीकडे पहातच राहिली. समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा तिला स्पर्शून जाग्या करत होत्या कि बोलावत होत्या? हेच तिला उमगत नव्हते, ज्याच्यासोबततिने जगण्या मरणाच्या शपथा घेतल्या होत्या, तो तिला सोडून गेला होता. मटकन ती खाली बसली, आसवांचा बांध आता तुटला होता, तीच सर्वस्व लुटून तो निघून गेला होता.
तिला कळत नव्हत, कि हसायचं कि रडायचं.
रोज ती जिथे तो शेवटचा भेटला होता, तिथे येऊन त्याच वेळी, त्याच जागेवर, त्याची वाट पहायची.
तिने ठरवलं होत, जोपर्यंत तो लग्न नाही करत, तिही नाही करणार.
कालांतराने तिच्या हातात पत्रिका पण आली, ती त्याच्या लग्नाला आवर्जून गेली, त्याला सुखात पाहून ती, चुपचाप तिथून निघाली. शेवटच पत्र गुलाबी पाकिटात ठेऊन तिने, ती जागा गाठली जिथे ती नेहमी जायची, त्याची वाट पहायची. ते परत कधीच न परतण्याकरता.
तिने ना त्याला जबाबदार धरले ना श्राप दिले. तिच्या शेवटच्या शब्दात पण तोच होता.
दिवस लोटले, नियतीची चाके फिरली, तो लग्न करून फसला होता, लग्नाच्या काही महिन्यातच त्याची धर्मपत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. त्याला माहित होत, त्याच्याकडे अजूनहि तिचा पर्याय आहे. शेवटी जिथे तो तिला सोडून गेला होता, तिथे जाऊन त्याने तिची वाट पाहिली, पण ती कुठेच नव्हती. तिच्या मैत्रिणीकडे गेल्यावर, त्याला घडला प्रकार कळला.
ते गुलाबी पाकीट घेऊन तो तिथेच आला. पाकीट उघडणार तोच तिचा आवाज त्याच्या कानी पडला, त्याने घाबरून पाहिलं, गुलाबी पाकीट हातातून गळून पडल.
ती समोर उभी होती, "मला माहित होत, तू येशील, एकदा तरी पाठीमागे वळून पाहशील, पण, आता माझ्या पाठी नको येऊस , परत फिर, आयुष्य सुंदर आहे....
तो तिथेच कोलमडून पडला, गुलाबी पाकीटाजवळ.
ती त्याला जगायला शिकवून गेली होती.....

प्रिया सातपुते









No comments:

Post a Comment